• 20 of March 2018, at 7.30 am
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   महत्वाच्या घडामोडी

न्या. लोया प्रकरणाची आज सुनावणी, ३१ उपग्रहांचं प्रक्षेपण, खासदारांचा पगार दुप्पट, खडसेंना रहावे वाटते बारामतीत, मोफत पोलिस संरक्षण.....१२ जानेवारी २०१७

न्या. लोया प्रकरणाची आज सुनावणी, ३१ उपग्रहांचं  प्रक्षेपण, खासदारांचा पगार दुप्पट, खडसेंना रहावे वाटते बारामतीत, मोफत पोलिस संरक्षण.....१२ जानेवारी २०१७

* न्यायमूर्ती ब्रिजमोहन लोया यांचा मृत्यू अनाकलनीय आणि गंभीर बाब, सर्वोच्च न्यायालयाने केले मत व्यक्त
* लातुरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयातील मराठी विभागाचे निवृत्त प्रमुख प्रा. श्रीराम गुंदेकर यांचे निधन
* आज लातुरच्या बाजारात सोयाबीन ३२५०, तूर ४७२९, उडीद ३७६१ तर हरभरा पोचला ४२६८ रुपयांवर
* लातुरातील चौक आणि दुभाजक सुशोभित करण्याची मोहीम स्थायी समितीकडून सुरु, भाजपाचा श्रेय घेण्याचा प्रयत्न
* अरविंद केजरीवाल यांची सिंदखेड राजामध्ये सभा सुरु
* लातूर मनपाचे नवे उपायुक्त म्हणून हर्षल गायकवाड रुजू
* औसा भूमी अभिलेख कार्यालयात बाराशेची लाच घेताना सहाय्यकाला पकडले
* रेणापूर पंचायत समितीत ११ कर्मचारी गैरहजर, सभापतींनी कापला एक दिवसाचा पगार
* लातूर जिल्ह्यात तूर घोटाळ्यात गुन्हे दाखल न झाल्यास २५ जानेवारीपासून अर्धनग्न उपोषण, शेतकरी नेते लक्ष्मण वंगे यांचा इशारा
* मांजरा धरणाच्या उपविभागीय कार्यालयाच्या स्थलांतरास स्थगिती
* उस्मानाबादेत आई वडिलांना न सांभाळणार्‍या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
* सिंदखेड राजा येथे आज जिजाऊसाहेबांचा जन्मोत्सव, विविध कार्यक्रम, केजरीवालांची सभा
* श्रीहरीकोटातून इस्रोचं आज शंभरावं उड्डाण, एकाच वेळी ३१ उपग्रहांचे यशस्वीरित्या प्रक्षेपण
* पृथीचे निरीक्षण करणार्‍या खास उपग्रहाचा यात समावेश, उच्च प्रतीची छायाचित्रे पाठवणार
* खासदारांची पगार दुपटीने वाढणार, आज समितीची बैठक
* नाना पटोले कॉंग्रेसमध्ये, नानांसारखे अनेक खासदार भाजपात
* ०९ हजार यात्रेकरुंची संगणकीय सोडतीने निवड, यादी तयार
* पुण्यात आज सबंध शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार
* ज्यांना भारतात जायचंय त्यांनी काश्मिरात जाणं टाळावं, अमेरिकेचा पर्यटकांना सल्ला
* मुख्यमंत्री आणि गडकरी हेलिकॉप्टर अपघातातून बचावले
* आता सरकारच्या भरवशावर राहू नका एकनाथ खडसे यांचा शेतकर्‍यांना जाहीर सल्ला, शरद पवारांचे कौतुक
* बारामतीच्या विकासकामांमुळे प्रभावित होऊन आपणास बारामतीत जाऊन राहावेसे वाटते- भाजपचे एकनाथ खडसे
* शरद पवार यांचे विकासाचे विचार खडसेंना पटतात, ते जो निर्णय घेतील त्याचे स्वागत करू- राष्ट्रवादीचे नवाब म‌लिक
* ‘आदर्श’ घोटाळ्यातून अशोकराव चव्हाण यांचं नाव वगळलं जावं का यावर मार्चमध्ये सुनावणी
* अशोक चव्हाण यांच्या विरोधातील खटल्याला सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती
* आदर्श प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सीबीआयचा सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय
* पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार आणि खून
* देशभरात रबीच्या भुईमुगाच्या पेरणीत वाढ
* नगर-निजामुद्दीन एक्स्प्रेसचा अपघात टळला, पूल खचल्यानं रेल्वे मार्गाला तडे
* अनिकेत कोथळेच्या पार्थिवावर तबल दोन महिन्यांनी झाले अंत्यसंस्कार
