HOME   महत्वाच्या घडामोडी

इस्रो जाणार चंद्रावर, पाकिस्तानात गायिकेची हत्या, बिबट्याची तीन पिलं दगावली, मंगला बनसोडे सुखरुप, घोषणांना अर्थ नसलेला पंतप्रधान, कॉंग्रेस जल बिन मछली......०५ फेब्रुवारी २०१८

इस्रो जाणार चंद्रावर, पाकिस्तानात गायिकेची हत्या, बिबट्याची तीन पिलं दगावली, मंगला बनसोडे सुखरुप, घोषणांना अर्थ नसलेला पंतप्रधान, कॉंग्रेस जल बिन मछली......०५ फेब्रुवारी  २०१८

* खासदार उदगिरात खरे बोलले, रेल्वे विस्तार बिदरपर्यंत माझ्यामुळेच!
* भुजबळ समर्थकांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
* अण्णा हजारे आता शेतकर्‍यांच्या आंदोलनात
* फेसबुकवर २० कोटी बनावट खाती
* भारत, इंडोनेशिया आणि फिलिपीन्समध्ये फेसबुकची सर्वाधिक बनावट खाती
* लातूर जिल्ह्यात बोंड आळीने केले ०३ हजार हेक्टरवरील पाऊण कोटी कापसाचे नुकसान
* लातुरात एटीएम कार्ड बदलून बीड जिल्ह्यातील गृहस्थाची ०२ लाखाला फ़सवणूक, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
* मंगळवारी वीज बील भरण्याच्या कबुलीनंतर लातुरच्या पाणी पुरवठा वीजेची जोडणी
* उच्चस्तरीय समितीच्या अहवालाची होळी: लातुरात एसटी कर्मचार्‍यांवर होणार कारवाई
* रेल्वे बोगीचा कारखाना चाकूर तालुक्यात सुरु करा- भाजप जिल्ह परिषद सदस्य सुधाकर शृंगारपूरे
* औसा तालुक्यातील ४१ गावात १४ व्या वित्त आयोगातून एलीडी पथदिवे, इ लर्निंगचे बोगस काम, चौकशीचे आदेश
* लातूर आणि औसा तालुक्यात तांड्यांवर छापे, ४५ हजारांची दारु जप्त
* कोमल पवार हत्याकांड चौकशीस विलंब: अहमदपूर तहसीलसमोर वडार समाजाने केले दगड फ़ोड आंदोलन
* रेल्वे उडविण्याची धमकी मिळाल्याने औरंगाबाद रेल्वे स्थानकावर झाली कसून तपासणी
* शरद पवार यांनी मिलिंद एकबोटेंना वाचविले हा प्रकाश आबेंडकरांचा आरोप बिनबुडाचा- नवाब मलिक
* तुरीची तूट रोखण्यासाठी महाराष्ट्र फ़ेडरेशनचा पोती मशिनने बंद करण्याचा निर्णय
* उत्तर प्रदेश सरकार करणार गोमुत्रापासून औषध निर्मिती
* आफ्रिकन खंडातील नायजेरियन किनार्‍यावरुन भारतीय जहाज गायब, २२ कर्मचार्‍यांचं अपहरण झाल्याची भिती
* मी तोंड उघडलं तर शरद पवारांना पळता भुई थोडी होईल प्रकाश आंबेडकरांचा इशारा
* न्यायालयाच्या देखरेखीखाली मालमत्तेची विक्री करा, बदनामीमुळे मालमत्ता विक्रीत अडचणी- डीएसके
* सेंच्युरियन वन डेत भारताची दक्षिण अफ्रिकेवर मात
* तूर्तास एनडीतून बाहेर पडणार नाही, भाजपाशी असणारे मतभेद सोडवता येतील- तेलगू देसम
* शरद पवार हे जातीयवादी आहेत त्यामुळेच संविधान रॅलीत सहभागी झालो नाही- प्रकाश आंबेडकर
* कर्नाटकात परिवर्तन यात्रा, पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी
* बेरोजगारीमुळे बीड मध्ये केली चांगदेव गिते या तरुणानं डिग्री वापसी
* जुन्नर तालुक्यात ऊसाला लागलेल्या आगीत बिबट्याची तीन पिलं दगावली
* ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे सुखरुप, हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त झाले होते व्हायरल
* काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुढची १० ते १५ वर्षे सत्तेत येणार नाही, त्यांनी सत्तेची स्वप्ने पाहणे सोडून द्यावे- मुख्यमंत्री
* दोन्ही पक्षांची अवस्था सत्तेशिवाय ‘जल बिन मछली’ झाली आहे, सत्तेत असताना काहीही केले नाही, आता हल्ला बोल यात्रा काढत आहेत- मुख्यमंत्री
* स्वामिनाथन आयोगाचा अहवाल २००४ चा, विरोधक सत्तेत असताना त्यांनी का लागू केला नाही- मुख्यमंत्री
* राष्ट्रवादीचे आधी डल्ला मारून झाला आहे आता कसला हल्लाबोल?- उद्धव ठाकरे
* महाराष्ट्रातला शेतकरी साधाभोळा म्हणूनच त्याचा गैरफायदा घेतला जातो, कर्जमुक्तीसाठी सेनेने सगळ्यात जास्त मेळावे घेतले- उद्धव ठाकरे
