HOME   टॉप स्टोरी

घटना वाचवण्यासाठी लढतो म्हणून सरकार मला घाबरते- चंद्रशेखर आझाद

दिवसभर लॉजमध्येच, बाबासाहेबांना वंदन करुन नांदेडकडे रवाना

घटना वाचवण्यासाठी लढतो म्हणून सरकार मला घाबरते- चंद्रशेखर आझाद

लातूर: सरकारला हे राष्ट्र हिंदू राष्ट्र बनवायचंय. त्यासाठी घटना बदलण्याचा डाव आखला जातोय. या देशात अनेक धर्म आणि जाती आहेत. एका धर्माचे राष्ट्र म्हणून या देशाची ओळख बदलली जाऊ शकत नाही. घटनेप्रमाणेच हा देश चालावा यासाठी मी जनजागरण करतोय म्हणून हे सरकार मला घाबरतं असं भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. घटनेप्रमाणे हा देश चालावा एवढेच आपले म्हणणे असते? मी कय अपराध केलाय? घटनेने सरकार चालावे हे माझं म्हणणं आहे म्हणून सरकार मला घाबरतं. मी काय अपराध केलाय? माझ्या सभांना बंदी सरकार प्रशासनाकडून करवून घेते. माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणते, सरकार घटना आणि आंबेडकरवादाला घाबरते. सरकार आमचे मनोबल तोडण्याचं काम करीत आहे यामुळे आमचा आक्रोश आणखी वाढेल. परिणामी भाजपा सत्तेपासून दूर जाईल. गायीसाठी माणसांना मारतात, दलित आणि मराठ्यांमध्ये वितुष्ट आणण्याचे काम केले जाते, आरक्षणाच्या नावावर ओबीसींची फसवणूक केली जाते, राम मंदिर, काश्मीर, हिंदू मुस्लीम हेच यांचे मुद्दे असतील त्यांच्याकडे सांगण्यासारखे दुसरे काहीच नाही असाही आरोप चंद्रशेखर यांनी केला.


Comments

Top