HOME   महत्वाच्या घडामोडी

गहलोत राजस्थानचे तर कमलनाथ मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री , गडकरी म्हणतात माल्या चोर कसा? पतंजली जमवणार निधी, ११ हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या......१४ डिसेंबर २०१८

गहलोत राजस्थानचे तर कमलनाथ मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री , गडकरी म्हणतात माल्या चोर कसा? पतंजली जमवणार निधी, ११ हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या......१४ डिसेंबर २०१८

* अशोक गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री, सचिन पायलट उप मुख्यमंत्री
* कमलनाथ मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री
* कांदा उत्पादकांनी घेतली पंतप्रधानांची भेट, सांगितल्या व्यथा, तोडग्याचे आश्वासन
* कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, शेतकर्‍यांना अनुदान द्यावे, हमीभाव द्यावे
* नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना मिळाला जामीन
* वेळेत आरोपपत्र दाखल न झाल्याने मिळाला जामीन
* राफेल विमान घोटाळा प्रकरणी मोदी सरकार सहीसलामत, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
* राफेल घोटाळ्याची माहिती राहूल गांधींना कुठून मिळते? ते त्यांनी सांगावे- अमित शाह
* जानेवारीत होणार शिक्षकांची मेगाभरती
* मुंबईतला पारा उतरला १८ अंशावर
* मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाला दंड रद्द
* अमिताभ बच्चन यांच्या घराची भिंत रस्ता रुंदीकरणासाठी पाडणार, बच्चन यांचे मौन
* पुण्यात होणार पाणी कपात, दिवसाआड मिळणार, लोकसंख्येप्रमाणे पाणी देण्याची मागणी
* राज्यातील सेतू सुविधा केंद्रातून जात प्रमाणपत्राचं वाटप सुरु
* अतिरेक्यांशी लढताना अपंगत्व आलेल्या जवानांचा लष्करप्रमुखांनी केला गौरव
* थकबाकीदार झाला म्हणून माल्या चोर कसा? नितीन गडकरी यांचा सवाल
* रेणा कारखान्यास सर्वोत्तम साखर कारखान्याचा पुरस्कार जाहीर
* लातुरातील कचरा वाहतूक करणार्‍या दिडशे वाहनांच्या कागदपत्रांची होणार तपासणी
* औशाचे नगराध्यक्ष अफसर शेख ठरले अपात्र, प्रभारी न्गराध्यक्षपदी जावेद शेख
* लातूर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील जिर्ण इमारती पाडणार
* ग्राहकाला मिळाली सव्वादोन किलो पेंड कमी, लातुरचे व्यापारी लक्ष्मीरमण भुतडाअ यांना १५ हजारांचा दंड
* चाकूर तालुका मुलींच्या जन्मदरात आघाडीवर
* सर्वसमावेशक अथवा निवडक कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यास ठरेल वाईट उपाय- स्टेट बँक ऑफ इंडियांचा अहवाल
* कर्जमाफीऐवजी शेतकऱ्यांना अर्थसाह्य करणाऱ्या योजना राबवायला हव्यात- एसबीआयचा अहवाल
* आर्ट ऑफ लिव्हिंगचे पहिले ग्रामीण ध्यान केंद्र होणार जालन्यात, आथहत्या रोखण्यासाठी एक लाख शेतकर्‍यांना करणार मार्गदर्शन
* संताप ओळखा अन्यथा शेतकरी उद्या सरकारलाही फास लावू शकतो- शिवसेना
* ०४ वर्षांत राज्यात ११ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या
* शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात समोर आलेल्या आकडेवारीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही- शिवसेना
* काँग्रेस राजवटीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या नसून सरकारने पाडलेले खून म्हणणारे सत्तेवर आले पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत- शिवसेना
* सार्वजिनक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आपल्या दोन नातवंडांना दिली गोवर रुबेलाची लस
* पाथरीच्या स्टेट बँक ऑफ इंडियासमोर उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
* म्हाडाच्या कलाकार कोट्यातील ०१ हजार ३८४ घरांसाठी ०१ लाख ६४ हजार अर्ज
* राज्यात भाजप स्वबळावर लढले तर मोठा फटका बसू शकतो- शिवसेनेचा इशारा
* रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता उध्द्वस्त करण्याचा केंद्राने प्रयत्न केलेला नाही, सरकारच्या विकासविषयक दृष्टिकोनाला पाठिंबा देणे बँकेची जबाबदारी - नितीन गडकरी
* विधिमंडळ प्रशासनाच्या वतीने मुंबईत १५ ते १९ जानेवारीत राष्ट्रकुल संसदीय असोसिएशन परिषद
* राष्ट्रकुल संसदीय असोसिएशन परिषदेसाठी होणार ०७ कोटी खर्च, देश-विदेशातील तीनशे जणांना निमंत्रण
* मुंबईत दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणारे तीनजण गजाआड
* १६ ते १८ वयोगटांतील मुला-मुलींना मिळणार दुचाकी चालवण्याचा परवाना, परवाना केवळ इलेक्ट्रिक वाहनांना
* बी. पी. सिंह एफटीआयआयचे नवे अध्यक्ष
* प्रशासन चालविण्यास आजारामुळे पुरेसे सक्षम नसल्याच्या कारणावरुन मनोहर पर्रीकरांचा राजीनामा मागणे चुकीचे- गोवा राज्य सरकार
* पतंजली उद्योगसमुह खुल्या बाजारातून निधी गोळा करणार
* १९८४ च्या शिखविरोधी दंगलीत कमलनाथ यांचा सहभाग असल्याचे ठोस पुरावे- आम आदमीचा दावा
* आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी प्रक्रियेत त्रुटी, कोणीही भारताला मुस्लिम राष्ट्र करण्याचा प्रयत्न करू नये- मेघालय हायकोर्ट
* मतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड यांना 'लिंक' करणे अनिवार्य करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार
* एकापेक्षा अधिक वाहनांचे मालक असणाऱ्यांना घेता येणार एकच विमा संरक्षण
* राफेल करार प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज देणार निकाल
* मधुमेह, रक्तदाब कारणे देऊन सीमेवर जाण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांचा घेणार समाचार - बिपीन रावत
* नोकरी पाहिजे असेल तर रेल्वेत जा किंवा स्वतःचा व्यवसाय करा मात्र सैन्यात दाखल होऊ नका- लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत


Comments

Top