HOME   महत्वाच्या घडामोडी

इंदौर येथील प्रचार रॅलीत आमदार अमित देशमुखांचा सहभाग

कॉंग्रेसच्या विजयाचा दावा

इंदौर येथील प्रचार रॅलीत आमदार अमित देशमुखांचा सहभाग

इंदौर: मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असून येत्या २८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाला निर्विवादपणे बहुमत मिळेल असे चित्र सर्वत्र दिसत आहे असा दावा करण्यात आला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी आज माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेसचे नेते ज्योतिराइत्य सिंधिया यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रचंड रॅलीत सहभाग नोंदविला. आमदार अमित देशमुख यांच्या सहभागामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
सध्या मध्य प्रदेशात सर्वत्र भाजप विरोधी वातावरण तयार झाले असून शिवराजसिंह चव्हाण यांच्या सरकारला जनता कंटाळली आहे. सर्वत्र गाजत असलेल्या व्यापम घोटाळ्याने मध्यप्रदेशाची बदनामी झाली असून राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मध्य प्रदेशाची जीवन वाहिनी असणाऱ्या नर्मदा नदीतील वाळू उपसा प्रश्नही सर्वत्र गाजत आहे. शिवराजसिंह सरकारने ग्रामीण भागाच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून शेतकरी विरोधी धोरणांमुळे सर्वत्र नाराजी पसरली आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारमुळे देशभराप्रमाणेच मध्य प्रदेशातील सामान्य माणूस अडचणीत आला असून नोटबंदीमुळे सर्वांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच जीएसटी सारख्या विषयाने अर्थव्यवस्था अडचणीत आली असून प्रचंड प्रमाणात वाढलेल्या इंधनदराने प्रत्येक माणूस महागाईच्या खाईत सापडला आहे.


Comments

Top