HOME   महत्वाच्या घडामोडी

भिमा-कोरेगाव प्रकरणी बुधवारी ‘महाराष्ट्र बंद’

बंद शांततेत पाळण्याचे प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

भिमा-कोरेगाव प्रकरणी बुधवारी ‘महाराष्ट्र बंद’

पुणे: भिमा-कोरेगाव विजयदिनाच्या कार्यक्रमानंतर सणसवाडी येथे झालेल्या हाणामारी झालेल्या त्यात एका २८ वर्षांच्या तरुणाचा मृत्यु झाला, त्यांचे नाव राहुल असून तो नांदेड येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते आहे. मताच्या कुटुंबियाला १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. न्यायालयीन चौकशीचेही आदेश दिले जात आहेत. भिमा कोरेगावच्या ऎतिहासीक लढाईस दोनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पेरणेफ़ाटा येथील ऎतीहासिक विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी विविध संघटनांनी सोमवारी अलोट गर्दी केली होती. या कार्यक्रमानंतर सणसवाडी परिसरात दोन गटांमध्ये तुफ़ान दगडफ़ेक झाली. जवळपास २५ वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले असून आज प्रकाश आंबेडकर यांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
मरण पावलेल्या राहूल नामक तरुणाचा मृतदेह पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आला होता. दरम्यान जमावाने पोलीस व्हॅन जाळली. दगडफ़ेकीनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. काल संध्याकाळी ०७ च्या सुमारास परस्थिती नियंत्रणात आली. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. मुंबईमध्ये काही अंदोलकांनी चेंबुरमध्ये रेल रोको करण्यात केला. तसेच आज सकाळी ११. ४५ वाजता काही आंदोलकांनी चेंबूर स्टेशनमध्ये घुसून घोषणाबाजी केली. त्यानंतर काही तरुणांनी रेल्वे रुळावर ठाण मांडून घोषणा द्यायला सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना रेल्वे रुळावरून बाजूला केले. यावेळी बेस्ट बसेसनाही टार्गेट करण्यात आल्याचं समजत आहे.
अमर महल जंक्शन येथेही रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणा देत बेस्ट बसेससह अनेक वाहनांची तोडफोड केली. चेंबूरमधील या आंदोलनाचे लोण गोवंडी, मानखुर्द, मुलूंड, विक्रोळी आणि सायनपर्यंत पोहचलं. या भागात अनेक ठिकाणी रास्तारोको करण्यात आला. औरंगाबाद शहरासह १३ शहरात जमावबंदी लागू करुन कलम १४४ लावण्यात आले आहे. उस्मानपुरा, क्रांती चौक, टीव्ही सेंटर चौक, टाऊन हॉलसह शहरातील अनेक भागात जमावाने दुकाने बंद करण्यास भाग पाडले. घोषणा देत रास्ता रोको केले. काही भागात एसटी आणि चारचाकी गाड्यांवर दगडफेक करण्यात आल्याचे प्रकार घडले. मात्र, पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेत वेगात हालचाली केल्या. शहरातील प्रमुख चौकात बंदोबस्त लावून आंदोलकांना कारवाईचे आश्वासन दिले. त्यामुळे नंतर परिस्थिती नियंत्रणात आली. मराठवाड्यात नांदेड, परभणी आणि लातूर येथेही असे प्रकार घडले. लातूरमध्ये दोन बसेसवर दगडफ़ेक करण्यात आली. त्यानंतर काही युवकांना पोलीसांनी ताब्यात घेतले व चौकशीनंतर सोडून देण्यात आले. प्रकाश आंबेडकर यांनी दुपारी पत्रकार परिषद घेवुन उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली. लातुरातही बंद पाळला जाणार आहे. हा बंद शांततापूर्वक मार्गाने पाळावा असे आवाहन करण्यात आले आहे.


Comments

Top