HOME   लातूर न्यूज

पानगाव येथील चैत्यनगरीत १०१ जणांचे रक्तदान

श्रीमती सरस्वती कराड रक्तपेढी व चैत्यस्मारक ट्रस्टचा उपक्रम

पानगाव येथील चैत्यनगरीत १०१ जणांचे रक्तदान

लातूर: भारतरत्न् डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील चैत्यनगरी येथे श्रीमती सरस्वती कराड रक्तपेढी व चैत्य स्मारक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात १०१ जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन चैत्य स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष व्ही. के. आचार्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देशमुख, पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. दहिफळे, डॉ. हुजुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या रक्तदान शिबीरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरप्रेमीनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्य स्मारक ट्रस्टच्या पुढाकारातून गेल्या पाच वर्षापासून पानगाव येथील चैत्यनगरी येथे यशस्वीरित्या रक्तदान शिबीर घेण्यात येत आहे. या रक्तदान शिबीरासाठी अस्थी अभिवादन समितीचे उपाध्यक्ष जुनेद अत्तार, ग्रामपंचायत सदस्या शिला आचार्य, प्रणिता भंडारी, जयश्री अनगोटे, शिवकन्या गंगणे यांचे सहकार्य लाभले. या रक्तदान शिबीरात डॉ. एम. पी. झिले, डॉ. बी. डी. दाताळ, तंत्रज्ञ ए. टी. वाघचौरे, जी. जी. सुतार, शिवाजी जवादे, आर. एन. चिलमे, सामाजिक कार्यकर्त्या सुचिता भागवते, परिचारक सुयोग पांचाळ व मंगल मस्के, एस. बी. होळंबे यांनी काम पाहिले.


Comments

Top