HOME   महत्वाच्या घडामोडी

सपा-बसपा एकत्र, ४२१ मशाली, खडसे म्हणतात राजकारणाचा वीट, आधार दुरुस्ती १०० रुपयात, कारखान्याचे कार्यालय जाळले.......१२ जानेवारी २०१९

सपा-बसपा एकत्र, ४२१ मशाली, खडसे म्हणतात राजकारणाचा वीट, आधार दुरुस्ती १०० रुपयात, कारखान्याचे कार्यालय जाळले.......१२ जानेवारी २०१९

* राजमाता जिजाऊ यांची आज जयंती सिंदखेड येथील जन्मस्थळी लखलखल्या ४२१ मशाली
* सातव्या वेतन आयोगाचा जीआर अद्याप बाकी, प्रतिक्षा करावी लागणार
* शिक्षणासाठी पैसे नसल्याने बारावीत शिकणार्‍या नांदेडच्या अनुजा कांबळेनं केली आत्महत्या
* मोदींच्या विरोधात बसपा, सपाही एकत्र येणार
* भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान आजपासून वन डे मालिका
* विधानसभा लढवणार नाही, घाणेरड्या राजकारणाचा वीट आलाय- एकनाथ खडसे
* आधार कार्डातील दुरुस्तीसाठी १०० रुपयांपर्यंत शुल्कवाढ
* नव्या अभियांत्रिकी महाविद्यालयांना परवानगी नाही
* नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे अध्यक्ष अशोक चावला यांचा राजीनामा
* अमित ठाकरे यांच्या विवाहाचे मोदी आणि शहा यांना निमंत्रण नाही
* नवीन राजधानी एक्स्प्रेसची चाचणी यशस्वी
* सांगलीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी क्रांती साखर कारखान्याचं कार्यालय जाळले
* मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचं निधन
* भाजपाच्या राष्ट्रीय महा अधिवेशानाचा आज अखेरचा दिवस
* बेस्टच्या संप सुरुच, आता सफाई कामगारही सहभागी
* बेस्ट बसचे भाडे आणखी पन्नास टक्क्यांनी वाढणार
* बेस्टच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केली तिघांची समिती
* बेस्टच्या संपावर बैठकीत तोडगा निघत नसेल तर रस्त्यावर काढू- मनसे
* बेस्टला पर्याय म्हणून एक हजार स्कूल बसेस आज उतरणार रस्त्यावर
* राज्य सरकारने मध्यस्थी करुन बेस्टचा संप मिटवावा- महापौर
* बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठात प्राध्यापकांच्या ११६ जागा रिकाम्या
* अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले वैशाली येडे यांनी
* व्यवस्थेने माझ्या शेतकरी नवऱ्याता बळी घेतला, अडचणीत आलेल्याना दिल्लीची नाही तर गल्लीची बाई कामी येते- वैशाली येडे
* जातीय-धर्मीय अस्मिता आणि राजकीय डावपेचाच्या द्वंद्वात सापडलेल्या साहित्याचा अभ्यास वाचकांनी जाणीवपूर्वक करण्याची गरज- अरुणा ढेरे
* नयनतारा यांना दिलेलं निमंत्रण मागे घेतलं ही नामुष्की, संमेलनाला वेठीला धरणाऱ्यांना बळी पडायला नको- अरुणा ढेरे
* नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करण्यामागे सरकारचा संबंध नाही, सहगल यांना न बोलावल्यानं महाराष्ट्राचे नाक कापले गेले- विनोद तावडे
* साहित्य संमेलनात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ठराव येण्याची शक्यता
* मराठा आरक्षण कायद्याविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी राज्य सरकारने मागितला वेळ
* मराठा आरक्षण सुनावणीत हस्तक्षेप करण्यास मुख्य न्यामूर्तींचा नकार
* रामदास कदम ‘दाम’ दास कदम, ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून दिले, त्या शिवसेनेने कोकणी माणसाला काय दिले?- धनंजय मुंडे
* राज्यात सेनेचा उद्योग मंत्री पण त्यांचा उद्योग भूसंपादनातून शेतकर्‍यांची अडवणूक आणि लूट करण्याचा- धनंजय मुंडे
* निवडणुका आल्या की त्यांना प्रभू रामचंद्र आठवतात, प्रभू रामाचा आणि शिवसेनेचा कधी संबंध आला?- अजित पवार
* सध्या नावं बदलण्याचा जमाना, पेट्रोलचे नाव पंडीत दीनदयाळ उपाध्याय बहुमूल्य तरल पदार्थ असे ठेवले तर नवल नाही- छगन भुजबळ
* राष्ट्रवादीच्या ‘निर्धार रॅली’त रायगडमध्ये सुनील तटकरेंच्या प्रचाराचा फुटला नारळ
* नाशिक अहमदाबाद विमानसेवा सुरु होणार १३ फेब्रुवारीपासून
* आपच्या मीरा संन्याल यांचे निधन
* लवकरात लवकर राम मंदिर बांधायचे आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लवकर होण्याच्या प्रयत्नात आहोत, पण काँग्रेस अडचणी आणत आहे- अमित शाह
* २०१९ ला एनडीएचीच सत्ता येणार, भाजप नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढत आहे, पण काँग्रेसला नेतृत्वाचा चेहराच नाही - अमित शाह
* २०१९ ची लोकसभा निवडणूक दोन विचारांमधील लढाई - अमित शाह
* शारदा चिटफंड घोटाळा: पी. चिदंबरम यांची पत्नी नलिनी चिदंबरम यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल
* राजौरीतील नौशेरा सेक्टरमध्ये झालेल्या आयईडी स्फोटात मेजरसह एक जवान शहीद
* हरयाणात पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी राम रहीम दोषी, १७ जानेवारीला सुनावणार शिक्षा


Comments

Top