HOME   व्हिडिओ न्यूज

चंद्रशेखर आझादांना अघोषित नजरकैद, सभेत सहभाग नाही

मुक्कामासाठी लॉज मिळवण्याचा प्रयत्न अनेक लॉजेसनी जागा नसल्याचा केल बहाणा

चंद्रशेखर आझादांना अघोषित नजरकैद, सभेत सहभाग नाही

लातूर: भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आज पहाटे लातुरात आले. त्यांच्यासाठी अनेक लॉजमध्ये खोली मिळवण्याचा प्रयत्न झाला पण बहुतेकांनी नकार दिला. अखेर अंबाजोगाई मार्गावरील मयुरामध्ये सोय झाली. ते आल्याचे कळताच अनेकांनी भेटण्याचा प्रयत्न केला. पण उपयोग झाला नाही. अखेर दुपारी चारच्या सुमारास पत्रकारांना परवानगी देण्यात आली. लॉजच्या परिसरात साध्या वेशातील पोलिस आणि अधिकारी डोळ्यात तेल घालून वावरत होते. पाच ते दहा अशी त्यांच्या सभेची वेळ देण्यात आली होती. पण त्यांना सभेला उपस्थित राहण्यास बंदी घालण्यात आली.
अलीकडे पाच राज्यात निवडणुका झाल्या. या निवडणुकात भाजपाला चित व्हावं लागलं. या सगळ्या राज्यात चंद्रशेखर यांच्या सभा झाल्या होत्या. असाच प्रकार महाराष्ट्रातही होऊ नये म्हणून आझादांना आझादी दिली जात नाही, पाळत ठेवली जाते, नजरकैदेत ठेवलं जातं असा आरोप भीम आर्मीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक कांबळे यांनी केला.


Comments

Top