HOME   महत्वाच्या घडामोडी

प्रियंका गांधी आयी है, नयी इंदिरा गांधी आयी है!

प्रियंकांच्या राजकारणात उतरण्यानं कुठे आनंद तर कुठे टीका

प्रियंका गांधी आयी है, नयी इंदिरा गांधी आयी है!

नवी दिल्ली: प्रियंका गांधी यांनी राजकारणात यावं अशी भावना अनेक वर्षांपासून कॉंग्रेसजनांत होती. ती आज पूर्ण झाली. त्यांना कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियंका यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या अर्ध्या भागाचे प्रभारीपदही देण्यात आले आहे. या निर्णयामुळे कॉंग्रेसजन खूष आहेत पण राहूल गांधी फेल गेल्याने कॉंग्रेसने राजकारणात आणखी एक गांधी आणली आहे अशी टीका भाजपातून होत आहे. प्रियंका यांची तुलना त्यांच्या आजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी केली जाते. राजकारणात सक्रीय नसतानाही अनेक सभांना त्यांनी हजेरी लावली होती. उत्तरप्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. ज्यांचे या राज्यावर प्रभुत्व आहे त्यांनाच पंतप्रधानपद मिळतं असाही इतिहास आहे. ही बाब जाणूनच कॉंग्रेसने त्यांना राजकारण आणले असे बोलले जाते. प्रियंका गांधी यांना राजकारणात आणावं अशी मागणी अनेक वर्षांपासून करीत होते. प्रियंका लाओ, कॉंग्रेस बचाओ अशाही घोषणा दिल्या गेल्या होत्या.


Comments

Top