HOME   महत्वाच्या घडामोडी

सरकार घडवणार दंगली, डबेवाल्यांची कार्तिकी, सोपलांचे उपोषण, राजनच्या टोळीचे भाजपासाठी काम, उत्तर भारतीयांच्या मतांसाठी ठाकरेंची खेळी, ब्लू व्हेल हटवला.......०४ डिसेंबर २०१८

सरकार घडवणार दंगली, डबेवाल्यांची कार्तिकी, सोपलांचे उपोषण, राजनच्या टोळीचे भाजपासाठी काम, उत्तर भारतीयांच्या मतांसाठी ठाकरेंची खेळी, ब्लू व्हेल हटवला.......०४ डिसेंबर २०१८

* राम मंदिरावरुन सरकारचा देशात दंगली घडवण्याचा डाव, ओवेसींसोबत हातमिळवणी- राज ठाकरे
* सरकारकडे सांगायला काहीच नाही, हिंदू-मुस्लीम दंगलींचा गैरफायदा घेणार- राज ठाकरे
* परभणीत सिलेंडरांचा स्फोट, तीन अग्नीशामक दलाचे जवान बचावले
* इंदापुरात अनैतिक संबंधातून महिलेचा खून, तरुणाने घेतला गळफास
* राम मंदिराऐवजी गरिबांना मदत करा, जळगावात मोर्चा
* सोलापुरात ओबीसी संघटनेने केले उपोषण, नव्या आरक्षणाला विरोध
* पाणी टंचाईच्या विरोधात आ. दिलीप सोपल यांनी केलं सोलापुरात उपोषण
* मंगळवेढ्याच्या जेलमधून कुख्यात आरोपीचे पलायन
* शिवसेना मंत्री करणार दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा, सरकारला घेरण्याचा प्रयत्न
* गोहत्येच्या संशयावरुन बुलंदशहरमध्ये लावली आग
* राजनची टोळी भाजपासाठी काम करते- नवाब मलिक
* सिंचनावर हजारो कोटी खर्च करणार्‍या राज्य सरकारला साई संस्थानकडे धरणासाठी झोळी का पसरावी?
* सरकार आर्थिक अडचणीत असताना सातवा वेतनायोग कसा लागू करणार?
* उद्धव ठाकरे यांच्या आज अनेक बैठका
* मुंबईतील डबेवाले एक दिवसाच्या सुटीवर, कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूरला जाणार
* भाजपा-सेनेची जवळीक वाढू लागली, शरद पवारांनी घेतली नारायण राणे यांची भेट
* अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा- आमदार रमेश कदम यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
* वाशिम येथील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर
* मराठा आरक्षण कायदा लागू केल्याबद्दल उद्धव यांनी केलं मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
* उद्धव ठाकरे आमचे मार्गदर्शक- मुख्यमंत्र्यांनी गायले गोडवे
* भिमा कोरेगाव: आरोपींना जामीन देण्यास राज्य सरकारचा विरोध, सुनावणी होणार जानेवारी २०१९ मध्ये
* भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपींविरुद्धचे आरोपपत्र सर्वोच्च न्यायालयापुढे सादर करा- तीन सदस्यीय खंडपीठाचे निर्देश
* चेक बाऊन्सची कारवाई रद्द करण्याची माजी मंत्री रणजीत देशमुख यांची याचिका रद्द
* औरंगाबाद तालुक्यात रुबेला लस घेण्यासाठी जाणार्‍या मुलांच्या गाडीची काच निखळली, दोन विद्यार्थी खाली पडून जखमी, गाडीत होते १२२
* मुंबईकरांसाठी काहीच करता न आल्यामुळे ठाकरे बंधू आता उत्तर भारतीयांची मते मिळवण्यासाठी राजकारण करत आहेत- राष्ट्रवादी
* नाशिक जिल्ह्यात शौचालय वापराचे प्रमाणपत्र सादर न करणारे सरपंचासह १२ सदस्य ठरले
* तुम्ही आम्हाला काय हैदराबादमधून पाकिस्तानला पाठवणार?, आमच्या शंभर पिढ्या भारतात राहतील- ओवेसी
* पुण्यात नृत्य आणि कराटे क्लासची बाकी फ़ी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याला प्रवेशद्वारातून दिले हाकलून
* सांगोला तालुक्यातील जमिनीच्या तुकड्यासाठी साताऱ्याच्या राजमाता कल्पनाराजे भोसलेंची प्रशासनाकडे तक्रार
* तांत्रिक त्रुटींमुळे गैरसोयीचे ठरल्याने एचडीएफसी बँक जुनेच अॅप आज पासून पुन्हा सुरू करणार
* प्रदूषण नियंत्रणात अपयश मिळाल्यानं दिल्ली सरकारला २५ कोटींचा दंड
* गोहत्येच्या संशयावरून उत्तर प्रदेशात आंदोलन, वाहनांची तोडफोड, पोलीस स्टेशनवर गोळीबार, एक पोलीस निरीक्षकाचा आणि अन्य एकाचा मृत्यू
* केंद्र सरकारच्या आदेशानंतर इंटरनेटवरून हटविला ब्ल्यू व्हेल चॅलेंज गेम
* नोटाबंदीमुळं निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर थांबला नाही, यावेळी निवडणुकीत अधिक काळं धन जप्त झालं- माजी मुख्य निवडणूक आयुक्त
* एअर इंडियाच्या मालकीची काही जमीन व अन्य मालमत्ता विकण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, मिळणार ०९ हजार कोटी
* बीएसएनएल लवकरच सुरु करणार फोर जी
* प्रवासी कारला 'चाइल्ड लॉक' न ठेवण्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे आदेश, ०१ जुलै २०१९ पासून नियम लागू


Comments

Top