HOME   महत्वाच्या घडामोडी

रेल्वेवर ड्रोनचे लक्ष, भिमा कोरेगाव प्रकरणी ११ जणांना अटक, १० जानेवारीचा बंद खोटा, पद्मावत प्रदर्शित होऊच देणार नाही, कुलभूषण प्रकरणी अमेरिकेत निदर्शने, राष्ट्रगीत सर्वोच्च न्यायालयात.....०९ जानेवारी २०१९

रेल्वेवर ड्रोनचे लक्ष, भिमा कोरेगाव प्रकरणी ११ जणांना अटक, १० जानेवारीचा बंद खोटा, पद्मावत प्रदर्शित होऊच देणार नाही, कुलभूषण प्रकरणी अमेरिकेत निदर्शने, राष्ट्रगीत सर्वोच्च न्यायालयात.....०९ जानेवारी २०१९

* निलंगाची दंगल पीआय सुपेकरांनी भडकावली, त्यांच्यावर कारवाई करा, व्हीएस पॅंथर्सची मागणी, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
* शिवाजी पाटील कव्हेकरांच्या यांच्या महाराष्ट्र बॅंकेतील कर्मचार्‍यांना १५ ते २० टक्के पगारवाढ
* लातुरच्या गावभागातील राम मंदीर येथे बांधण्यात आलेल्या सभागृहाचे आ. अमित देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण
* कातपूर येथे शेतकर्‍यांच्या कंपनीने बांधलेल्या गोदामाचे आ. अमित देशमुख यांनी केले उदघाटन
* १९ च्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि समविचारी पक्षांना एकत्र यावे लागेल, बोलणी चालू- माजी मंत्री बाळासाहेब थोरात लातुरात
* चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगिताची सक्ती नको, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
* जिग्नेश मेवानीच्या ‘हुंकार रॅली’च्या अनुषंगाने दिल्लीत मोठा बंदोबस्त, निमलष्करी दलही तैनात
* वर्षभरात मुंबईत आगीच्या ४७०० घटना
* दिल्लीत कडाक्याच्या थंडीमुळे ४४ जणांचा मृत्यू
* अमरावतीत विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन करणार्‍या शिक्षकाची काढली धिंड
* अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुंबईतील घरावरचे अनधिकृत बांधकाम पाडले
* लातुरच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी अडीच हेक्टरची जागा देण्यास रेल्वेचा नकार
* किल्लारी कारखाना साखर सम्राटांनी मुद्दाम बंद पाडला, कामगार नेते माणिक जाधव यांचा आरोप
* १० जानेवारीच्या महाराष्ट्र बंदशी संबंध नसल्याचे मराठा क्रांती भवनचा खुलासा
* लातूर बाजारात आवक घटल्याने सोयाबीनचे भाव वाढले, भाव गेला ३२०० वर
* छावा संघटनेचे विद्यार्थी आघाडीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांची हकालपट्टी
* उदगीरमध्ये शिक्षकाच्या घरी चोरी, दोन लाखांचा ऐवज लांबवला
* अहमदपूर तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण-हत्या प्रकरणी वडार समाजाने काढला तहसीलवर आक्रोश मोर्चा
* बीडमध्ये आर्थिक व्यवहारावरुन तरुणास जाळले
* अंबाजोगाईत अलपवयीन मुलीला धमकावत बलात्कार करणार्‍या तरुणाला अटक
* ०९ ते ११ फेब्रुवारी या काळात वेरुळ अजिंठा महोत्सव
* १० वी अणि १२ वीच्या प्रात्यक्षिक परिक्षांना एक फेब्रुवारीपासून सुरुवात
* भिमा कोरेगाव प्रकरणी तीन अल्पवयीनांसह ११ जणांना अटक
* १० जानेवारीला महाराष्ट्र बंद असल्याची खोटी पोस्ट टाकणार्‍या तरुणाला सोलापुरात अटक
* सेन्सॉर बोर्डानुसार अनेक बदल करुनही राजस्थानमध्ये ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित करु देणार नाही- राजस्थानचे गृहमंत्री
* करडी सेनाही आक्रमक पद्मावत प्रदर्शित झाला तर जाळपोळ आणि तोडफोडही करु, सेनेचा इशारा
* गांधी हत्येच्या तपासाची पुन्हा गरज नाही, आधी झालेला तपास योग्यच, सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचा निकाल
* प्रजासत्त्ताक दिनाच्या कार्यक्रमावरील संभावित हल्ला प्रकरणी एका संशयिताला अटक, अक्षरधाम मंदीर आणि राजपथावरील परेड अतिरेक्यांचे असू शकते टार्गेट
* कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला पाकिस्तानने दिलेल्या वागणुकीचा अमेरिकेत निषेध, पाकिस्तान दूतावासासमोर निदर्शने
