HOME   महत्वाच्या घडामोडी

कश्मीर भारताचा पाकने लुडबूड थांबवावी- ओवेसी, पुन्हा मोदी आले तर विनाश अटळ-ममता, ठाकरे चित्रपटाला ब्रिगेडचा विरोध, झाकीर नाईकची संपत्ती जप्त, लालूंना जामीन, मोदींना अण्णांची ३२ पत्रे........२० जानेवारी २०१९

कश्मीर भारताचा पाकने लुडबूड थांबवावी- ओवेसी, पुन्हा मोदी आले तर विनाश अटळ-ममता, ठाकरे चित्रपटाला ब्रिगेडचा विरोध, झाकीर नाईकची संपत्ती जप्त, लालूंना जामीन, मोदींना अण्णांची ३२ पत्रे........२० जानेवारी २०१९

* काश्मीर हा भारताचाच भाग, पाकिस्तानने लुडबुड करणे बंद करावे- असदुद्दीन ओवेसी
* भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी तीन आरोपींना १५ दिवसांची कोठडी
* भारतीय चित्रपट संग्रहालयाचे नरेंद्र मोदींनी केले मुंबईत उद्घाटन, पायरसीला आळा घालण्यासाठी सिनेमॅटोग्राफी कायद्यात करणार बदल
* कोलकत्यात मोदीविरोधी २० दिग्गज नेत्यांची एकाच व्यासपिठावर हजेरी, होदी हटावचा नारा
* कोलकाता येथे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वाखाली महारॅलीचे आयोजन, महारॅलीत २२ पक्ष सहभागी
* केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची 'एक्स्पायरी डेट' संपली, हे सरकार पुन्हा आले तर देशाचा विनाश अटळ- ममता बॅनर्जी
* रथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही, बंगालमध्ये भाजपाला एकही सीट मिळणार नाही - ममता बॅनर्जी
* देशात सत्ताबदल होणे आवश्यक, मोदी सरकारला हटवण्यासाठी आम्ही एकत्र आलो- शरद पवार
* आम्ही युती केल्यामुळे मोदी अस्वस्थ झाले आहेत, नवीन वर्षात देशाला नवे पंतप्रधान लाभले तर आनंदच होईल - अखिलेश यादव
* कोलकात्यात विरोधी पक्षांच्या नेत्यांनी स्थापन केलेली महाआघाडी मोदीविरोधी नसून ती जनविरोधी- नरेंद्र मोदी
* बंगालमध्ये राजकीय पक्षांच्या कार्यक्रमावर बंदी घातली जाते, तिथे लोकशाही वाचवण्याचा उच्चार केला जातो, 'वाह, क्या सीन है'- नरेंद्र मोदी
* ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी महाराजांवरील दृश्याला आक्षेप- संभाजी ब्रिगेड
* मुंबईत १६ वी मॅरेथॉन, सकाळी साडेपाच वाजता सुरुवात, मेरी कोमने केले उदघाटन
* धनंजय महाडीक, सुप्रिया सुळे यांना ‘सांसद रत्न’ पुरस्कार
* मराठा आरक्षणाला आव्हान देणार्‍या याचिकेवर २३ जानेवारी रोजी सुनावणी
* शस्त्रास्त्रांचा साठा करणार्‍या धनंजय कुलकर्णीला तीन दिवसांची पोलिस कोठडी
* बेस्ट संपातील कर्मचार्‍यांचा पगार कापणार
* झाकीर नाईकची १६.४० कोटींची संपत्ती जप्त
* कर्जाच्या बदल्यात विमा पॉलिसीची जबरदस्ती करणार्‍या अधिकार्‍यांना झोडपून काढा- खा. राजू शेट्टी
* लालू प्रसाद यांना जामीन मंजूर
* जेईई परिक्षेत १५ विद्यार्थ्यांना मिळाले १०० गुण
* सांगलीत पोलिसांनी काढली गुंडांची धिंड
* बिबट्याची कातडी विकण्यासाठी नेणार्‍या एका तरुणाला ठाण्यात झाली अटक
* लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीबाबत नरेंद्र मोदींना ३२ पत्रे लिहिली पण एकाही पत्राचे उत्तर नाही- अण्णा हजारे
* काँग्रेस आणि राष्ट्रवादीत राज्यातील ४८ पैकी ४४ जागांवर एकमत
* मराठवाड्यात काँग्रेसची इच्छुकांच्या १२ जणांच्या यादीत ०८ जण मराठा, ०२ जण मुस्लीम, जैन आणि दलित प्रत्येकी एक उमेदवार
* नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर नागपूर ते औरंगाबाद अंतर तर अवघ्या तीन तासांचे
* डान्सबारच्या निषेधार्थ देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि पंकजा मुंडे यांना घुंगरु पाठवणार- राष्ट्रवादीच्या फौजिया खान
* ऑकेस्ट्राच्या नावाखाली मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई, पनवेल भागात 'छमछम' सुरूच असल्याची तक्रार
* कन्हैया कुमारविरोधातील आरोपपत्र फेटाळले कोर्टाने, आरोपपत्र दाखल करण्याआधी दिल्ली सरकारची परवानगी का घेतली नाही- कोर्टाचा प्रश्न
* इस्लामिक फाऊंडेशनच्या झाकीर नाईकच्या कुटुंबियांची १६.४० कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
* हिंदुत्ववाद आणि मोदीवाद यांचे गारुड लोकांच्या डोक्यातून दूर होत नाही, तोपर्यंत भारतावरील अरिष्ट टळणार नाही- कुमार केतकर
* राज्यात ०२ कोटी ६० लाख बालकांना गोवर- रुबेला लस, नाशिक, उस्मानाबाद, पुणे जिल्ह्यांत १०० टक्के लसीकरण पूर्ण- आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे
* सत्तेत येऊ तेव्हा तुम्हाला पळता भुई थोडी होईल, आता थोडेच दिवस उरले, मग बघा तुमचं कसं होईल, चुन चुनके… - धनंजय मुंडे
* माणूस हा जातीने मोठा होत नाही, जातीचं राजकारण करायला आलेल्याला प्रतिसाद दिला नाही- नितीन गडकरी
* नागपुरातील अनुसूचित समाज कायमच भाजपासोबत राहिला कारण नागपुरात जातीचं राजकारण चालतच नाही- नितीन गडकरीं
* भय्युजींनी लग्न करावे यासाठी पालक दबाव आणत होते, दुधाडे व देशमुखच्या मदतीने त्यांना औषधांचे जादा डोस दिले जायचे- पोलीस उपमहानिरीक्षक


Comments

Top