HOME   लातूर न्यूज

चिकलठाणा-भातखेडा रस्त्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी

रमेशअप्पा कराड यांच्या पाठपुराव्याला यश, ०९ कोटी रुपयांचा निधी मंजूर

चिकलठाणा-भातखेडा रस्त्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी

लातूर: लातूर तालुक्यातील चिकलठाणा-भातखेडा रस्त्यावरील मांजरा नदीवरील उच्चस्तरीय मोठ्या पुलाच्या अवर्धवट कामाच्या बांधकामासाठी शासनाने सुधारीत अंदाजपत्रकाव्दारे ०५ कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजुर केला आहे. त्याचबरोबर लातूर तालुक्यातील राज्य मार्ग २४८ या मार्गावरील कोळपा-कासारखेडा-चिकलठाणापाटी-खरोळा-कारेपूर या रस्त्याच्या सुधारणा कामासाठी ०२ कोटी रुपये तर रेणापूर तालुक्यातील धानोरा-डिगोळ देशमुख-पोहरेगाव-सिंधगाव-सांगवी-दर्जीबोरगाव-अरजखेडा या ०४ रस्त्याच्या सुधारणा कामासाठी ०२ कोटी रुपये अशा एकुन ०९ कोटी रुपयांचा निधी लातूर ग्रामीण मतदार संघातील रस्ते व पुलाच्या कामासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकताच मंजुर केला असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रताप पाटील व रेणापूर पंचायत समितीचे सभापती अनिल भिसे यांनी दिली आहे.
लातूर तालुक्यतील चिकलठाणा-भातखेडा रस्त्यावरील मांजरा नदीवरील उच्चस्तरीय पुलाचे काम निधीअभावी अर्धवट राहिलेले आहे. या पुलाचे काम अर्धवट राहिल्याने चिकलठाणा-भातखेडा रस्त्यावरुन वाहतूक करणाऱ्या नागरीकांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या स्थितीत या पुलाच्या एकूण ०९ पिअर पैकी ०७ पिअरचे काम पूर्ण झाले असून उर्वरीत ०२ पिअर, दोन्ही बाजुचे अपार्टमेंट व पुलावरील छताचे काम निधीअभावी थांबले आहे. सदरील पुलाच्या उर्वरीत कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर व मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यु पवार यांच्या सहकार्याने लातूर ग्रामीणचे भाजपाचे नेते रमेशअप्पा कराड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे वेळो-वेळी पाठपुरावा केला असता राज्याच्या सार्वजनीक बांधकाम विभागाने सदरील पुलाचे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी सुधारीत अंदाजपत्रकातील १० कोटी ९९ लक्ष रुपयांपैकी ०५ कोटी रुपये एवढा निधी मंजुर केला असून या पुलाच्या थांबलेल्या उर्वरीत कामास लवकरच सुरवात होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी सार्वजनीक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव, सचिव व मुख्य अभियंता यांना वेळोवेळी सूचना केल्याने या कामाच्या मान्यतेस गती मिळाली अशी माहिती प्रताप पाटील यांनी दिली.


Comments

Top