HOME   लातूर न्यूज

विलास साखर कारखान्याने सभासदांना पाठवले प्रशिक्षणाला

पाणी व्यवस्थापन, सेंद्रीय उत्पादनाबाबत वसंतदादा इन्स्टिट्यूट देणार प्रशिक्षण

विलास साखर कारखान्याने सभासदांना पाठवले प्रशिक्षणाला

लातूर: आधुनिक ऊसशेती, खोडवा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय ऊस शेती करून कमीत कमी खर्चात अधिक ऊत्पादन सभासद व ऊसउत्पादकांना घेता यावे या संदर्भातील सखोल ज्ञान मिळावे म्हणून विलास सहकारी साखर कारखाना लि. वैशालीनगर, निवळी कारखान्याने सभासदांना वसंतदादा शुगर इंन्स्टिीटयुट, पुणे येथे ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. या प्रशिक्षणास पुणे येथे रवाना करतांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या प्रसंगी व्हा. चेअरमन गोविंद बोराडे, संचालक युवराज जाधव, प्रभारी कार्यकारी संचालक एस. व्ही. बारबोले, माजी संचालक प्रताप पाटील, गुरूनाथ गवळी, शेतकी अधिकारी एस. एस. कल्याणकर, ऊस विकास अधिकारी डी. एस.कदम, खातेप्रमुख, विभागप्रमुख उपस्थित होते.
कारखान्याचे संस्थापक चेअरमन आमदार अमित विलासराव देशमुख, चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतील आदर्श ऊसउत्पादक सभासद व ऊसउत्पादक शेतकरी यांच्यात निर्माण व्हावा याकरीता ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षणासाठी वसंतदादा शुगर इंन्स्टिीटयुट, पुणे येथे पाठविण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी कार्यक्षेत्रातील प्रगतीशील ऊस उत्पादकामधील पंचवीस ऊसउत्पादकांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती कारखान्याच्या वतीने देण्यात आली.


Comments

Top