HOME   महत्वाच्या घडामोडी

सचिन नाबाद ४७, मोदीविरोधी लाट पण इव्हीएम घोटाळा शक्य, पुण्यात सर्वात कमी मतदान, राहूल गांधींचं बौध्दीक वय १० वर्षे, राऊत-ठाकरेंविरुद्ध वॉरंट.......२४ एप्रिल २०१९

सचिन नाबाद ४७, मोदीविरोधी लाट पण इव्हीएम घोटाळा शक्य, पुण्यात सर्वात कमी मतदान, राहूल गांधींचं बौध्दीक वय १० वर्षे, राऊत-ठाकरेंविरुद्ध वॉरंट.......२४ एप्रिल २०१९

* सचिन तेंडुलकरचं ४७ व्या वर्षात पदार्पण, शतकांचा शतकवीर, जगाभर नाव
* देशात मोदीविरोधी लाट पण इव्हीएम घोटाळा होऊ शकतो, शरद पवारांचं मत
* १५ राज्यात ६४.६६ टक्के मतदान
* महाराष्ट्रात १४ मतदारसंघात झालं मतदान
* पुण्यात सर्वात कमी मतदान, सर्वाधिक मतदान झाले कोल्हापुरात
* राहूल गांधी म्हणतात अमित शाह हत्येचे आरोपी
* वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित केल्याबद्दल संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना वॉरंट
* अनंतनागमधील ४० मतदान केंद्रावर एकही मतदार फिरकला नाही
* पंतप्रधान हा कुठल्याही एका धर्माचा असू शकत नाही- शरद पवार
* अभिनेता अक्षयकुमारने घेतली पंतप्रधानांची भेट, मुलाखतही घेतली
* पश्चिम बंगालमधे कॉंग्रेस आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यात तुफान हाणामारी
* राहूल गांधी यांचं बौध्दीक वय अवघं दहा वर्षे, शिराजसिंह चौहान यांचा अहवाल
* मोदींनी आचारसंहिता भंग केल्याची कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार
* शिवसेनेलाही मत देऊ नका, राज ठाकरे यांचं आवाहन
* राज ठाकरे म्हणतात, नोटाबंदी हा १९४७ नंतरचा सर्वात मोठा घोटाळा
* उदयनराजे यांनी केलं मतदान, माध्यमांना चुकून दाखवली करंगळी
* स्वाईन फ्लू पुन्हा तेजीत, राज्यात चार महिन्यात १२० जणांचा मृत्यू
* मुंबईतील कोस्टल रोडच्या निर्मितीला पुन्हा उच्च न्यायालयाची बंदी
* केश कलावंत जावेद हबीब यांनी केला भाजपात प्रवेश, अनेक नेत्यांची हेअर स्टाईल बदलली!


Comments

Top