HOME   लातूर न्यूज

लोकनेते मुंडे यांच्या जयंतीनिमित्त जमला भटक्या-विमुक्तांचा मेळा

विविध उपक्रमांनी जयंती झाली साजरी, दिवसभर महाप्रसादाचे वाटप

लोकनेते मुंडे यांच्या जयंतीनिमित्त जमला भटक्या-विमुक्तांचा मेळा

लातूर: भटक्या-विमुक्तांचे आराध्य दैवत लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांची जयंती भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या वतीने साजरी करण्यात आली. यानिमित्त महाप्रसाद वाटपासह विविध उपक्रम राबवण्यात आले. स्व. गोपीनाथराव मुंडे हे दीनदलित, गोरगरीब व भटक्या-विमुक्त समाजाचे नेते होते. या समाजाच्या समस्यांची त्यांना जाण होती. त्यांच्या कार्याची आठवण समाजाला रहावी यासाठी भाजपा भटके-विमुक्त आघाडीच्यावतीने जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त भटक्या विमुक्त समाजातील आराधी-गोंधळी, वाघ्या-मुरळी, शाहीर, भजनी, वासुदेव, धनगरी-ओविकार, वारु,पोतराज, कडक-लक्ष्मी,बहुरुपी या पारंपारिक कला प्रकार सादर करणाऱ्या कलाकारांचा मेळावा भरला होता. या कलाकारांनी आपली कला सादर केली. शिवाजी चौकात भव्य व्यासपीठ उभारून त्यावर स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा पुतळा बसवण्यात आला होता. लोकनेते गोपिनाथराव मुंडे यांचे मानसपुञ तथा राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर तसेच भाजपा लातुरचे जेष्ठ नेते रमेशअप्पा कराड यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाची व महाप्रसाद वाटपाची सुरुवात झाली. या प्रसंगी महापौर सुरेश पवार, स्थायी समितीचे अध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, नगरसेवक हनुमंतराव जाकते, विशाल जाधव डॉ. दिपाताई गिते, शितल मालू, शोभा पाटील, वर्षाताई कुलकर्णी, मनसेचे संतोष नागरगोजे, राष्ट्रवादीचे कल्याण बदने कॉग्रेसचे दिपक टिंगरे यांनी कार्यक्रम स्थळी भेट देऊन लोकनेते. स्व. गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन केले. भाजपा भटके-विमुक्त आघाडीचे जिल्हाअध्यक्ष, शिवसिंह सिसोदिया, प्रदेश सचिव पृथ्वीसिंह बायस, प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल गीते, राम माने, शहर जिल्हा सरचिटणीस रवी मुरकुटे, मुन्नाभाई हाशमी, नितीन अंधारे यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या उपक्रमांसाठी परिश्रम घेतले. आघाडीच्यावतीने दिवसभर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रदेश-सचिव पृथ्वीसिंह बायस यांनी केले. या वेळी हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असे संबंधितांनी पाठविलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


Comments

Top