HOME   महत्वाच्या घडामोडी

अंतरिम अर्थमंत्र्यांचा अंतरिम अर्थसंकल्प

अच्छे दिनच्या नावाने चांगभलं- आ. अमित देशमुख

अंतरिम अर्थमंत्र्यांचा अंतरिम अर्थसंकल्प

मुंबई: गेल्या चार–साडेचार वर्षांच्या काळात नुसत्याच घोषणाबाजी करणाऱ्या केंद्र सरकारने आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मांडलेला अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थमंत्र्यांचा अंतरिम अर्थसंकल्प आहे. अशी प्रतिक्रिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.
माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, गेल्या ४ वर्षात बेरोजगारीचा प्रश्न सर्वांत जास्त गंभीरर बनल्याची आकडेवारी पुढे आली आहे. याबाबत केंद्रीय अर्थसंकल्पात काहीही तरतूद करण्यात आलेली नाही. अल्पभूधारक शेतकऱ्यांना देवू करण्यात आलेली दरमहा पाचशे रुपयांची मदत अतिशय तोकडी आहे. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा घोषणा या सरकारने गेल्या चार-साडेचार वर्षांपासून केली आहे. मात्र कृषी उत्पादनात सातत्याने घट होत असल्याने दुप्पट उत्पन्न करण्याची घोषणा फसवी ठरणारी आहे. गेल्या चार वर्षातील सरकारच्या कामाचा अर्थसंकल्पात मांडण्यात आलेल्या आकडेवारीत कोणाचाही विश्वास बसणार नाही अशी आहे. कृषी, उद्योग क्षेत्राबरोबर पायाभूत क्षेत्राच्या विकासाची पिछेहाट होत असताना केवळ कागदावर मांडण्यात आलेल्या विकासाला जनता भुलणार नाही. अर्थसंकल्पाच्या मांडणीनंतर लगेचच वित्त मंत्र्यांना पत्रकार परिषद घेऊन आयकरासाठी उत्पन्नाची ५ लाख रूपये मर्यादा सरसकट नसल्याचे घोषीत करावे लागले आहे. यामुळे मोठा असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकारच्या घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये किती फरक आहे याचे उत्तम उदाहरण म्हणून याकडे पाहावे लागेल असेही आ. अमित देशमुख यांनी म्हटले आहे.


Comments

Top