HOME   महत्वाच्या घडामोडी

ओबीसी आरक्षणावर मराठा नेत्यांचा आक्षेप, काश्मीर विधानसभा बरखास्त, अर्धे एटीएम बंद पडणार, दादरला आंबेडकरांचे नाव, पाकची मदत रद्द.....२२ नोव्हेंबर २०१८

ओबीसी आरक्षणावर मराठा नेत्यांचा आक्षेप, काश्मीर विधानसभा बरखास्त, अर्धे एटीएम बंद पडणार, दादरला आंबेडकरांचे नाव, पाकची मदत रद्द.....२२ नोव्हेंबर २०१८

* दुधात भेसळ करणार्‍यांना जन्मठेपेची शिक्षा
* आज लातुरच्या बाजारात सोयाबीन ३४९३, मूग ५५४० तर उडिदाला ५३५९ रुपयांचा भाव* शेतकरी आणि आदिवासींचा मोर्चा मुंबईत दाखल
* मागण्या मान्य होईपर्यंत आझाद मैदानावरुन हटणार नाही
* शेतकर्‍यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार- गिरीष महाजनांनी घेतली मोर्चेकर्‍यांची भेट
* जम्मू-काश्मीरची विधानसभा भंग, पुन्हा होणार निवडणुका
* विधानसभा घाईघाईने बरखास्त, सरकार बनवण्याचा आमचा दावा अधिकृत -मेहबूबा मुफ्ती
* मराठा समाजाचा आरक्षण अहवाल सरकारने स्विकरलाच नाही, केवळ शिफारसी स्विकारल्या
* ओबीसींचे आरक्षण १४ टक्क्यावरुन अनधिकृतरित्या ३० टक्क्यावर नेले, मराठा नेत्यांचा आरोप
* नोटाबंदीचा सर्वात मोठा फटका शेतकर्‍यांना बसला, सरकारची कबुली
* पुढच्या वर्षात देशातील अर्ध्याहून अधिक एटीम मशीन्स बंद पडणार
* पैशावर लुडो गेम खेळणार्‍या आठजणांना हिंगोलीत अटक
* दादर रेल्वेस्थानकाला ०६ डिसेंबरपूर्वी बाबासाहेब आबेडरांचे नाव द्या, भीम आर्मीची मागणी
* विजय मल्ल्याच्या लंडनमधील घर विकण्याच्या हालचाली
* अभिनेता आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
* नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती
* मराठवाडा आणि विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांची आझाद मैदानावर शोकसभा
* राज्यातील दुष्काळ मानवनिर्मित, जलयुक्तचे काम चांगल्या प्रकारे झाले असते तर दुष्काळ पडला नसता- राजेंद्र सिंह ठाण्यात
* ठेकेदाराने कामे केली तेथील माती पावसाबरोबर वाहून गेल्याने नदीचे स्वास्थ्यही बिघडले- राजेंद्र सिंह
* मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा करण्याविषयीची प्रक्रिया सुरू- राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती
* 'पुलं' नी लोकांच्या मनांतला 'कुष्ठरोग' बाजुला काढला, हे त्यांचे मोठेपण- डॉ. विकास आमटे
* शिर्डीच्या साईसंस्थानच्या विश्वस्त मंडळाची पात्रता तपासण्यासाठी तीन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची समिती
* देशातील एकता अबाधित राखण्यासाठी खिलाफत चळवळीची आजही आवश्यकता- शरद पवार
* पुण्यात महिलेवर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा पोलिसांवरही गोळीबार
* डीएसकेंच्या १० ठेवीदारांचा गुंतवणुकीतील पैसे मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज
* उद्धव ठाकरे आज शिवनेरीवरील माती आणणार, कलश नेणार अयोध्येला
* राज्यात आठ वर्षांपासून शिक्षक भरती बंद, शिक्षक भारती संघटनेचे २६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन
* सरकारच्या आश्वासनाच्या निषेर्धात माथाडी कामगारांचा २७ नोव्हेंबर राज्यव्यापी लाक्षणिक बंद
* अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन
* अरविंद केजरीवालांवर मिर्ची पावडर फेकणाऱ्याला १४ दिवसांची कोठडी
* अमृतसर येथे झालेल्या ग्रेनेड हल्ल्यामागे पाकिस्तानच्या आयसिसचा हात असल्याचं उघड
* आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, माझं सरकार रिमोट कँट्रोलवर चालणारं नव्हतं- मनमोहन सिंग
* नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा राखत नाहीत, त्यांचं बोलणं शोभत नाही- मनमोहन सिंग
* बेळगावमध्ये तळ्यात पोहायला गेलेल्या दहावीच्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
* टी-२० लढतीत ऑस्ट्रेलियाचा भारतावर ०४ धावांनी विजय
* पाकिस्तानला देण्यात येणारी ०१.२२ बिलियन डॉलरची मदत अमेरिकेने केली रद्द


Comments

Top