HOME   टॉप स्टोरी

‘जॉब दो जबाब दो’ राष्ट्रवादीचा मोर्चा, धरणे, निदर्शने

०२ कोटी रोजगाराचे आश्वासन फोल, बेरोजगारीत वाढ

‘जॉब दो जबाब दो’ राष्ट्रवादीचा मोर्चा, धरणे, निदर्शने

लातूर: सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे रोजगार दिला नाही, रोजगाराची टक्केवारीही कमी झाली आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या लातुरच्या राष्ट्रवादीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जॉब दो असा नारा देत सरकारला जवाबही विचारला. भाजपाने निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने पाळली नाहीत. यामुळे हे सरकार खोटारडे असल्याचा आरोप प्रशांत पाटील यांच्यासह अनेकांनी केला आहे. या मोर्चासाठी लातूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. या मोर्चातील बेरोजगार युवकांसाठी दरवर्षी ०२ कोटी रोजगार निर्मिती केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. पण मागील साडेचार वर्षात रोजगारामध्ये वाढ झाली नाही. तर त्यात घट झालेली दिसून आली. यामुळे राज्य सरकारने रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी चंदन नागराळकर, बस्वराज पाटील, संजय शेटे, बाबासाहेब पाटील, मकरंद सावे, पप्पू कुलकर्णी, संजय बनसोडे, आशिष वाघमारे, अ‍ॅड. निशांत वाघमारे, मदन पाटील, बबन भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर या कार्यकर्त्यांनी धरणे धरले, निदर्शनेही केली.


Comments

Top