HOME   महत्वाच्या घडामोडी

प्रियंका गांधी राजकारणात, बाळासाहेबांच्या स्मारकाचे भूमीपूजन, पासपोर्टला चीप, फडणवीस म्हणतात पुढचा मुख्यमंत्री मीच, राणे स्वबळावर लढणार, मुंडेंच्या मृत्यूची चौकशी.......२३ जानेवारी २०१८

प्रियंका गांधी राजकारणात, बाळासाहेबांच्या स्मारकाचे भूमीपूजन, पासपोर्टला चीप, फडणवीस म्हणतात पुढचा मुख्यमंत्री मीच, राणे स्वबळावर लढणार, मुंडेंच्या मृत्यूची चौकशी.......२३ जानेवारी २०१८

* प्रियंका गांधी यांची कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड, उत्तरप्रदेशच्या प्रभारी
* मुख्यमंत्र्यांनी दिली उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जमिनीचे कागदपत्रे
* मुख्यमंत्री फडणवीस आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलं स्मारकाचं भूमीपूजन
* राष्ट्रवादी कॉंग्रेसची परिवर्तन यात्रा २४ जानेवारीला किल्लारीत, जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे राहणार उपस्थित
* बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे झाले भूमिपूजन
* बाळासाहेबांना लातुरच्या शिवाजी चौकात अभिवादन
* व्हीव्हीपॅट मतदान यंत्राबाबत लातुरात ०१ लाख नागरिकांचे प्रबोधन
* लातुरातीक परप्रांतीय मजुरांची नोंदणी करा- मनसे
* सरकारने काही न केल्यास सभासद आणि शेतकरी घेणार किल्लारी कारखान्याचा ताबा
* भाजपा-शिवसेना युती होणारच- नारायण राणे
* मुस्लीम समाजाच्या आरक्षणाची मागे
* मराठा आरक्षणाविरोधातील याचिका मागे
* परत कॉंग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही- नारायण राणे
* आज नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती
* सुप्रिया सुळे आणि उदयनराजे या दोघांची उमेदवारी निश्चित
* पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयाला विद्यापिठाचा दर्जा
* बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरकासाठी महापौर बंगल्याच्या जागेचं आज हस्तांतरण
* इसिस संघटनेचे सदस्य असल्याच्या संशयावरुन मुंब्रा आणि औरंगाबादेतून आठजण ताब्यात
* ब्राम्हण समाजाच्या मागण्या पूर्ण होतील, मुख्यमंत्र्यांचं तोंडी आअश्वासन
* ठाकरे चित्रपटाचा दिल्लीतील खास प्रदर्शनाला पंतप्रधान आणि दिग्गज उपस्थित राहणार
* एटीमनंतर आता पासपोर्टलाही चीप बसवणार
* एकतर्फी प्रेमातून नाशिकातील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्याने प्राध्यापिकेला कूंकू लावणाचा केला प्रयत्न
* पुढील वर्षीही मीच मुख्यमंत्रीपदी- ‘लोकसत्ता‘ वर्धापन दिनात मुख्यमंत्री
* बॉम्बेचे मुंबई नामकरण करणारी शिवसेनाच बॉम्बे उल्लेख करतेय, एमआयडीसीच्या डायरीत ‘बॉम्बे’ उल्लेख, सेनेकडेच उद्योग खाते- धनंजय मुंडे
* बाळासाहेबांची इच्छा होती शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली पाहिजे, यासाठी युतीत येण्याचा त्यांचा प्रस्ताव होता- रामदास आठवले
* आरक्षण, गरिबांना आर्थिक मदतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ, केजी ते पीजी मोफत शिक्षणासाठी ब्राह्मण समाजाचा मुंबईत मोर्चा
* शिवसेनेला कीक मारूनच सत्तेबाहेर काढावं लागेल- नारायण राणे
* भाजपा आणि सेना युती झाली तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राज्यात स्वतंत्रपणे लढेल- नारायण राणे
* पुण्यातील दापोडी भागात मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या कर्मचारी वसाहतीत ०७ वर्षाच्या मुलीची बलात्कार करून हत्या, आरोपीची आत्महत्या
* गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची आंतरराष्ट्रीय चौकशी व्हावी- जयंत पाटील
* आज नरेंद्र मोदी लाल किल्ल्यात करणार सुभाषचंद्र बोस संग्रहालयाचे उद्घाटन
* आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आज लखनऊ येथे घेणार अखिलेश यादव यांची भेट
* शबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱ्या कनक दुर्गाला घरात घेण्यास नवऱ्याचा आणि तिच्या भावाचा नकार
* काँग्रेस समर्थकांनीच लंडनमधील हॅकथॉनचे आयोजन केले, कपिल सिब्बल देखरेख करत होते यामागे राहुल गांधी- रवीशंकर प्रसाद
* गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू अपघातातच झाला, पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांचा अहवाल- रवीशंकर प्रसाद
* खाजगी कामासाठी लंडनला गेल्यावर हॅकेथॉनकडून बोलावणं आल्यामुळे तिथं गेलो- कपिल सिब्बल
* २०१४ च्या निवडणुकीत ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा दावा करणार्‍या सय्यद शुजाविरुद्ध केंद्रीय निवडणूक आयोगाची पोलिसांकडे तक्रार
* अमित शहा यांनी पश्चिम बंगालमधील मालदा येथे काढली 'लोकशाही बचाव' रॅली, बंगालला तृणमुलपासून मुक्त करण्यासाठी आलोय- अमित शहा
* विरोधकांची लालचीपणाची महाआघाडी, २३ नेत्यांपैकी ०९ जण पंतप्रधानपदाचे दावेदार, नरेंद्र मोदी हेच आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार- अमित शहा
* पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मजबूत सरकारची आवश्यकता- अमित शहा
* मध्यमवर्ग प्रामाणिकपणे कर भरत होता, अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या पक्षाने ८५ टक्के लुटीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, आम्ही लूट थांबवली- नरेंद्र मोदी
* जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, ०३ दहशतवाद्यांना कंठस्नान
* 'खूब लड़ी मर्दानी: झाँसी की रानी' या मालिकेच्या सेटवर भीषण आग, पूर्ण सेट जळून खाक, सुदैवाने जिवीत हानी नाही
* ज्योतिरादित्य शिंदे आणि माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट, मध्य प्रदेशात राजकीय वर्तुळात चर्चा
* पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील वाऱ्यांच्या परस्परविरोधी क्रियेमुळे शुक्रवारनंतर राज्यासह मध्य भारतात तुरळक ठिकाणी पाऊस


Comments

Top