• 23 of February 2018, at 3.44 am
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   महत्वाच्या घडामोडी

२१ बिबळे गायब, मनपाचा स्वच्छता विभाग बंद, रेशन कार्ड चालणार कुठेही, डीएसके भेटले मुंडे-पवारांना, एकबोटेंच्या विरुद्ध वॉरंट, सगळ्या रेल्वेत सीसीटीव्ही......०७ फेब्रुवारी २०१८

२१ बिबळे गायब, मनपाचा स्वच्छता विभाग बंद, रेशन कार्ड चालणार कुठेही, डीएसके भेटले मुंडे-पवारांना, एकबोटेंच्या विरुद्ध वॉरंट, सगळ्या रेल्वेत सीसीटीव्ही......०७ फेब्रुवारी २०१८

* मिलींद एकबोटे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
* लातुरच्या महानगरपालिकेत कामाच्या वेळेत कर्मचार्‍यांनी पहिले जादूचे खेळ
* लातूर मनपात तिसर्‍या दिवशीही स्वच्छ्ता विभागाच्या कार्यालयाला कुलूप, कुणीच काही बोलेना
* सोयाबीनचे भाव उतरले आणखी वाढण्याची शक्यता
* राजस्थानच्या चितोडगडमध्ये पंतप्रधानांच्या पत्नीच्या कारला अपघात, किरकोळ जखमा, एकजण दगावला
* १५ लाखांच्या घोषणेचं काय झालं? मोदींच्या लोकसभेतील भाषणावेळी दीड तास विरोधकांकडून गोंधळ
* स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर यांनी केली क्रीडा संकुलाची पाहणी, जाणून घेतल्या अडचणी
* लातुरहून हैद्राबादला जाणारी रात्री ११ वाजताची बस बंद, पुन्हा सुरु करण्याची मागणी
* लातुरच्या बाजारात चर दिवसात सोयाबीन घसरले ४०० रुपयांनी
* कर्नाटकात नाभिक समाजाच्या बालिकेवर बलात्कार आणि खून, लातुरात पाळला नाभिक समाजाने बंद
* आपले रेशन कार्ड आता देशभर चालणार, बदलून घेण्याची गरज नाही
* लातूर जिल्हा हागणदारीमुक्त, जिल्हा परिषद अधिकार्‍यांचा मंत्रालयात सत्कार
* लातूर मनपाचा स्वच्छता विभाग दुसर्‍या दिवशीही टाळेबंद, जनाधारचा ऑडीट रिपोर्ट मिळाल्याशिवाय कुलूप काढणार नाही- नगरसेवक सचिन मस्के
* सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना जा पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
* राफेल विमानांचा व्यवहार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बदलला, जादा भावाने ३६ विमाने घेतली- राहूल गांधी
* पुणे विद्यापीठ परिसरातील नागराज मंजुळेंच्या सेटला विद्यार्थी संघटनांकडून विरोध
* श्रीनगरातील रुग्णालयातून अतिरेकी फरार, अतिरेक्यांच्या हल्ल्यात दोन पोलिस शहीद
* धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन होऊ नये यासाठी कॉंग्रेस आणि रष्ट्रवादी करणार आघाडी
* कुलभूषण जाधव यांच्यावर दहशतवाद पसरवल्याचा पाकिस्तानचा आरोप
* पुढील पाच वर्षात राज्यात २०० कोटी डॉलरची गुंतवणूक
* बांधकाम व्यावसायिक डीएसके यांनी घेतली अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट
* भिमा कोरेगाव प्रकरणी मिलींद एकबोटे यांच्या विरुद्ध वॉरंट जारी, कोणत्याही क्षणी होईल अटक
* नाशिक जिल्हा बॅंकेच्य संचालक मंडळाच्या बरखास्तीला न्यायालयाचा विरोध
* स्पर्धा परिक्षा शुल्कावरील जीएसटी रद्द करण्याची मागणी
* भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना
* गुप्तहेर रजनी पंडीत यांच्या अटकेमुळे पोलिस अधिकार्‍यांच्या भानगडी बाहेर
* मुंबईत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत भाजपचे गिरीश बापट
* बापटांमुळे सगळे चकित, आले होते मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला, वेगळा अर्थ काढू नका
* म्हाडाचा माजी संचालक नितेश ठाकूरला अटक
* निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचा राज्यातील नेत्यांचा निर्णय, अंतिम निर्णय दिल्लीत व्हावा- काँग्रेसची भूमिका
* माळशिरस तालुक्यातील पिरळे येथील समता माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्याची शाळेतच हत्या
* ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी एसटीच्या आरक्षण खिडकीवर स्वतंत्र रांग- एसटी महामंडळाचा निर्णय
* सरकारने शेतकऱ्यांकडील संपूर्ण तूर खरेदी करावी- राधाकृष्ण विखे पाटील
* बाळासाहेबांच्या स्मारकाचा आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
* प्रश्न विचारण्याचा अधिकार गमवायचा नाही, म्हणून राजकारणात नाही - अभिनेता नाना पाटेकर
* पुण्याच्या चांदणी चौकातील बीडीपीच्या ५० एकर जागेत होणार शिवसृष्टी- मुख्यमंत्री
* दुबईतील मसाला उत्पादक धनंजय दातार यांच्या 'मसाला किंग' पुस्तकाचे माधुरी दीक्षितने केले प्रकाशन
* अभिनेत्री जिया खान आत्महत्या: सूरज पांचोलीच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार
* अनुपम खेर यांचे ट्विटर अकाउंटच हॅक केलं तुर्कस्तानी हॅकर्सनी, 'आय लव्ह पाक' चा मेसेज ट्विट
* इचलकरंजी येथे कुमारी मातांची बेकायदेशीर प्रसुती, डॉ. अरुण पाटील यांच्या हॉस्पिटलवर धाड
* आधार कार्ड लॅमिनेट किंवा प्लास्टिक स्मार्ट कार्डाच्या स्वरुपात बनवले तर आधार कार्डाचा क्विक रेस्पॉन्स को़ड होणार निकामी
* दहशतवाद्यांचा श्रीनगरमधील हॉस्पिटलवर हल्ला, ०२ पोलीस शहीद, अनेक पोलीस जखमी, पाक दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी
* भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा प्रश्नच नाही, पक्षाला वाटत असेल तर हकालपट्टी करावी- यशवंत सिन्हा
* नरेंद्र मोदी यांना पत्रे पाठवली, भेटण्याचाही प्रयत्न, प्रतिसाद न मिळाल्यानेच राष्ट्र मंचची स्थापना- यशवंत सिन्हा
* संघ म्हणजे नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथसारखे आयकॉन जन्माला घालणारा कारखाना, संघाच्या शाखेत न जाणारे हिंदूच नाहीत- टी. राजा सिंह
* यासिन भटकळसह ०८ जणांवर बेकायदेशीर शस्त्राचा कारखाना चालवल्याप्रकरणी आरोप निश्चित
* देशभरातील सर्व रेल्वे गाड्यांमध्ये बसवणार सीसीटीव्ही
* हॉंगकाँगच्या इन्फिनिक्सने भारताच्या बाजारात आणला सेल्फी फोकस्ड हॉट एस ०३ स्मार्टफोन, १२ फेब्रुवारीपासून 'फ्लिपकार्ट'वर उपलब्ध
* राजीव गांधी आणि बेनझीर भुत्तो शांततापूर्ण मार्गाने काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्याच्या होते तयारीत- पाकचे माजी राष्ट्रपती झरदारी
* शेअर बाजाराचा जगभरातील दिग्गजांना फटका, वॉरन बफे, मार्क झुकरबर्ग, जेफ बेजॉस यांना अब्जावधीचा फ़टका
* पुद्दुचेरीच्या राज्यपाल किरण बेदी यांचे ट्विटर अकाउंट हॅक
* सीमेवर दोन्ही बाजूने गोळीबार होत असतो- फारूख अब्दुल्ला
* तैवानमध्ये ०६.४ रिश्टर स्केलचा भूकंप, ३०० खोल्यांचे हॉटेल खचले, ०२ ठार, ११४ जण जखमी, त्सुनामीचा धोका नाही
* मुंबई महापालिका, पोलिस, रेल्वेत नोकरीचे आमिष देऊन लाखोंना गंडा घालणारा भामटा मुंबई पोलिसांच्या ताब्यात
* खाजगी क्लासवर नियंत्रण आणण्यासाठीच्या अधिनियमाचा अंतिम मसुदा १५ दिवसांत होणार सादर
* राज्यातील बालमजुरीला आळा घालण्यात सरकारचे प्रयत्न अपुरे, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा- मुंबई उच्च न्यायालय
* मुंबईत मेट्रोसाठी वृक्षतोडीला उच्च न्यायालयाची स्थगिती
* मालदीवच्या राजकीय तिढ्यातून मार्ग काढण्यासाठी भारताने लष्करी हस्तक्षेप करावा- मालदीवचे माजी अध्यक्ष
* रिझर्व्ह बँकेचे द्वैमासिक पतधोरण होणार आज जाहीर, व्याजदर कायम राहण्याची शक्यता
* गायक सोनू निगमसह भाजपच्या दोन आमदारांच्या सुरक्षेत वाढ, काही आरोपींच्या चौकशीवेळी तिघांच्या जीवाला धोका असल्याचे उघड
* संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील २१ बिबळे बेपत्ता झाल्याचे अहवालात उघड, अहवालानुसार उद्यान परिसरात होते ४१ बिबळे


Comments

Top