HOME   महत्वाच्या घडामोडी

लातूर केबलचे कंट्रोल रुम जळाले, मधुबालाची जयंती, भुजळांना लोकसभेचा आग्रह, राज ठाकरेंना आघाडीची संमती, फेसबुकचे फिल्टर सेंटर, बीएसएनएल बंद होण्याची शक्यता.......१४ फेब्रुवारी २०१९

लातूर केबलचे कंट्रोल रुम जळाले, मधुबालाची जयंती, भुजळांना लोकसभेचा आग्रह, राज ठाकरेंना आघाडीची संमती, फेसबुकचे फिल्टर सेंटर, बीएसएनएल बंद होण्याची शक्यता.......१४ फेब्रुवारी २०१९

* नांदेडला २० तारखेला आघाडीची सभा, राहूल गांधी आणि शरद पवार राहणार उपस्थित
* लातूरच्या हाथवे केबल कार्यालयात आणि कंत्रोल रुममध्ये काही केबल ऑपरेटर्सनी लावली आग लाखोंचे नुकसान
* कंट्रोल रुममधील केबलचे बॉक्स आणि इतर यंत्रसामुग्रीही जळाली, ०५ ते १० लाखांचे नुकसान
* लातूर कोर्टाच्या ताब्यातील इमारतींची दारं, ग्रील, खिडक्या आणि अन्य साहित्य जमावाने केले लंपास
* कॅगचा अहवाल राज्यसभेत सादर, राफेल खरेदीत १७ टक्के फायदा झाल्याचा निष्कर्ष
* आज भजपाचे नेते मातोश्रीवर येण्याची शक्यता
* राष्ट्रवादीच्या सांसदीय समितीची आज बैठक
* ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वाघ यांचं निधन
* छगन भुजबळांना लोकसभा लढवण्यासाठी आगह, आग्रह समीर भुजबळांच्या नावावर ठाम
* माढ्याची जागा शरद पवार यांना द्या, विजयसिंह मोहिते पाटील यांची मागणी
* शरद पवार यांची उमेदवारी आज घोषित होण्याची शक्यता
* अजित पवार आणि राज ठाकरे यांची दीड तास चर्चा, बैठक गुप्त
* राज ठाकरे शरद पवार यांची भेट घेणार
* मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत- मुलायमसिंग यादव
* बेस्ट प्रशासनाने नऊ दिवसांच्या संपाच्या काळातील पगार कापला
* रेल्वेचा इतिहास सांगणार्‍या प्रदर्शनाचं बांद्र्यात उदघाटन
* मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना जीवन गौरव पुरस्कार
* अभिनेत्री मधुबाला यांचा आज जन्मदिन आणि व्हलेंटाईन डे
* भिवंडी, पालघर किंवा जळगावपैकी एका जागेची शिवसेनेची मागणी नाकारली भाजपने, युती होण्याची शक्यता, भाजप २५, सेना २३ होणार वाटप
* मनसेला आघाडीत घेण्यास राष्ट्रवादी सकारात्मक, अंतिम निर्णय सोपविला कॉंग्रेसवर
* बारामतीत गोडसेचा पुनर्जन्म होणार नाही, बारामतीत कमळ कधीच फुलणार नाही- बारामतीत लागले पोस्टर्स
* औरंगाबादेत शिवजयंतीनिमित्त शिवचरित्राचे सामुदायिक पठण
* भारिप बहुजन महासंघ, माकप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना सोबत घेण्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं एकमत
* 'महाआघाडी'तील जागावाटपाचं सूत्र झाले निश्चित, राज्यात प्रकाश आंबेडकरांना ०४ जागा मिळण्याची शक्यता
* कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी पाचही मानवी हक्क कार्यकर्त्यांवर आरोपपत्र दाखल करण्यास सर्वोच्च न्यायालयाची मुदतवाढ
* दाभोलकर हत्या प्रकरणी संशयित हल्लेखोर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर विरोधात आरोपपत्र दाखल
* सलीम अली सरोवराला जैवविविधता वारसास्थळ जाहीर न केल्याने औरंगाबाद पालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना हजर राहण्याचे आदेश
* 'हिरकणी महाराष्ट्राची' या स्पर्धेतून राज्यात महिला सक्षमीकरणाला चालना मिळण्यास मदत होईल- सुरेश प्रभू
* फ़ेसबुकवरची पोस्ट खरी की खोटी कळणार, फ़ेसबुकचे फ़िल्टर सेंटर औरंगाबादेत
* बीएसएनएल सातत्याने तोट्यात असल्याने कंपनी बंद करण्याचा केंद्र सरकारचा विचार
* काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांची आज दुपारी पत्रकार परिषद
* दिल्लीतील करोलबाग येथील हॉटेल अर्पित पॅलेसमध्ये झालेल्या अग्निकांडात अक्कलकोट तालुक्यातील एकाचा मृत्यू
* पाचगणी येथे पॅराग्लायडिंग करताना डोंगराला धडकून कोरियाच्या नागरिकाचा मृत्यू
* नरेंद्र मोदी येणार पांढरकवडा येथे महिला बचत गटाच्या मेळाव्याला, मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीची घोषणा करण्याची महिलांची मागणी
* घरगुती पाइप गॅस आणि सीएनजी दरांत ०१ एप्रिलपासून १० टक्के वाढ होण्याची शक्यता
* रॉबर्ट वाड्रा आणि त्यांच्या आईची ईडीकडून पुन्हा चौकशी
* जम्मू-काश्मीरमध्ये खाजगी शाळेत स्फोट
* उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि महान दल पक्ष लढवणार एकत्र निवडणूक


Comments

Top