HOME   टॉप स्टोरी

लातूर भाजपमय शिस्तीत नियोजन, माध्यमाना परवानगी नाही

दोन्ही कार्यक्रम पक्षाचे अंतर्गत कार्यक्रम, सामान्यानाही प्रवेश नाही

लातूर भाजपमय शिस्तीत नियोजन, माध्यमाना परवानगी नाही

लातूर: आज दुपारी अडीचच्या सुमारास भाजपाध्यक्ष अमित शाह लातुरात येत आहेत. आगामी लोकसभेची ही तयारी आहे. आज थोरमोटे लॉन्सवर विजयी बूथ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कर्यक्रमाला केवळ बूथप्रमुखांना हजर राहता येईल इतरांना प्रवेश मिळणार नाही. एवढेच काय तर माध्यमांनाही मज्जाव करण्यात आला आहे. संध्याकाळी साडेसात वाजता निमंत्रितांसाठी कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित राहणार आहेत. बूथ कार्यक्रमाला मुख्यमंत्रीही येणार आहेत. पण पुढच्या कार्यक्रमापूर्वी ते नांदेडला जाणार आहेत.


Comments

Top