logo
news image कल्पना गिरी प्रकरणातील महेंद्रसिंह चौहानला सशर्त जामीन, मात्र लातूर जिल्ह्यात प्रवेशबंदी news image उदगीर: जगाने बंदी घातलेल्या मोदींना संघाने पंतप्रधान केले- प्रकाश आंबेडकर news image मराठा आरक्षण प्रकरणी ओबीसी संघटनेची आज जागर बैठक news image योगेंद्र यादव महा आघाडीत जाणार नाहीत news image मराठा आरक्षण विरोधी जनहित याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी news image कोल्हापूर महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना राहणार तटस्थ, नगरसेवक सहलीला news image सांगलीतील मुक्त विद्यापिठाच्या वर्गात मित्रानेच मैत्रीणीची केली बेंचवर डोके आपटून हत्या news image सीएम चषक स्पर्धेत १२ क्रीडा प्रकार, जालन्यात झाले उदघाटन news image कोल्हापूर-हैद्राबाद विमानसेवा सुरु news image उद्यापासून संसदेचं हिवाळी अधिवेशन news image नेवास्यात शेतकर्‍याने दीड टन कांदा वाटून टाकला, दानपेटी ठेवली, त्यातले पैसे मुख्यमंत्र्यांना पाठवणार news image निळवंडे धरणासाठी शिर्डी संस्थानचे ५०० कोटी. निळवंडेकरांनी काढली नतनस्तक रॅली news image धुळे व नगर महापालिकांचे आज निकाल, साडेअकरापर्यंत राजकीय चित्र स्पष्ट होण्याची शक्यता news image राम मंदिरासाठी केंद्राने कायदा करावा यासाठी संघाकडून दबाव news image नव्या वर्षात तूरडाळ, हरभरा डाळीसह उडीद डाळी गाठणार शंभरी

HOME   काल, आज आणि उद्या

लातुरचा बंद शांततेत, लालूंचा आज फैसला, आज ट्रीपल तलाक राज्यसभेत, ५८० दहशतवादी ठार, कांबळी आता प्रशिक्षक.....०३ जानेवारी २०१८

लातुरचा बंद शांततेत, लालूंचा आज फैसला, आज ट्रीपल तलाक राज्यसभेत, ५८० दहशतवादी ठार, कांबळी आता प्रशिक्षक.....०३ जानेवारी २०१८

