HOME   महत्वाच्या घडामोडी

माधुरीचा मराठी सिनेमा, आता हरभरा रडवणार, जातीभेद वाढला, लवकरच मराठी बिग बॉस, पद्मावतचा नवा ट्रेलर, पत्नीविरुद्ध ४०० तक्रारी.....१५ जानेवारी २०१७

माधुरीचा मराठी सिनेमा, आता हरभरा रडवणार, जातीभेद वाढला, लवकरच मराठी बिग बॉस, पद्मावतचा नवा ट्रेलर, पत्नीविरुद्ध ४०० तक्रारी.....१५ जानेवारी २०१७

* लातूर-बेंगलोर (यशवंतपूर) धावणार चार फेब्रुवारीपासून, आठवड्यातून तीनदा, आरक्षणही सुरु
* मंत्रालय ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत सर्वपक्षीय संविधान बचाव रॅली
* रॅलीत शरद पवार, जिग्नेश मेवानी, हार्दिक पटेल, सिताराम येचुरी, तुषार गांधी, राजू शेट्टींसह अनेकजण सहभागी होणार
* रॅलीत कुठलाही झेंडा असणार नाही, २५० पेक्षा अधिक नेत्यांना रॅलीत घेणार नाही, विद्यार्थी कितीही येवोत
* उस्मानाबाद येथे दहावीत शिकणार्‍या दोन मुलांचे वसतीगृहातून अपहरण
* `आप’ आणणार रयतेचे राज्य- सुधीर सावंत लातुरात
* औसा तालुक्यातील नागरसोगा शिवारात ०८ एकर ऊस जळून खाक
* शेतकरी विष प्राशन: महावितरणने अधिकार्‍यांच्या चौकशीसाठी नियुक्त केली समिती
* लातुरातील कॉफ़ी शॉप छाप्यातील तिघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी
* लातूर जिल्ह्यात १० ठिकाणी तूर हमीभाव खरेदी केंद्र सुरु, ०८ हजार ५०० शेतकर्‍यांची ऑन लाईन नोंदणी
* केंद्रिय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला प्राधान्य मिळण्याची शक्यता
* राज्यातील कृषी पदवीचे प्रवेशासाठी आता द्यावी लागणार सामाईक सीईटी
* ठाणे येथे २० आणि २१ जानेवारी रोजी व्यंगचित्रकार संमेलन, राज ठाकरे राहणार उपस्थित
* आमदार कपिल पाटील यांना ना. य. डोळे स्मृती पुरस्कार जाहीर
* अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी कॉंग्रेस कटिबध्द- अमित देशमुख, संगणक प्रशिक्षण कार्यक्रमात
* देशात यंदा हरभर्‍याच्या लागवडीत १५ टक्क्याने वाढ, हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी
* नवा हरभरा बाजारात येण्यापूर्वीच भाव घसरले
* माधुरी दिक्षित मराठी चित्रपटात, ‘बकेट लिस्ट’ चित्रपटाचे पोस्टर झळकले
* औरंगाबादेत रामदास आठवले यांच्या भाषणावेळी गोंधळ, भाषण आटोपते घेतले, १५० जण ताब्यात
* पुण्यातील शनिवारवाड्यावर खाजगी कार्यक्रमांवर बंदी घालणार
* पाकिस्तानकडून अणुबॉंब हल्ल्याची धमकी, भारतानेही करावी आक्रमक कारवाई- लष्करप्रमुख बिपीन रावत
* मोबाईलचे एक महिन्याचे कॉल डिटेल्स मिळणार एका क्लिकमध्ये, प्ले स्टोअरवर नवे अ‍ॅप
* मदरशांमधील शिक्षणाविरोधात वक्तव्य करणार्‍या शिया सेंट्रल बोर्डाच्या अध्यक्षाला दाऊदची धमकी
* पुण्यात पत्नीच्या विरोधात वाढू लागल्या तक्रारी, वर्षभरात ४०० पतींची पोलिसात धाव
* सांगलीत अनिकेत कोथळे कुटुंबियांची राज ठाकरे यांनी घेतली भेट
* महाराष्ट्र जातीभेदाच्या विळख्यात अडकू लागला, राज ठाकरे यांनी दिला इशारा
