HOME   महत्वाच्या घडामोडी

मराठा आरक्षणाच्या विरोधातील याचिकेवर आज सुनावणी, टीव्ही केबल शुल्कात वाढ, कोल्हापूर-हैद्राबाद विमानसेवा, डाळी महागणार, कमावतीलाही मिळणार पोटगी......१० डिसेंबर २०१८

मराठा आरक्षणाच्या विरोधातील याचिकेवर आज सुनावणी, टीव्ही केबल शुल्कात वाढ, कोल्हापूर-हैद्राबाद विमानसेवा, डाळी महागणार, कमावतीलाही मिळणार पोटगी......१० डिसेंबर २०१८

* कल्पना गिरी प्रकरणातील महेंद्रसिंह चौहानला सशर्त जामीन, मात्र लातूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
* उदगीर: जगाने बंदी घातलेल्या मोदींना संघाने पंतप्रधान केले- प्रकाश आंबेडकर
* मराठा आरक्षण प्रकरणी ओबीसी संघटनेची आज जागर बैठक
* योगेंद्र यादव महा आघाडीत जाणार नाहीत
* मराठा आरक्षण विरोधी जनहित याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी
* कोल्हापूर महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना राहणार तटस्थ, नगरसेवक सहलीला
* सांगलीतील मुक्त विद्यापिठाच्या वर्गात मित्रानेच मैत्रीणीची केली बेंचवर डोके आपटून हत्या
* सीएम चषक स्पर्धेत १२ क्रीडा प्रकार, जालन्यात झाले उदघाटन
* कोल्हापूर-हैद्राबाद विमानसेवा सुरु
* उद्यापासून संसदेचं हिवाळी अधिवेशन
* नेवास्यात शेतकर्‍याने दीड टन कांदा वाटून टाकला, दानपेटी ठेवली, त्यातले पैसे मुख्यमंत्र्यांना पाठवणार
* निळवंडे धरणासाठी शिर्डी संस्थानचे ५०० कोटी. निळवंडेकरांनी काढली नतनस्तक रॅली
* धुळे व नगर महापालिकांचे आज निकाल, साडेअकरापर्यंत राजकीय चित्र स्पष्ट होण्याची शक्यता
* राम मंदिरासाठी केंद्राने कायदा करावा यासाठी संघाकडून दबाव
* नव्या वर्षात तूरडाळ, हरभरा डाळीसह उडीद डाळी गाठणार शंभरी
* आरक्षणाच्या आडून मराठा आणि ओबीसी वाद पेटविण्याचा प्रयत्न, तसे होऊ देणार नाही, गैरसमज दूर करत एकमेकांचे प्रश्न सोडवू - शरद पवार
* 'ज्या राज्यात ज्या पक्षाची ताकद त्याला त्या ठिकाणी महत्त्व द्या, तरच भाजपला नक्कीच पर्याय मिळेल- शरद पवार
* मराठीचे सक्तीकरण म्हणजे मातृभाषेचा अपमान, सक्तीकरणाने भाषा टिकणार नाही- दिवाकर रावते
* खाजगी वैद्यकीय अभ्यासक्रमांचे शुल्क निश्चित करण्यासाठी कॉस्ट अकाउंटंट्सची मदत घेणार- मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर
* देशात किसान, जवान आणि संविधान तिन्हीही संकटात- कन्हैया कुमार
* मुंबई विमानतळावरुन उडाली एकाच दिवशी १००४ विमाने
* अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येईल, इतक्या ताकदीने लेखन करणारा एकही 'माई का लाल' मराठीत नाही- समीक्षक विनय हर्डीकर
* ओला-उबर कंपन्यांकडून स्थानिकांवर अन्याय- वाहतूक कामगार संघटना
* सत्तेत असलेल्यांनी जनमताचा सन्मान करावा, कोणतेही आढेवेढे न घेता राममंदिर उभारणीकडे लक्ष द्यायला हवे - भैय्याजी जोशी
* वाढत्या लोकप्रियतेमुळे दुःस्वास करणार्‍यांचा माझ्यावर हल्ला- रामदास आठवले
* कमावणार्‍या पत्नीलाही पोटगी मागण्याचा हक्क- उच्च न्यायालय
* ठाणे येथे अवैध ऑर्केस्ट्रा बारवर छापा, ४२ जणांना अटक
* पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे उद्या निकाल
* ०१ जानेवारीपासून टीव्ही केबलसेवा शुल्कात वाढ, १०० चॅनलसाठी द्यावे लागणार १३० रुपये
* विजय मल्ल्या खटल्याच्या सुनावणीसाठी सीबीआय आणि ईडीचं पथक लंडनला
* खाजगी आणि सार्वजनिक भागीदारीतून देशात ०६ विमानतळं उभारणार, निर्णयाच्या विरोधात विमानतळ प्राधिकरण कर्मचारी आजपासून संपावर
* ऑगस्टा वेस्टलँड- मिशेल याला पातियाळा हाऊस न्यायालयासमोर आज करणार हजर
* ताजमहालचं दर्शन महागलं ५० रुपयांनी, देशी पर्यटकांना २५०, तर विदेशी पर्यटकांना द्यावे लागणार १३०० रुपये
* रायबरेलीत नरेंद्र मोदी १६ डिसेंबर रोजी करणार कोच फॅक्टरीचं उद्घाटन
* मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे देशातील १० पैकी ०९ घरांमध्ये गॅस सिलिंडरचा वापर
* नेब्युलायझर, डिजिटल थर्मामीटर, रक्तदाबाचे मॉनिटर, ग्लुकोमीटर उपकरणांना 'औषधे' वर्गवारीचा दर्जा
* दुबईच्या प्रवाशाकडून ८४ लाखांचं सोनं जप्त
* विदेशी चलन मायदेशात पाठविण्यात भारतीयांचे स्थान अव्वल, प्रवासी भारतीयांनी पाठविले चालू वर्षात ८० अब्ज डॉलर- जागतिक बँक
* रॉबर्ट वड्रा यांच्या संबंधित व्यक्तींवरील छापेसत्रानंतर काँग्रेसने धमकावले तपास यंत्रणांना- भाजप प्रवक्ते शाहनवाझ हुसेन
* 'खेलो इंडिया'चं यजमानपद महाराष्ट्राकडे, ०९ जानेवारीपासून होणार सुरुवात


Comments

Top