* औरंगाबाद जिल्ह्यातील गांगापूर तालुक्यात खोदकाम करताना सापडले निजामकालीन चांदीच्या ९० नाण्याचे भांडे, प्रशासनाकडून जप्त
* राज्यभर थंडीचा कडाका वाढला, द्राक्षांचं नुकसान, उत्तर भारतात थंडीमुळे रेल्वेंना १७ ते २० तासांचा उशीर
* ताडोबा अभयारण्याच्या सहलीसाठी ऑनलाईन बुकींगला सुरुवात, दरही वाढले
* रेल्वे प्रकल्पांवरील घातपात टाळण्यासाठी आता ड्रोन कॅमेर्‍यांचा वापर सुरु
* चित्रपटगृहातील राष्ट्रगीताला केंद्राचा विरोध, सर्वोच्च न्यायालयाला विनंती, नव्या नियमाला लागणार सहा महिने कालावधी
* चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगिताच्यावेळी लोकांना उभे राहण्याचे सर्वोच्च न्यायालयाने ३० नोव्हेंबर २०१६ रोजी दिले होते निर्देश
* सगळे राजकारणी स्वार्थी, मतांचे राजकारण करतात, लोकपालसाठी कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा घेणार नाही- अण्णा हजारे
* देशातील विद्यापीठ आणि कॉलेजांमध्ये ८० हजार बोगस प्राध्यापक- उच्च शिक्षण सर्व्हे
* आधार कार्डची सक्ती केल्यानंतर बोगस प्राध्यापकांची संख्या स्पष्ट झाली- प्रकाश जावडेकर
* सर्व्हेमध्ये घेण्यात आलेल्या शिक्षकांची माहिती असणार ‘गुरुजन’ पोर्टलमध्ये, एक शिक्षक चार संस्थांमधून शिकवित असल्याचे स्पष्ट
* राष्ट्रवादीचे गणेश नाईक यांच्या नवी मुंबईतील बावखळेश्वर मंदीर व ट्रस्टच्या बेकायदा बांधकामावर पडणार हातोडा
* १५ फेब्रुवारीपर्यंत मंदिराचे अनधिकृत बांधकाम तोडण्याची मंदिर ट्रस्टची सुप्रीम कोर्टात ग्वाही
* शनिवारवाड्यावरच्या एल्गार परिषदेतील कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा, एल्गार परिषद, मेवाणी आणि उमरवर यापूर्वीच गुन्हा दाखल
* अरबी समुद्रात तरंगते पंचतारांकित हॉटेल उभारण्यास न्यायालय उच्चस्तरीय समितीचा विरोध, त्याविरोधातली याचिकाही फेटाळली
* भीमा कोरेगाव हिंसाचारातील आरोपी न सापडल्याने औरंगाबादेत डाव्या, दलित आणि मराठा संघटनांनी काढली मूक सद्भावना रॅली
* संभाजी भिडे गुरुजींना जातीयवादी ठरविण्यामागे राजकीय षडयंत्र, प्रकरणाची मुळापर्यंत जाऊन चौकशी करा- २४ समाजाच्या प्रतिनिधींची मागणी
* प्रकाश आंबेडकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची शिवप्रतिष्ठानची मागणी
* पुण्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍यास ०३ वर्षे सक्तमजुरी आणि ०२ हजार रुपये दंड
* राज्य उत्पादन शुल्क पदाच्या परीक्षेत नाशिकचा विवेक पंडितराव धांडे राज्यात दुसरा तर ओबीसी गटातून पहिला
* मुंबईत १३ आणि १४ जानेवारी रोजी संस्कृती महोत्सव
* अग्नीसुरक्षा, आरोग्य आणि इमारतींबाबत नियमांचे पालन करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांनाच मिळणार हॉटेल व्यावसायिक संघटनेचे सदस्यत्व
* ठाणे रेल्वे स्थानकात होणार बायोटॉयलेटची उभारणी, मलविसर्जनाचे करणार खत
* ठाणे पोलिस ठाण्यात लखोबा लोखंडे, सातजणींशी लग्न करणारा सूर्यकांत कदम पोलिस सेवेतून निलंबित
* मेट्रो ०३ मार्गाचा समावेश ‘अ’ श्रेणीत झाल्याने मार्गाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाची सुरक्षा घ्यावी लागण्याची शक्यता
* समलैंगिक शारीरिक संबंध गुन्हा ठरवणाऱ्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची सुप्रीम कोर्टीची तयारी
* शस्त्रास्त्रांची आयात हळूहळू कमी करून स्वदेशी शस्त्रांचा प्रयोग केला पाहिजे- जनरल बिपीन रावत
* केपटाउनमध्ये पहिल्या कसोटीत भारताचा दक्षिण आफ्रिकेने केला ७२ धावांनी पराभव
* पाकिस्तानने केली १४७ भारतीय मच्छीमारांची सुटका
* अरुणाचल प्रदेशात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ सुरू असलेले रस्त्याचे बांधकाम थांबवण्यास चीन तयार


Comments

Top