* नायमूर्ती ब्रिजगोपाल लोया मृत्यू प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
* कमला मिल आग : 'वन अबव्ह' पबचे मालक जिगर संघवी, कृपेश संघवी आणि अभिजीत मानकर यांना १७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
* ओबींसींच्या मेहनतीवर मते मिळवायची आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचा, ही भाजपची कुटनीती- धनंजय मुंडे
* कायद्याच्या कक्षेत राहूनच राज्यातील १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय- शिक्षणमंत्री विनोद तावडे
* २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय आधीच्या आघाडी सरकारचाच- विनोद तावडे
* मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री विकासकामांसाठी पैसे देत नाहीत, मी तरी काय करू?- बबनराव लोणीकर आगतिक
* सेना आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या सोबतच्या संभाषणाचा लोणीकरांचा व्हिडिओ झाला व्हायरल
* महिन्याला ५० हजारापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींना मिळणार मोफ़त पोलीस संरक्षण- राज्य शासन
* ०३ हजार ५०० कोटी बेनामी संपत्ती, ९०० पेक्षा अधिक मालमत्तांवर टाच, संपत्तीत मोकळ्या जागा, फ्लॅट, दुकाने, दागिने, वाहने, बँक ठेवी,रक्कम
* विदर्भात भाजपचे ४४ आमदार तरीही स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावर सरकारचे मौन- भाजप आमदार आशीष देशमुख
* सर्वच शासकीय विभागांनी औषधे व यंत्रसामुग्री हाफकिन महामंडळामार्फतच खरेदी करावी- देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
* राज्यातील नऊ जिल्ह्यांत अर्भक व माता मृत्यू दर जास्त, ७० हजार परिचारिका आणि आशा कार्यकर्त्या देणार प्रशिक्षण
* स्कूल व्हॅन, बसचालकांविरोधात पालकांना परिवहन आयुक्तालयात तक्रार करण्यासाठी टोलफ्री व व्हॉट्सअॅप नंबर द्या- उच्च न्यायालय
* मुंबई महापालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातील २०० रस्त्यांची चौकशी, ८० हून अधिक इंजिनीअर दोषी, ३० जानेवारीला होणार चौकशी अहवाल सादर
* बारा ज्योतिर्लिंगांमधील भिमाशंकर देवस्थान विकास प्रकल्पाला राज्य सरकारने दिली १४८ कोटी ३७ लाखांची मंजुरी
* मुंबई ते दिल्ली महामार्गावर इलेक्ट्रिक केबलच्या साहाय्याने होणार अवजड वाहतूक- नितीन गडकरी
* पानसरे यांच्या हत्येशी संबंधित खटल्याला दिलेली स्थगिती उठवण्यास उच्च न्यायालयाचा नकार
* दोन्ही पक्षांच्या अधिकारांत समतोल राखण्याची गरज असल्याचे उच्च न्यायालयाने केले स्पष्ट
* पानसरे आणि दाभोलकर हत्या प्रकरणांचा तपास दोन स्वतंत्र यंत्रणांकडून करण्याबाबत उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
* इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू १४ जानेवारीला भारत दौऱ्यावर
* हरित लवादाचा चायनीज आणि नायलॉन मांजावर बंदी असुनही अनेक ठिकाणी त्याची विक्री होत असल्याचे उघड
* भारतात ताऱ्याच्या स्फोटाची पहिली नोंद सापडली काश्मिरात, खगोलशास्त्रज्ञ ऋषिकेश जोगळेकर, डॉ. मयांक वाहियांच्या प्रबंधात उल्लेख
* दहशतवादाचा मुकाबला कसा करायचा, सीमेपलीकडून होणारा दहशतवाद कसा थांबवायचा यावर भारत- पाक चर्चा झाली- परराष्ट्र मंत्रालय
* ग्रीन कार्डची संख्या ४५ टक्क्यांनी वाढवण्याचे विधेयक अमेरिकेच्या संसदेत सादर, ०५ लाख भारतीय ग्रीन कार्डच्या रांगेत
* 'विकिलीक्स'चा संस्थापक ज्युलियन असांजेला इक्वाडोरचे नागरिकत्व
* ०३ कोटींचे परकीय चलन नेणाऱ्या हवाईसुंदरीला जेट एअरवेजने केले निलंबित


Comments

Top