HOME   लातूर न्यूज

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर

शासन निर्णयास विरोध; निर्णय मागे घेण्याचे आवाहन

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर

लातूर : राज्य शासनाच्या वतीने एकाकी पदाबाबत काढण्यात आलेला शासन निर्णय रद्द केला जात नसल्याच्या विरोधात राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर महासंघाने आज ०५ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार केला असून यात लातूर जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी होणार आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ०७ डिसेंबर रोजी काढण्यात आलेला शासन निर्णय त्वरीत रद्द करण्याची मागणी कर्मचारी महासंघाने केली होती. त्यानंतर राज्यपालांकडे दाद मागितली मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. या जाचक निर्णयाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यामध्ये संतापाची लाट आहे. त्यामुळे ०५ मार्चपासून राज्यातील कर्मचारी संपावर जात आहेत.
शिक्षकेतर कर्मचारी संपावर गेल्याने उत्तरपत्रिका मूल्यांकन कार्यात अडसर येऊ शकते त्यामुळे शिक्षकेतर कर्मचारी यांच्या या संपाला मुंबई येथील प्राचार्य संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. लातूर येथे प्राचार्य डॉ. पिल्लई यांना कर्मचारी संपावर असल्याची नोटीस देणारे निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे राज्य प्रतिनिधी तथा स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड अशासकीय कर्मचारी महासंघाचे विभागीय सहसचिव धनराज जोशी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.


Comments

Top