HOME   व्हिडिओ न्यूज

शिक्षकांनी घातले दंडवत, अनुदानासाठी आंदोलन

शिक्षकांच्या आत्महत्यांना सरकार जबाबदार, मुंबईत अन्नत्याग आंदोलन

शिक्षकांनी घातले दंडवत, अनुदानासाठी आंदोलन

लातूर: २०१२ पासून काही शाळांमधील वाढीव तुकड्या विना अनुदानीत तत्वातर असून त्यांना अनुदानित करण्यात यावेत या मागणीसाठी लातूर शहरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयावर शिक्षक भारती या संघटने मार्फत दंडवत मोर्चा काढण्यात आला. शिक्षक हे आत्महत्या करत आहेत. त्या थांबवायच्या असल्यास शिक्षण मंत्री विनोद तावडे यानी तात्काळ या तुकड्यांना अनुदानित करण्याचे आदेश द्यावेत. शिक्षणमंत्र्यांनी शिक्षक मरण्याची वाट पाहू नये अन्यथा येणार्‍या अधिवेशनात आझाद मैदान मुंबई येथे अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी सचिन चव्हाण यांनी दिला आहे. शिक्षकांच्या होत असलेल्या आत्महत्यांना सर्वस्वी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री हे जबाबदार असतील. वेळोवेळी अंदोलने करुन काही उपयोग झाला नसल्याचा सूर या शिक्षकांमधून ऐकण्यात येत होता. यावेळी अचिन गिरवलकर, लिंबराज माने, राजेंद्र मंठाळे, तात्याराव गंपले, सुनिल सुर्यवंशी, लक्ष्मी ढेंकरे, भारत गायकवाड, विश्वनाथ खंदाडे, दयानंद बानापूरे, शिवकुमार अंबुलगे, गौरव शिंदफळकर, शाम लवांडे उपस्थित होते.


Comments

Top