logo
news image कल्पना गिरी प्रकरणातील महेंद्रसिंह चौहानला सशर्त जामीन, मात्र लातूर जिल्ह्यात प्रवेशबंदी news image उदगीर: जगाने बंदी घातलेल्या मोदींना संघाने पंतप्रधान केले- प्रकाश आंबेडकर news image मराठा आरक्षण प्रकरणी ओबीसी संघटनेची आज जागर बैठक news image योगेंद्र यादव महा आघाडीत जाणार नाहीत news image मराठा आरक्षण विरोधी जनहित याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी news image कोल्हापूर महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना राहणार तटस्थ, नगरसेवक सहलीला news image सांगलीतील मुक्त विद्यापिठाच्या वर्गात मित्रानेच मैत्रीणीची केली बेंचवर डोके आपटून हत्या news image सीएम चषक स्पर्धेत १२ क्रीडा प्रकार, जालन्यात झाले उदघाटन news image कोल्हापूर-हैद्राबाद विमानसेवा सुरु news image उद्यापासून संसदेचं हिवाळी अधिवेशन news image नेवास्यात शेतकर्‍याने दीड टन कांदा वाटून टाकला, दानपेटी ठेवली, त्यातले पैसे मुख्यमंत्र्यांना पाठवणार news image निळवंडे धरणासाठी शिर्डी संस्थानचे ५०० कोटी. निळवंडेकरांनी काढली नतनस्तक रॅली news image धुळे व नगर महापालिकांचे आज निकाल, साडेअकरापर्यंत राजकीय चित्र स्पष्ट होण्याची शक्यता news image राम मंदिरासाठी केंद्राने कायदा करावा यासाठी संघाकडून दबाव news image नव्या वर्षात तूरडाळ, हरभरा डाळीसह उडीद डाळी गाठणार शंभरी

HOME   काल, आज आणि उद्या

नायगारा गोठला, राष्ट्रवादीचे हल्लाबोल, सोयाबीनचे अनुदान पडून, सायराबानोची तक्रार, कोळंबी इस्लामला अमान्य, एअर इंडियाला हवी संधी.....०८ जानेवारी २०१७

नायगारा गोठला, राष्ट्रवादीचे हल्लाबोल, सोयाबीनचे अनुदान पडून, सायराबानोची तक्रार, कोळंबी इस्लामला अमान्य, एअर इंडियाला हवी संधी.....०८ जानेवारी २०१७

