logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   काल, आज आणि उद्या

अण्णाही ठाम, ममताही ठाम, सोनाली बेंद्रे फिल्मी दुनियेत परतली, सीबीआय तोता है, मोदींसोबत निवृत्त होईन, भाजपाचे एक पाऊल मागे......०५ फेब्रुवारी २०१९

अण्णाही ठाम, ममताही ठाम, सोनाली बेंद्रे फिल्मी दुनियेत परतली, सीबीआय तोता है, मोदींसोबत निवृत्त होईन, भाजपाचे एक पाऊल मागे......०५ फेब्रुवारी २०१९

* महाजन आणि भामरे यांनी केलेली मध्यस्थी नाकाम, अण्णा उपोषणावर ठाम
* कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता देण्याच्या आणि शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांवर अण्णा हजारे ठाम
* राज्यात प्रोटोकॉल असणार नाही, कायदा करा, अधिकाऱ्यांनी जनतेचे निवेदन स्विकारण्यासाठी आलेच पाहिजे, अन्यथा आंदोलन - अण्णा हजारे
* अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ नगरमध्ये खासदार दिलीप गांधींच्या घरासमोर आंदोलन, आंदोलकांनी केला बांगड्याचा आहेर
* अण्णांच्या उपोषणाचं राजकारण केलं जातयं- मुख्यमंत्री
* शिवसेना-भाजपा युतीची बोलणी अंतिम टप्प्यात
* शिवसेनेला एक जागा जादा देण्याची भाजपाची तयारी
* रत्नागिरीत जिल्हा शल्य चिकित्सकाला १५ हजारांची लाच घेताना अटक
* रत्नागिरीच्या जंगलात सात अजगरांची हत्या, चौघांना अटक
* ब्रिटन सरकारकडून विजय माल्याच्या प्रत्यार्पणास मंजुरी, अपिलासाठी १४ दिवसांची मुदत
* आर्थिक मागासांना १० टक्के आरक्षण लागू
* सरकारमुळे सीबीआय आरोपींवर मेहेरबान, ‘सीबीआय तोता है’च्या लोकसभेत घोषणा
* आज शिवसेनेच्या खासदारांची ११ वाजता बैठक, चार वाजता कोअर कमिटीची बैठक
* गोपीनाथ मुंडे यांचा घातपात झाला असेल तर त्याचा जीव घेईन- पंकजा मुंडे
* कसलाही नवा कर किंवा वाढ नसलेला अर्थसंकल्प मुंबई मनपाचा अर्थसंकल्प
* शरद पवार, अरविंद केजरीवाल, चंद्रबाबू नायडू ममता बॅनर्जी यांना पाठिंबा
* नरेंद्र मोदी जेव्हा निवृत्त होतील तेव्हा मीही राजकारणातून निवृत्त होईन- स्मृती इराणी
* कॉंग्रेसच्या सर्व प्रदेशाध्यक्षांची ०९ तारखेला दिल्लीत बैठक
* जालना जिल्ह्यात भातुकलीचा खेळ खेळताना लागलेल्या आगीत तीन बालकांचा मृत्यू
* २७ फेब्रुवारीला शेतकर्‍यांचा मोर्चा मुंबईत धडकणार
* अमेरिकेत थंडीमुळे २९ जणांचा मृत्यू
* कॅन्सरवर उपचार घेऊन अभिनेत्री सोनाली बेंद्रे पुन्हा फिल्मी दुनियेत परतली
* कोलकात्यातील दंगल आणि सर्व घटनाक्रमाकडे पंतप्रधान म्हणून पाहावे- शिवसेना
* नरेंद्र मोदी आधी पंतप्रधान नंतर भाजपाचे नेते, देशात अशांतता व भयाचे वातावरण निर्माण होणे लोकशाहीला मारक- शिवसेना
* पश्चिम बंगालच्या भूमीवर जे राजकीय युद्ध पेटले आहे ती नव्या अराजकतेची ठिणगी- शिवसेना
* ममता बॅनर्जी यांनी कितीही आततायीपणा केला, तर आमचे कार्यकर्ते माघार घेणार नाही- रविशंकर प्रसाद
* देशाच्या आणि राज्यघटेच्या संरक्षणासाठी सत्याग्रह सुरूच राहणार, कोणतीही तडजोड केली जाणार नाही- ममता बॅनर्जी
* मागण्या मान्य होऊनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने किसान सभेची २० फेब्रुवारी रोजी नाशिक ते मुंबई असा १८० किलोमीटरचा पायी मोर्चा
* अयोध्येतील वादग्रस्त परिसराजवळ भूसंपादनासाठी १९९३ मध्ये केलेल्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात
* पश्चिम बंगालचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्तांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सीबीआयची याचिका
* सीबीआयचे नवनियुक्त संचालक ऋषीकुमार शुक्ला यांनी स्वीकारला पदाचा कार्यभार
* काँग्रेस आमदारांच्या नियमित संपर्कात, राज्यातील जेडीएस - काँग्रेस आघाडी सरकारला कोणताही धोका नाही- कर्नाटकचे मुख्यमंत्री
* भाजपमध्ये नितीन गडकरी एकमेव थोडीफार धमक असलेले नेते, सरकार टाळत असलेल्या मुद्द्यांवरही गडकरींनी बोलावं- राहुल गांधी
* माझ्या हिमतीसाठी तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही - नितीन गडकरी
* समाजमाध्यमांवरून भाजप व संघाकडून प्रियंका गांधींविरोधात सवंग प्रचार, या विरोधात महिला शाखेची दिल्ली पोलिसात तक्रार
* देशात आणि देशाबाहेर भारतीयांनी दडविलेल्या काळ्या पैशाचे तीन अहवाल जाहीर करण्यास अर्थमंत्रालयाचा नकार
* संसदीय पॅनेल अहवालांची शहानिशा करत असल्याने अहवाल उघड केल्यास सभागृहाचा हक्कभंग- मंत्रालयाचे स्पष्टीकरण
* शशी थरूर यांच्याविरोधातील सुनंदा पुष्कर खून प्रकरण दिल्ली कोर्टाने पाठवले सत्र न्यायालयात
* अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ऑगस्टा वेस्टलॅँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणातील आरोपी राजीव सक्सेनाच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
* पंजाब नॅशनल बँकेचे १३ हजार कोटी बुडवणार्‍या मेहुल चोक्सी अद्यापही भारताचा नागरिक, चोक्सीने अँटिग्वाचे नागरिकत्व स्वीकारले
* दुसऱ्या पक्षाकडून पैसे उकळण्यासाठी न्यायालयाचा वापर नको- दिल्ली न्यायालयाने पोटगी मागणारी याचिका फेटाळली, महिलेला ०१ लाखाचा दंड
* पत्रकारांना देशभरातील पथकरात सूट देण्याची अरविंद केजरीवाल यांची मागणी


Comments

Top