HOME   टॉप स्टोरी

१८ राज्यातील विद्यार्थ्यांची लातुरात शोभायात्रा

गोल्ड्क्रिस्ट शाळेचा राष्ट्रीय बाल आनंद महोत्सव

१८ राज्यातील विद्यार्थ्यांची लातुरात शोभायात्रा

लातूर: १८ राज्यांतील विद्यार्थी आज लातूरमध्ये आले आहेत. विलासराव देशमुख फाऊंडेशन आणि नवी दिल्ली राष्ट्रीय युवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने लातुरमध्ये भारत की संतान हा कार्यक्रम घेण्यात येतो आहे. दुपारी ४ वाजता क्रीडा संकुलातुन विद्यार्थांची पदयात्रा काढण्यात आली यामध्ये गोल्डक्रिस्ट हाय या शाळेतील विद्यार्थांसोबत देशातील आलेल्या वेगवेगळ्या १८ राज्यातील विद्यार्थांनी मिळून भारत देशाच्या एकात्मतेचे दर्शन देण्य़ात आले. लातूर मधील ४५० विद्यार्थांच्या घरात बाहेरील राज्यातील मुले गुण्या गोविंदाने राहत आहेत. देशात वाढत चाललेल्या जातीयवाद, प्रांतवाद यावरती आळा बसवण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात येतो असल्याचे सुपर्ण जगताप म्हणाले. ही पदयात्रा शिवाजी चौक, अशोक हॉटेल, गांधी चौक या मार्गाने शाहू महाविद्यालयातील याचा समारोप झाला. त्यानंतर शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये रात्री ८ वाजेपर्यंत वेगवेगळ्या सांस्कृतीक कार्यक्रम होणार आहेत.


Comments

Top