* जळकोट साठवण तलावातील १५ वीज पंप जप्त
* लातूर जिल्ह्यात सोयाबीनचे एक कोटीचे अनुदान पडून
* उदगीर येथे राज्य गुप्त वार्ता विभागाचे उपकेंद्र सुरु
* दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धेत जीवन विकास प्रतिष्ठान विद्यालयाला २२ पारितोषिके
* बीड येथे २०-२१ जानेवारीला मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन
* प्रभाग पाचमध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा करणार्‍या महिलांना लकी ड्रॉ काढून नगरसेवक विक्रांत गोजमगुम्डे देणार नथ, पैठणी आणि चांदीची नाणी
* कांदीवलीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची काल रात्री अज्ञातांकडून हत्या
* जळगावातील गितांजली केमिकल कंपनीत स्फोट ०७ जण जखमी, संतप्त नागरिकांनी केली दगडफेक
* जिग्नेशच्या कार्यक्रमाला बंदी मग संघाच्या ‘चेतना संगम’ला परवानगी कशी? आंबेडकरवाद्यांचा सवाल
* मुंबईत २४ तासात तीन ठिकाणी आगी
* कमला मील आग: मोजोस पबला लागलेल्या आग प्रकरणी युग पाठकला १२ तारखेपर्यंत कोठडी
* बुलेट ट्रेन सुरु करुन गुजरातमध्ये विकासाच्या रांगोळ्या, कोकणात रिफायनरी आणि अणुऊर्जा प्रकल्प आणून राख रांगोळी करायची- उद्धव ठाकरे यांची टीका
* उत्तरप्रदेशात धार्मिक स्थळांवरील अवैध लाऊडस्पिकर हटवण्याची मोहीम घेतली हाती, १५ जानेवारीची मुदत
* रांचीच्या कारागृहात लालू प्रसाद करतील माळी काम, रोज मिळणार ९३ रुपयांची मजुरी
* ‘टायगर जिंदा है’ या सलमान खानच्या चित्रपटाने तीन आठवड्यात केली ३०० कोटी ९० लाख रुपयांची कमाई
* थंडीने नायगारा धबधबाही गोठला
* सांगलीत आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा निषेध मोर्चा
* राष्ट्रवादीचे १६ जानेवारीपासून हल्लाबोल आंदोलन मराठवाड्यात होणार
* मराठवाड्यात साडेतीन हजार गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती, यंदा दुष्काळ मदतीचे निकष बदलण्याचा निर्णय
* १५ वर्षांत राज्यातील ८० हजार सरकारी शाळा बंद करून ३० हजारांवर आणण्याचे शिक्षण विभागाचे उद्दिष्ट
* आगामी वर्षात दीडशे पटसंख्या असलेल्या शाळाच राहणार सुरू- शिक्षण विभाग सचिव नंदकुमार
* भाजपला लोकसभा निवडणुकीत ३५० हून जास्त जागा हव्या असतील तर दुसऱ्याच राज्यांवर लक्ष केंद्रित करावे- सेना नेते दिवाकर रावते
* महाराष्ट्रात शिवसेनेला वगळून भाजपला राज्यात जास्त जागा मिळूच शकत नाही- दिवाकर रावते
* भीमा कोरेगाव हिंसाचाराशी जिग्नेश मेवाणीचा संबंध नाही- रामदास आठवले
* सायराबानो यांनी दाखल केली बिल्डर समीर भोजवानीविरोधात तक्रार, फसवणूक, खोट्या सह्या, बनावट कागदपत्रेप्रकरणी गुन्हा दाखल
* लोणावळा येथे पवना धरणात सेल्फी काढताना दोन युवकांचा बुडून मृत्यू, दोघांचे मृतदेह काढले बाहेर
* कल्याणचा नचिकेत लेले ठरला 'झी मराठी सारेगमप'चा महाविजेता
* भाजप मार्च महिन्यात त्रिपुरात सरकार स्थापन करणार, भ्रष्ट लोकांवर करणार कारवाई- भाजप अध्यक्ष अमित शहा
* भीमा- कोरेगावजवळील हल्ला ज्यांनी केला त्यांनी हिम्मत असेल तर पुढे येऊन ते सांगावे- उद्धव ठाकरे
* आमचे पंतप्रधान रजनीकांतलाही लाज वाटेल असे काहीही करतात- उद्धव ठाकरे
* प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी, मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी यांना सोडावे लागणार सरकारी बंगले
* सरसंघचालक मोहन भागवत प्रजासत्ताक दिनी केरळमध्ये करणार ध्वजारोहण
* देशातील ०१.३५ लाखांहून अधिक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी केंद्र सरकारकडे जमा केला नसल्याचे उघड
* ग्रामीण आणि दुर्गम भागातील सर्वच ०८ हजार ५०० रेल्वे स्थानकांवर मिळणार वायफाय, ७०० कोटीची तरतूद, मार्चपर्यंत ६०० स्थानकांत सुविधा
* कोळंबी खाणं इस्लामला अमान्य, मुस्लिमांनी कोळंबी खाऊ नये- 'जामिया निजामिया' इस्लामिक संस्थेचा फतवा, अनेक तरुणांचा फ़तव्याला विरोध
* नोटाबंदी आणि जीएसटी कायद्यामुळं कर्जबाजारी झाल्याने डेहराडून येथील ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न
* भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका पहिली कसोटी: पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ झाला रद्द
* एअर इंडियाचे खाजगीकरण न करता, कंपनीला सावरण्यासाठी ०५ वर्षे द्यावीत, सरकारने त्यांचे कर्जही माफ करावे- संसदीय समिती
* दहशतवादाच्या कारणाने अमेरिकेने लष्करी मदत थांबवली असली तरी अमेरिकेसोबत आपल्या देशाचे संबंध कायमच राहतील- पाकचा दावा


Comments

Top