* न्यायाधिशातील वादानंतर आज सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचा आज पहिला दिवस
* सर्वोच्च न्यायालयात शिस्त आवश्यक, सरन्यायाधीशांनी न्यायाधीशांच्या वादावर तत्काळ तोडगा काढावा- दिल्ली बार असोसिएशन
* समाजात घडणाऱ्या घडामोडींविषयी साहित्यिकांनी भूमिका घेणे गरजेचे- राज ठाकरे, सांगलीत
* राज्यातील शेतकरी आत्महत्येवर भाष्य करण्यास पंतप्रधानांना वेळ नाही- राज ठाकरे
* राज ठाकरे आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांची सांगलीत भेट
* कोल्हापुरी गुळाची गुणवत्ता टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दिल्या सूचना
* जन्मानंतर पाच तासांतच ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयातून अर्भकाचे अपहरण, मनसेचे ठिय्या आंदोलन
* इंदू मिलवरील बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम २६ जानेवारीपासून सुरु करण्याचे प्रयत्न सुरु
* लवकरच मराठी ‘बिग बॉस’ सुरु होणार
* ‘पद्मावत’ चित्रपटाचा नवा ट्रेलर रिलीज
* ग्रॅच्युइटीच्या रकमेवरील करमाफीची मर्यादा होणार २० लाख
* आधारधारकाला बायोमेट्रिक लॉक लावून आपली वैयक्तिक माहिती करता येणार संरक्षित
* आंबेडकरांच्या विचारांना जाती-पक्षाच्या भिंतीतून बाहेर काढायला हवे- डॉ. सूर्यनारायण रणसुभे
* आंबेडकर विचारधन अनुवाद परिषद स्थापन करायला हवी- सूर्यनारायण रणसुभे
* शिवाजी महाराजांच्या काळात इंग्रजी कालगणना नव्हती, शिवजयंती तिथीप्रमाणेच करावी- चंद्रकांत खैरे
* राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न, सामान्य माणसाशी पोलिसांचा संवाद हवा- राधाकृष्ण विखे
* विकिपीडियावर येणार मंत्रालय, राज्यातील मंत्री आणि अधिकार्‍यांचा तपशील मिळणार एका वेबपेजवर
* उद्योग-व्यवसायातील छोट्या-मोठ्या संधींचा लाभ घेत नोकऱ्या देणारे बना- राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद
* दलितांच्या ऐक्यासाठी फॉर्म्यूला तयार करण्याची गरज, ऐक्यासाठी दुय्यम भूमिका घेण्यास तयार- रामदास आठवले
* राज्यातील मंत्र्यांना दोन इंजिनच्याच हेलिकॉप्टरमधूनच प्रवास करावा, सुरक्षेचा सल्ला
* बेमुदत उपोषणादरम्यान प्रकृती बिघडल्याने ‘उपरा’कार लक्ष्मण माने रुग्णालयात दाखल
* औरंगाबादच्या मिलिंद वसतीगृहाला राष्ट्रवादी दीड कोटी देणार- सुप्रिया सुळे
* हिंदूंमध्ये मिळून मिसळून राहणारे मुस्लिमच भारतात राहू शकतील- भाजप आमदार सुरेंद्र सिंह
* २०२५ मध्ये संघाला १०० वर्षे होणार पूर्ण, २०२४ मध्ये भारत हिंदू राष्ट्र होणार- भाजप आमदार सुरेंद्र सिंह
* २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट, तीन दहशतवादी दिल्लीत घुसल्याची माहिती
* कुलभूषण जाधव यांची सन्मानपूर्वक सुटका करण्याची मागणी करणारा पतंग गुजरातमध्ये उडविला
* मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांना गस्तीसाठी मिळणार ५५ बुलेट मोटारसायकली
* पुण्यात देवेनभाई शहा या बिल्डरचा गोळीबारात मृत्यू


Comments

Top