HOME   महत्वाच्या घडामोडी

देता की जाता? पतंगबाजीत दोघांचा मृत्यू, आज बेस्टचा नववा दिवस, नर्मदेत ०६ जणांचा मृत्यू, मायावतींच्या केकसाठी गोंधळ, मोदींचे विमान जमीनीवर, दात अनखे काढलेला वाघ!......१६ जानेवारी २०१९

देता की जाता? पतंगबाजीत दोघांचा मृत्यू, आज बेस्टचा नववा दिवस, नर्मदेत ०६ जणांचा मृत्यू, मायावतींच्या केकसाठी गोंधळ, मोदींचे विमान जमीनीवर, दात अनखे काढलेला वाघ!......१६ जानेवारी २०१९

* नाणार अणुउर्जा प्रकल्प रायगडमध्ये हलविण्याच्या हालचाली
* एक दिवसीय सामन्यात भारताने केली ऑस्ट्रेलियावर मात
* बेस्ट कर्मचार्‍यांचा संपाचा नववा दिवस
* संपाबाबत सरकार न्यायालयात आज बाजू मांडणार
* नर्मदा नदीत बोट उलटून ०६ जणांचा मृत्यू, ३६ जणांची प्रकृती गंभीर
* सर्वच विद्यापिठात १० टक्के सवर्ण आरक्षण लागू
* मुंबई मनपाच्या शिक्षण घेणार्‍यांना मनपाच्या नोकरीत प्राधान्य
* दोन ते तीन दिवसात कर्नाटकात भाजपाची सत्ता, भाजपचा दावा
* गोविंद पानसरे हत्या प्रकरणी कर्नाटकातून आणखी एकाला अटक
* पुणतांब्याच्या शेतकर्‍यांनी पुन्हा दिला आंदोलनाचा इशारा, देता की जाता नवी घोषणा
* पतंग उडवताना अपघात, दोघांचा मृत्यू
* नागपुरात एका घरात सापडले वयोवृद्ध स्त्री, पुरुषाचे मृतदेह
* मायावतींच्या वाढदिवसासाठी आणलेला केक नेण्यासाठी कर्यकर्त्यांचा गोंधळ
* मालेगावात आरोपीकडून दहा हजाराची लाच घेताना पोलिस निरिक्षक सापडला
* उद्धव ठाकरे यांच्यामुळे बेस्टचा संप चिघळला, कार्यकर्त्यांचा आरोप
* राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनाही मिळणार सातव्या आयोगाचा लाभ
* सवर्ण आरक्षण: सर्व शिक्षण संस्थांमध्ये होणार लागू
* साडेचार वर्ष हवेत उडणारे नरेंद्र मोदींचे विमान तीन राज्यातील निवडणुकीच्या निकालाने जमिनीवर आले- राजू शेट्टी
* विधानसभा निवडणुकीत राज्यात कमळाची पाकळी सुद्धा फुलणार नाहि- राजू शेट्टी
* शिवसेना-भाजप गेल्या साडेचार वर्षांपासून एकत्र सत्तेत असले तरी चौकातल्या कुत्र्यांसारखे भांडत असतात- धनंजय मुंडे
* दात आणि नखे काढलेला खेळण्यातल्या वाघासारखी सध्या महाराष्ट्रातील एका वाघाची सध्या अवस्था - धनंजय मुंडे
* नरेंद्र मोदींच्या भाजपने संबंध देशात सत्ता मिळवली पण जवाहरलाल नेहरू विद्यापीठावर झेंडा फडकवता आला नाही- शिवसेना
* विद्यापीठ निवडणुकीत मतदान ‘ईव्हीएम’ने होत नसल्याने विजय मिळवणे अवघड झाले का?- शिवसेना
* ‘राज: एक कटी पतंग’ भाजपाचे व्यंगचित्र, राज ठाकरे यांचे नरेंद्र मोदी आश्वासनांची पतंगबाजी करत असल्याच्या व्यंगचित्राला उत्तर
* बेगडी मराठी अस्मिता, टोलचा झोल, बारामतीची पोपटपंची, मराठी पाट्यांचे नाटक, ब्ल्यू प्रिंट थापा असे मजकूर लिहिलेले राज ठाकरेंचे पतंग कटलेले
* पुढारी म्हणवणारे तुमच्या डोक्यात राख घालतायेत, मेंदूवर अतिक्रमण करतायेत, तुम्ही करू देताय हे चुकीचे- नाना पाटेकर
* कराड तालुक्यात बलशाली युवा हृदय संमेलनात नाना पाटेकर यांचे युवावर्गाला मार्गदर्शन
* पुढाऱ्यांना आजवर खांद्यावर वागवलं पण, त्यांना आता खाली उतरवले गेले पाहिजे- नाना पाटेकर
* माध्यमांनी खूप छान घडतंय हे दाखवण्याची गरज, कोणीही येतो, काहीही बोलतो, त्यातून जाळपोळ होते हे बंद झाले पाहिजे- नाना पाटेकर
* आपल्या सरकारने विकासकामांचा डोंगर उभारला आहे, जनतेचा विश्वासही जिंकला आहे तरीही सर्वच विरोधक एकवटल्याने सावध रहा- रावसाहेब दानवे
* अमित शहा यांचा पुढील आठवडय़ात सांगली दौरा
* सोलापुरात काँग्रेसचे ‘वॉर्ड चलो अभियान’, भाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- सुशीलकुमार शिंदे
* प्रयागराजमध्ये राम मंदिर निर्माणासाठी उजळले ३३ हजार दिवे, कुंभमेळ्यातील पहिल्या शाहीस्नानाला ०२ कोटी भाविकांची उपस्थिती
* राम मंदिर बांधायला सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांमुळेच विलंब- संघाच्या राष्ट्रीय मुस्लीम मंचाचे निमंत्रक
* आलोक वर्मा यांच्यावरील कारवाईचा आणि १० जानेवारीच्या निवड समिती बैठकीचा तपशील उघड करावा- * * काँग्रेस


Comments

Top