* लातूर बंद शांततेत सुरु, अनेक दुकाने कालपासूनच राहिली बंद
* लातुरात सर्वच आंबेडकरवादी संघटनांचा बंदमध्ये सहभाग
* आंबेडकर चौकातून कार्यकर्ते बंद करीत निघाले, पाच नंबर चौकाकडे कूच
* औरंगाबादेत बस सेवा बंद
* मिलिंद एकबोटे यांच्या घरावर काढणार मोर्चा
* शांततेतच बंद पाळावा, कुणालाही जबरदस्ती करु नये, प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन
* प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला राज्यातील २५० हून अधिक डाव्या- पुरोगामी संघटनांचा पाठिंबा
* महाराष्ट्र बंदला रिक्षा-टॅक्सी संघटनेचा पाठिंबा, कडेकोट बंदोबस्तात एसटी राहणार चालू, तोडफोड करु नका परिवहन मंत्र्यांचं आवाहन
* भीमा-कोरेगाव हिंसाचारात राज्यभरात १८७ बसची तोडफोड
* औरंगाबादमधील मध्यवर्ती बस स्थानकात उभ्या असलेल्या तीन शिवशाही बस आणि एका एसटीची अज्ञातांकडून तोडफोड
* मिलिंद एकबोटे, मनोहर भिडे भिमा-कोरेगाव दंगलीचे सूत्रधार, प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
* आज महाराष्ट्रभरातील स्कूल बसेस राहणार बंद, मुंबईतले डबेवालेही पाळणार बंद
* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाने आजच्या परिक्षा पुढे ढकलल्या
* भिमा कोरेगाव प्रकरणात एका महिलेच्या तक्रारीवरुन संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल
* अ‍ॅट्रॉसिटी, खुनी हल्ला, हत्यारबंदी, दंगल कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल
* जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्या विरोधात पुण्याच्या डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल, जिग्नेशने चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप
* बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अनेक ठिकाणी झाला रास्ता रोको, घाटकोपरचा रास्ता रोको चालला रात्रीपर्यंत
* आंबेडकरवादी संघटनांनी पुकारलेल्या आजच्या बंदमुळे महाराष्ट्रभर पोलिस बंदोबस्तात वाढ
* सोशल मिडियावर अफवा पसरवणार्‍यांवर होणार कारवाई- मुख्यमंत्री
* भिमा कोरेगावात मरण पावलेल्या तरुणाच्या प्रकरणी हत्येचा गुन्हा, सीआयडी चौकशी, नुकसान झालेल्या वाहनमालकांना राज्य सरकारकडून मिळणार मदत
* भिमा कोरेगावात पुरेशी सुरक्षा नव्हती शरद पवार यांचा आरोप, ही दंगल पूर्वनियोजित कट शिवसेनेचा दावा
* पुण्यातील शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाला राज्य मंत्रीमंडळाची मंजुरी, चार वर्षात होणार पूर्ण
* चंद्रपुरातील वरोरा वीज उपकेंद्रात लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, ३५ गावांचा वीज पुरवठा खंडीत
* तिहेरी तलाकला फौजदारी गुन्हा ठरवणारं विधेयक आज राज्यसभेत होणार सादर, कॉंग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
* पंढरपूर मंदिरात लाडू प्रसादाच्या दरात वाढ, दहा रुपयात मिळणारे दोन लाडू आता पंधरा रुपयांना
* कमला मील आग प्रकरणी उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल, सीबीआय चौकशीचीही मागणी
* कमला मील आग प्रकरणी मुंबई मनपावर २५ जानेवारी रोजी काढणार मोर्चा, शिवसेना गप्प का? - आ. नितेश राणे
* रणजी करंडक पहिल्यांदाच जिंकणार्‍या विदर्भ संघाला मिळणार पाच कोटींचे बक्षीस
* विनोद कांबळी आता करणार प्रशिक्षक म्हणून काम
* चारा घोटाळा प्रकरणी राजद नेते लालूप्रसाद यादव यांना आज विशेष न्यायालय सुनावणार शिक्षा
* आज सावित्रीबाई फ़ुलेंची जयंती, साजरी होत आहे बालिका दिन म्हणून
* आज शासकीय सुट्टी जाहीर केलेली नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाचे स्पष्टीकरण
* राज्यातील शाळा आणि कॉलेजेस सुरूच राहणार- शिक्षण विभाग
* औरंगाबादमध्ये दगडफेकीत पोलीस कर्मचारी जोतिबा गाडगे जखमी
* समाजात काही घटक जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना बळी पडू नका, शांतता राखा- स्वयंसेवक संघ
* भिमा कोरेगावच्या हिंसाचारानंतर हिंदुत्ववादी नेत्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाल्याने भाजपची कोंडी होण्याची शक्यता
* भाजप आणि चंद्रकांत पाटीलांना शह देण्यासाठी कोल्हापूरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना एकत्र, राजकारणात हा ‘कोल्हापूर पॅटर्न’ येण्याची शक्यता
* कमला मिलचे मालक रमेश गोवानी यांना समन्स
* आयआयटी मुंबईत आता मिळणार चित्रपटनिर्मितीचे धडे, वैद्यकीय, फायनान्स, फाइन आर्टसचे अभ्यासक्रमही सुरू करण्याचा मानस
* अमित शहा राज्यसभेत आज किंवा उद्या वस्तू आणि सेवा करावर करणार भाषण
* ‘एमबीए’ पेपरफुटीप्रकरणी मराठवाडा विद्यापीठाची तीन जणांची चौकशी समिती
* काँग्रेसने लोकसभेत विधेयकात सुधारणा सुचविण्याचा आग्रह धरला नाही, तीच भूमिका राज्यसभेत घ्यावी- संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार
* तीन वर्षात ५८० दहशतवादी ठार झाल्याची केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांची लोकसभेत माहिती


Comments

Top