HOME   महत्वाच्या घडामोडी

अण्णांचं करेंगे या मरेंगे, आयपीएलच्या लिलावात ११२२ खेळाडू, पंढरपुरला विमान सेवा, इस्रोची चांद्रयान मोहीम, आज नामविस्तार दिन.....१४ जानेवारी २०१८

अण्णांचं करेंगे या मरेंगे, आयपीएलच्या लिलावात ११२२ खेळाडू, पंढरपुरला विमान सेवा, इस्रोची चांद्रयान मोहीम, आज नामविस्तार दिन.....१४ जानेवारी २०१८

* रेणापूर तालुक्यातील खरोळ्याच्या बेपत्ता शेतकर्‍याचा मृतदेह आढळला सेलुच्या विहीरीत
* कल्याण: नक्षलवाद्यांशी संबंधाचा संशय, ०७ जणांना अटक, सापडले भीमा-कोरेगाव हिंसेसंदर्भातला मजकूर, बॅनर
* पाककडून झालेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना धुळे जिल्ह्यातील लान्स नायक योगेश मुरलीधर भदाणे शहीद
* सर्वोच्च न्यायालयीतील त्या चार न्यायमूर्तींचं उद्धव ठाकरे यांनी केलं कौतुक
* औरंगाबादहून पंढरपूरला जाणार्‍या भाविकांची जीप दरीत कोसळून नऊजण जखमी
* अंबाजोगाईत मालमत्ता जप्त करण्यास आलेल्या बॅंक कर्मचार्‍यास मारहाण करणार्‍यास तीन वर्षांची शिक्षा
* नांदेडच्या तरुणीची सव्वा लाखात विक्री, १० जणांना जालन्यात अटक
* त्या चार न्यायमूर्तींवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता
* ‘पद्मावत’ चित्रपटाचे नवे पोस्टर झाले लॉंच, ट्वीटरवर उरकले प्रकाशन
* आयपीएलच्या लिलावात ११२२ खेळाडू
* मुंबईत अंधेरीजवळ एसी लोकलवर दगडफेक
* भारतातही तयार होतात हाफीज सईद, जनता करील बंदोबस्त- प्रकाश आबेडकर
* मी कालही राजा होतो, आजही आहे, उद्याही राहीन- प्रकाश आंबेडकर
* भीमसैनिकांना हिंदुत्ववादी संघटनांच्या वर्चस्ववादातून मारहाण झाली- प्रकाश आंबेडकर
* नाराज न्यायाधिशांच्या प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी बार काउन्सिलची ०७ सदस्यांची समिती
* बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ०७ नवीन महाविद्यालयांच्या प्रस्तावांना दिली मंजुरी
* बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज नामविस्तार दिन, पोलीस बंदोबस्त कडेकोट
* मोदींनी लोकपालला कमजोर करणारे नवे विधेयक तीन दिवसात चर्चेविना मंजूर भ्रष्टाचाराला संधी- अण्णा हजारे
* उद्योगपतींवर करोडोंची खैरात, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, शेतकरी प्रश्नी ‘करेंगे या मरेंगे’ आंदोलन- अण्णा हजारे
* बेताल वक्तव्ये करणारे गिरीश बापट आणि भाजप नेत्यांना भविष्यात किंमत मोजावी लागेल- अजित पवार
* पुण्यात विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या उपस्थितीत गिरीश बापट म्हणाले, ‘चल म्हटली की लगेच चालली’
* भाजपाच्या दबावामुळे औरंगाबादेत शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल- चंद्रकांत खैरे
* कमला मिल कंपाऊंड प्रकरणी मनपा अधिकारी, त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवा- उच्च न्यायालयात याचिका
* निधीचा अन्यत्र वापर केल्यास महानगरपालिकांचे आयुक्त आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारींवर होणार कारवाई
* पंढरपूर येथे विमानसेवा सुरु करण्याचा प्रस्ताव, सोलापुरातील उडान सेवा लवकरच- खा. शरद बनसोडे
* अ.भा. नाट्य परिषदेसाठी टपालाने मतदान रद्द, मतदान केंद्रावरच जाऊन करावे लागणार मतदान
* डहाणू बोट दुर्घटनेप्रकरणी बोट मालकासह तिघांवर गुन्हे दाखल
* ओएनजीसी हेलिकॉप्टर दुर्घटनेतील सहाजणांचे मृतदेह लागले हाती, एक बाकी
* ओएलएक्सवर स्कूटीची जाहिरात टाकून अनेकांना गंडा घालणार्‍या दोघांना पुण्यात अटक
* शेतकऱ्यांचे पीक वाचवण्यासाठी कावेरी नदीचे पाणी सोडण्याचे तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र
* रत्नागिरीतील तेल शुद्धीकरण प्रकल्पाला मनसेचा विरोध, प्रकल्प रद्द होईपर्यंत प्रकल्पग्रस्तांसोबत राहणार- राज ठाकरे
* सरन्यायाधीश दीपक मिश्रा पसंतीच्याच न्यायाधीशांकडे महत्त्वाचे खटले सुपूर्द करतात- चार न्यायाधिशांचा आरोप
* इस्रो चालवणार चांद्रयान-२ मोहिमेत चंद्रावर बग्गी, चाचण्या होणार महेंद्रगिरी येथे
* अरुणाचल प्रदेशात घुसखोर चिनी सैन्याला जवानांनी १९ तास पायी प्रवास करून लावले हुसकावून
* बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील घराला केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली भेट
* बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यावर हल्ला केल्याप्रकरणी १९ जणांना अटक
* 'समान काम, समान दाम' या मागणीसाठी भोपाळमध्ये अध्यापक अधिकार यात्रेत शिक्षिकांनी केले मुंडण
* दिल्लीत अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकाच्या मृतदेहावरून अनेक गाड्या निघून गेल्या
* दुसऱ्या कसोटीत कामगिरी चांगली झाली नाही तर विराट कोहलीने तिसऱ्या कसोटीतून माघार घ्यावी- वीरेंद्र सेहवाग


Comments

Top