* जनतेचा भाजपवरील विश्वास उडाला आहे, निवडणुका कधीही घेतल्या तरी आम्ही तयार- उद्धव ठाकरे
* भाजपचे केंद्र आणि राज्यातील सरकार केवळ जाहिरातबाजी करणारे- उद्धव ठाकरे
* सरकारवरील सामान्य जनतेचा आणि शेतकऱ्यांचा विश्वास उडाला आहे- उद्धव ठाकरे
* सेनेस सत्ता सोडण्यास सांगणारे तुम्ही कोण? ही सत्ता जनतेने दिली आहे- उद्धव ठाकरे
* सेनेला सत्ता सोडण्याचे आव्हान देणार्‍या राष्ट्रवादीला ठाकरेंचे उत्तर
* अजित पवार बिन शेपटी आणि शिंगाचे प्राणी, त्यांना धरण आणि कालव्याजवळ फिरकू देऊ नका - ठाकरेंचा टोला
* देश तुम्ही राज्य आम्ही सांभाळतो यानुसार २५ वर्षे भाजपला जपले, पण ते आमच्याच घरात घुसत आहेत, त्यांना सोडणार नाही- उद्धव ठाकरे
* येणाऱ्या निवडणुकीत एकटेच लढणार आणि जिंकणार- उध्दव ठाकरे
* जनावरांएवढीही किंमत शेतकऱ्याच्या आत्महत्येला नाही, सरकारी धोरणांवरचा विश्वास उडाल्याने आत्महत्या वाढत आहेत- राजू शेट्टी
* शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी शेतकरी चळवळ मजबूत करणे काळाची गरज- राजू शेट्टी
* सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे- चंद्रकांत पाटील
* अपात्र लोक वर बसले आहेत, पात्रता असणारे बाहेर- एकनाथ खडसे
* नांदेडमध्ये एका गुंडाने भरदिवसा पोलीस कर्मचाऱ्याची डोक्यात दगड घालून केली हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद
* औरंगाबाद येथे विवाह सोहळ्याआधी मंगल कार्यालयातून लांबवले अडीच लाखांचे दागिने
* ‘ओबीसी’ समाजाने रडगाणे गाणे न गाता स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे- पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर
* लिंगायत समाजाचा ०८ एप्रिल रोजी औरंगाबादेत मोर्चा
* सोलापूर जिल्ह्यात १११ वर्षे वयाच्या आजीबाई सरूबाई खेंडकर यांचा वाढदिवस झाला साजरा
* राष्ट्र हिंदू राष्ट्र करण्याचा घाट, हा देश भारत देश म्हणून ठेवायला हवा, त्यासाठी प्रयत्न व्हावा- राजा ढाले
* नागपूर येथे सिलिंडर रिफिलिंगच्या समांतर कारखान्यावर छापा, संचालकाला अटक, २९५ सिलिंडर जप्त
* तिसरी, पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र गुणवत्ता तपासणीत राज्य नापास
* अश्लील चित्रफीत पसरविण्याची धमकी देत वर्षभर अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, विलेपार्ले येथे सहा तरुण गजाआड
* आंध्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटकची बाजी, मुंबई आणि नागपूर प्रगत शहरांत शेवटच्या क्रमांकावर
* महत्त्वाच्या पदांवर पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या मागणीला आय.ए.एस. अधिकार्‍यांचा विरोध
* मोदी देशाचे पहिलेच असे पंतप्रधान ज्यांच्या वक्तव्याला, घोषणांना काही अर्थच नसतो- राहुल गांधी
* केंद्र सरकार व नागा बंडखोरांमध्ये २०१५ साली झालेल्या सामंजस्य करारावरुन राहुल गांधी यांची टिका
* कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बसने मृतदेह ७० कि.मी. पर्यंत आणला फरफटत, धडकेनंतर मृतदेह अडकला बसखाली
* उत्तर प्रदेशात वीज वितरणमध्ये काडीपेटी परत न केल्याची सहाय्यक इंजिनीअरची कनिष्ठ इंजिनीअर विरोधात तक्रार
* इस्रोची चांद्रयान- २ योजना अखेरच्या टप्प्यात, २०१८ मध्ये चांद्रयान जाणार चंद्राच्या दक्षिण गोलार्धावर
* पनामाचा झेंडा असलेलं एक व्यापारी जहाज बेपत्ता, जहाजात २२ भारतीय कर्मचारी
* राजौरी सेक्टरमध्ये पाकच्या गोळीबारात भारताचे कॅप्टनसह ०४ जवान शहीद
* कर्नाटकमध्ये काँग्रेसला सत्तेबाहेर करा- नरेंद्र मोदी
* इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधुला रौप्य पदक
* पाकिस्तानात एका खाजगी पार्टीत गाण्यास नकार देणाऱ्या गायिकेची गोळी झाडून हत्या


Comments

Top