HOME   लातूर न्यूज

अमित देशमुखांनी घेतली निलंगेकर यांची भेट

राजकीय आणि सामाजिक विषयांवर चर्चा

अमित देशमुखांनी घेतली निलंगेकर यांची भेट

लातूर : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या निलंगा येथील निवासस्थानी जाऊन अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटिचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी भेट घेतली व विविध राजकीय, सामाजिक विषयावर चर्चा केली. यावेळी लातूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील-निलंगेकर, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते ॲड. विक्रम हिप्परकर, निलंगा तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील आदी उपस्थित होते.


Comments

Top