HOME   व्हिडिओ न्यूज

निलेश राणेंच्या प्रतिमेला जोडे आणि शेण!

बाळासाहेबांविरुद्ध बोलल्याचा परिणाम, गोवले होते खुनात

निलेश राणेंच्या प्रतिमेला जोडे आणि शेण!

लातूर: आनंद दिघे यांच्या खुनात बाळासाहेबांचा हात होता. सोनू निगमलाही मारायचे होते असे आरोप काल निलेश राणे यांनी केले होते. यामुळे संतापलेल्या लातुरच्या शिवसैनिकांनी निलेशच्या प्रतिमेला जोड्यांचा हार घालून गांधीजींच्या पुतळ्याच्या कठड्याभोवती एक फेरी मारली. असांसदीय शब्दांचा वापर करीत शिव्याही दिल्या. नंतर या प्रतिमेला शेण फासण्यात आले. पोलिसांनी हस्तक्षेप केला पण त्यांचे काहीच चालले नाही. अखेर ती प्रतिमा टरकावण्यात आली. यापुढे निलेश राणेला लातूर जिल्ह्यात फिरकू देणार नाही. आलेच तर गाडीसह फुकून टाकू असा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नामदेव चाळक यांनी दिला. यावेळी सुनिता चाळक, विष्णू साबदे, शंकर रांजणकर, कुलदीप सूर्यवंशी, सौरभ बुरबुरे, अ‍ॅड नरेश कुलकर्णी, अ‍ॅड रवी पिचारे, सुनील फुलारी, अरुण सूर्यवंशी, रमेश माळी, रघू बनसोडे, महादेव कलमुकले, नागनाथ मांडेकर, सुनील पवार, विष्णू तिगिले, रमेश पतंगे, आकाश मसाने, संतोष माने आदीजण उपस्थित होते.


Comments

Top