HOME   टॉप स्टोरी

लोभे कुटुंबाचा मतदानावर बहिष्कार!

अवयवदानानंतर कुणीच मदत केली नाही, कुटुंबियाचं टाऊन हॉलवर उपोषण

लोभे कुटुंबाचा मतदानावर बहिष्कार!

लातूर: २०१७ च्या नवव्या महिन्यात २५ तारखेला किरण लोभे या तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या अवयव दानाचा निर्णय घेतला. हृदय, मूत्रपिंड आणि डोळे दान करण्यात आले. लातूरमधली ही पहिलीच घटना. या गरीब कुटुंबाला आधार देण्याचे आश्वासन आमदार, प्रशासन आणि नगरसेवकांनी दिले ते कुणीच पाळले नाही. अडचणीत आलेल्या या कुटुंबाने आज मतदानावर बहिष्कार टाकला आणि टाऊन हॉलच्या मैदानावर उपोषण सुरु केले. त्याला अनेकांनी साथ दिली. यात किरणची आई लताबाई, भाऊ सचिन आणि विकास सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी या कुटुंबाला भेटण्याचं आश्वासन दिलंय असं समजतं पण त्याला दुजोरा मिळाला नाही.


Comments

Top