HOME   महत्वाच्या घडामोडी

आजलातूरचा वर्धापनदिन, शौचालये महिनाभरात, दुष्काळी पथकांचा झोला, खंडोबाची यात्रा, राजस्थानात आज मतदान, अशांत शेतकरी सरकारला लांछन.......०७ डिसेंबर २०१८

आजलातूरचा वर्धापनदिन, शौचालये महिनाभरात, दुष्काळी पथकांचा झोला, खंडोबाची यात्रा, राजस्थानात आज मतदान, अशांत शेतकरी सरकारला लांछन.......०७ डिसेंबर २०१८

* आज लातुरच्या बाजारात सोयाबीन ३४१०, तूर गेली ४८८१ वर तर मुगाने गाठला ५६०१ रुपयांचा भाव
* राहुरीतील कार्यक्रमात साखर कमी झाल्याने नितीन गडकरी चक्कर येऊन कोसळले, राज्यपालांनी सावरले, आता ठीक
* मुंबईच्या मलबार हिलचं नाव रामनगरी करण्याची मागणी
* राज्यातील १५१ तालुके दुष्काळी घोषित
* पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीर पाडून नव्याने बांधणार
* संभाजी भिडे न्यायालयात हजर, आंबा खाऊन पुत्रप्राप्ती प्रकरणावर सुनावणी
* दुष्काळावर निवारणासाठी साई संस्थानने दिले ५० कोटी
* मुंबई-नाशिक-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मुख्यमंत्र्यांनी पाठवलेला प्रस्ताव केंद्राने फेटाळला
* मुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या दुष्काळ पाहणी पथकाची पाहणी, अहवाल लवकर देण्याची विनंती
* राजस्थानात अकरा वाजेपर्यंत २२ टक्के मतदान
* महाराष्ट्र केसरी स्पर्धा यंदा जालनात
* अहमदनगरात एका कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरु असताना नितीन गडकरी यांना आली भोवळ, राज्यपालांनी सावरले
* नागपुरात सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या दोन महिलांवर अज्ञाताने केला चाकूहल्ला
* दुष्काळी स्थितीमुळे महाराष्ट्रातील सगळ्या खासदार, आमदारांनी वेतन न घेण्याचे आवाहन
* कर्मचार्‍यांनीही दुष्काळग्रस्तांसाठी सातवा वेतन आयोग उशिरा घ्यावा: आवाहन
* अनेक वर्षांपासून वाती वळतो आहे, ही वात कुठेही लागू शकते, कुणीही उध्वस्त होऊ शकते- एकनाथ खडसे
* नीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडण्याचे आदेश
* आजलातूरचा नववा वर्धापनदिन साजरा, अनेक विचारवंत, प्रतिष्ठांची हजेरी
* खासदार सुनील गायकवाड, महापौर सुरेश पवार यांनी दिल्या शुभेच्छा
* प्लास्टीक वापराचा दंड भरण्यासाठी आरोपींने आणली पाच हजाराची चिल्लर
* पुण्यात पाणी कपात अटळ, आता मिळते तेवढे पाणी दिल्यास उन्हाळ्यात धरणे पडणार कोरडी
* लातुरात पालकमंत्र्यांनी केले फिरत्या स्वच्छतागृहाचे उदघाटन
* मनपाने लातूर शहरात बांधलेली सार्वजनिक स्वच्छतागृहे महिनभरात होणार सुरु
* लातुरात आजपासून खंडोबाची यात्रा
* दुष्काळी पाहणी करणार्‍या केंद्रीय पथकाने ऐनवेळी बदलली गावे
* तेलंगणात आवडीचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून एका तरुणाने जीभ कापून देवाला केली अर्पण
* तलंगणा-राजस्थानात आज मतदान
* पानगावात बाबासाहेबांच्या अस्थी अभिवादनासाठी लोटला लाखोंचा जनसागर
* पाणी पुरवठ्यासाठी लातूर मनपाने मगवल्या नागरिकांच्या सूचना
* २०१६ च्या अतिवृष्टीतील शेतकर्‍यांची नुकसान भरपाई मंजूर, आमदार त्र्यंबक भिसे यांचा पाठपुरावा
* उदगीर येथे झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ लातुरच्या महसूल कर्मचार्‍यांनी केले काळ्या फिती लावून काम
