HOME   लातूर न्यूज

बालाजी मंदिरच्या जिर्णोद्धाराची आ. देशमुखांनी केली पाहणी

पुन: प्रतिष्ठापना महोत्सव व रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांची रामकथा

बालाजी मंदिरच्या जिर्णोद्धाराची आ. देशमुखांनी केली पाहणी

लातूर: येथील गाव भागातील श्री व्यंकटेश बालाजी मंदिरच्या जिर्णोद्धार निर्माणची माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी सोमवारी पाहणी करून त्यांनी श्री व्यंकटेश बालाजींचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे देवस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले. श्री व्यंकटेश बालाजी मंदिरचा जिर्णोद्धार व पुन: प्रतिष्ठापना महोत्सव व रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांच्या रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम कथेच्या मुख्य यजमान विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख या आहेत.
जिर्णोद्धार व पुन: प्रतिष्ठापना महोत्सव व त्याचबरोबर कीर्तन सोहळा ०८ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरू होणार असून तो १५ फेब्रुवारी २०१९ पर्यंत चालणार आहे. आ. अमित देशमुख यांनी जिर्णोद्धार निर्माणची तसेच श्रीराम कथेच्या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांना निर्माण कार्याची माहिती देण्यात आली. पुन: प्रतिष्ठापना महोत्सव व कथेच्या तयारीचे त्यांनी कौतुक केले.
याप्रसंगी श्री व्यंकटेश बालाजी देवस्थानचे अध्यक्ष श्रीनिवास लाहोटी, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष कांताप्रसाद राठी, सचिव विनोद अग्रवाल, विश्वस्त डॉ. अनिल राठी, लक्ष्मीनिवास अग्रवाल, प्रकाश कासट, माजी महापौर ऍड. दीपक सूळ, हुकूमचंद कलंत्री, नरेंद्र अग्रवाल, पांडुरंग मुंदडा, विक्रम गोजमगुंडे, जुगलकिशोर गिल्डा, रमेश राठी, नयन नावंदर, ओमप्रकाश डागा, विजयकुमार मुक्कावार, विष्णू कलंत्री, प्रवीण ब्रिजवासी, बजरंग जोशी, शिवकुमार मालू, राजेंद्र बाहेती, रामेश्वर तिवारी, हरिकिशन मालू, हरिकिशन तिवारी, सुगचंद पारीख, आर.आर. तापडीया, द्वारकादास सोनी, बजरंगलाल रांदड, जितेंद्र बजाज, प्रदीप धूत, श्याम खंडेलवाल, रमेश भुतडा, शोभा बियाणी, अर्चना सोमाणी, देवस्थानचे विश्वस्त, महोत्सव समितीचे सदस्य, भावीक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top