* प्लास्टिक बंदीमुळे द्यावे लागणार बाटलीत दूध, ग्राहकांना जास्तीचे द्यावे लागणार प्रतिलिटर १० ते १५ रुपये
* इंदू मिलवरील बाबासाहेबांच्या स्मारकाची उंची एक इंचानेही कमी केली जाणार नाही- देवेंद्र फडणवीस
* राज्यात शेतकऱ्यांचा आक्रोश हे राज्य कारभारास लांच्छन- उद्धव ठाकरे
* शेतकरी संतापलाय, तो मनातून अशांत आहे, पण त्याची जगण्याचीही इच्छा मेली तशी लढण्याची जिद्दसुद्धा संपली आहे- उद्धव ठाकरे
* सरकार चालवायला शिर्डी संस्थानकडून कर्ज घ्यावे लागले तेथे शेतकर्‍यांचे प्रश्न कसे सोडवणार? - उद्धव ठाकरे
* चारा नसेल तर जनावरं पाहुण्यांकडे सोडून या- जलसंधारण मंत्री राम शिंदे
* सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ पाहणी पथकाने उरकला झपाट्याने दौरा, पाहणीचा फार्स असल्याची शेतकर्‍यांमध्ये चर्चा
* देवेंद फडणवीस यांनी ०१ हजार ४९८ दिवस पूर्ण करुन मुख्यमंत्रिपदावर मिळवला राहण्याचा मान बहुमान, याआधी वसंतराव नाईक यांनी मिळवला होता
* राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांची मुंबई हायकोर्टात बदली
* खड्ड्यांमुळे देशात १५ हजार लोकांचा मृत्यू होणे अमान्य, दहशतवादी हल्ला किंवा शहिदांपेक्षा ही संख्या मोठी- सर्वोच्च न्यायालय
* रस्त्यांवरील मॅनहोल व खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास आर्थिक मदत देण्यास प्रशासन बांधील नाही- मुंबई महापालिका
* राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना हात लावला तर जनता रस्त्यावर येईल- अशोक चव्हाण
* नवीन आर्थिक वर्षापासून गृहकर्जावरील व्याजदर घटण्याची शक्यता
* अलिबागमधील नीरव मोदीचा बंगला तोडणार असल्याची राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात माहिती
* ‘क्षात्रधर्म साधना’ या ग्रंथात ‘हिंदु राष्ट्र’ शब्दाचा उल्लेखही नाही, नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी दाखल केलेले आरोपपत्र बिनबुडाचे- सनातन संस्था
* मुंबईतील 'इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी'त प्लास्टिकचा भुगा होणारे संशोधन यशस्वी
* लाचखोरीमध्ये पुणे सरस, नागपूर दुसऱ्या तर औरंगाबाद तिसर्‍या क्रमांकावर, महसूल विभाग प्रथम स्थानावर
* राज्याला यंदाचा इंडिया मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स पुरस्कार जाहीर
* जालना येथे १९ ते २३ डिसेंबर कालावधीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
* 'केदारनाथ' चित्रपटाविरोधातील याचिका फेटाळली मुंबई हायकोर्टानं
* आज राजस्थान आणि तेलंगण या दोन राज्यांमध्ये निवडणुका, विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा शेवटचा टप्पा
* ऑगस्टा वेस्टलँड: मिशेलच्या भारतात येण्यानं काँग्रेसची झोप उडाली- भाजप
* सीबीआय संचालकांना रातोरात पदावरून का हटवले?- सुप्रीम कोर्टाचा केंद्राला प्रश्न
* तुमच्यावर मनी लाँडरिंगची केस असून, ती मिटवण्यासाठी ०२ लाख द्या, इंग्लंडमध्ये भारतीय तरुणाला फसविले
* इंडिगो च्या ताफ़्यात दोनशे विमाने
* ब्राझील तरुणीच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीवरून आरोपाखाली गायक मिका सिंगला दुबईत अटक


Comments

Top