• 23 of February 2018, at 3.46 am
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   महत्वाच्या घडामोडी

ड्रायव्हिंग लायसन्सला आधार आवश्यक, अयोध्या प्रकरणी सुनावणी, मुंडेंची नाशिकला बदली, भारतात मुस्लिमांचं काय काम? रामदेव बाबांवर मालिका, राणे-फडणविसांची चर्चा......०८ फेब्रुवारी २०१८

ड्रायव्हिंग लायसन्सला आधार आवश्यक, अयोध्या प्रकरणी सुनावणी, मुंडेंची नाशिकला बदली, भारतात मुस्लिमांचं काय काम? रामदेव बाबांवर मालिका, राणे-फडणविसांची चर्चा......०८ फेब्रुवारी २०१८

* मुंबईत मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन हर्षल रावते नामक तरुणाने उडी मारुन केली आत्महत्या
* कॉंग्रेसमध्ये राहूल गांधी आता माझेही बॉस- सोनिया गांधी
* सचिन तेंडुलकरची मुलगी साराच्या नावाने ट्वीटर अकॉंऊंट काढून शरद पवारांवर गलिच्छ शेरेबाजी करणार्‍या नितीन शिसोदेला अटक
* बनावट कॉल सेंटरद्वारे ११०० अमेरिकन नागरिकांना फसवल्या प्रकरणी कोरेगाव पार्क येथे तीन तरुणांना अटक
* शताब्दी, दुरांतो आणि राजधानी एक्स्प्रेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार
* महावितरण कार्यालयात विष प्राशन करणारे एकंबीचे शेतकरी शहाजी राठोड यांचा धोका टळला, समर्थ रुग्णालयात हलवले
* आजपासून सुप्रीम कोर्टात अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी सुनावणी
* तुकाराम मुंडे यांची नाशिकच्या आयुक्तपदी बदली
* १२४ धावांनी टीम इंडियाने उडवला दक्षिण अफ्रिकेचा धुव्वा
* भारतीय मुस्लीमांना पाकिस्तानी म्हणणार्‍याला तीन वर्षांची शिक्षा द्यावी- ओवेसी
* भारतात मुसलमानांचं काय काम ? त्यांनी पाकिस्तान किंवा बांगलादेशात निघून जावं- विनय कटियार
* 'मुसलमानांना पाकिस्तानी म्हणणं गुन्हा तर वंदे मातरम न म्हणणं सुद्धा गुन्हा ठरवला पाहिजे- विनय कटियार
* सार्वजनिक ठिकाणी मुस्लिम महिलांना बुरखा किंवा हिजाब घालण्यावर बंदी आणण्याचा डेन्मार्क सरकारचा विचार
* केंद्राच्या घोषित तारखेपासूनच महाराष्ट्रातही सातव वेतन आयोग होणार लागू
* निवृत्तीचं वय साठ आणि पाच दिवसांचा आठवडा, राज्य कर्मचार्‍यांसाठी लवकरच लागू होणार
* १० ते १३ फेब्रुवारी या काळात मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा
* मुंबई-पुणे बुलेट ट्रेन सुरु करण्याचा प्रस्ताव, अभ्यास सुरु
* नागपुरात वाढत्या हप्ता वसुलीविरोधात व्यापार्‍यांनी केले आंदोलन
* रामदेव बाबांच्या जीवनावर आधारीत मालिका लवकरच टीव्हीवर
* कुमारी मातांची प्रसुती करणारं इचलकरंजीतील रॅकेट उध्वस्त
* क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाईंडला मान्यता द्या, सचिन तेंडुलकरांची मागणी
* शिर्डी-सूरत विमानसेवा आजपासून सुरु होणार
* तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिका आयुक्तपदी नियुक्ती
* राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ०५ दिवसांचा आठवडा करण्याचा सरकारचा विचार- मुख्यमंत्री
* राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळणार केंद्राने घोषित केलेल्या तारखेपासून- मुख्यमंत्री
* मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज २० फेब्रुवारीपर्यंत मंजूर
* राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून उचलबांगडी
* नारायण राणे आणि मुख्यमंत्री यांच्यात १५ मिनिटे चर्चा
* पुणे येथील कॉल सेंटरमधून ११ हजार अमेरिकननांची फसवणूक, तिघांना अटक
* इचलकरंजीत अल्पवयीन आणि विधवा मातांची प्रसुती करुन अर्भक विक्रीचे धागेदोरे मुंबई आणि नागपूरपर्यंत
* अल्पवयीन आणि विधवा मातांची प्रसुती प्रकरणी डॉ. अरुण पाटीलला सात दिवसांची पोलिस कोठडी
* अभिनेता सयाजी शिंदेंच्या मुलीला फ्लॅटच्या नावाखाली लाखोला गंडा घालणाऱ्या धीरज चचलानीला पुण्यात अटक
* तोरणमाळ पर्यटन केंद्र चालविताना महाराष्ट्र पर्यटन मंडळाचे ४० लाख थकविणार्‍या कंपनीवर पर्यटनमंत्र्यांची कृपादृष्टी- राष्ट्रवादी काँग्रेस
* कॉल डिटेल रेकॉर्ड लीक केल्याप्रकरणी रजनी पंडित यांना ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
* राष्ट्रपतींच्या अभिभाषण आभार प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
* पंतप्रधानांचे भाषण:
* आपले सरकार नेमचेंजर नसून ते 'एमचेंजर म्हणजे लक्ष्याचा पाठलाग करणारे
* काँग्रेसला 'न्यू इंडिया' नको तर काय 'आणीबाणी' आणि 'घोटाळ्यांचा भारत' हवा आहे का?
* गांधीजींना हवा असलेला काँग्रेस मुक्त भारत हवा आहे, कारण स्वातंत्र्य मिळाले देशाला काँग्रेसची गरज नाही
* फूट पाडणं काँग्रेसचा स्वभावच, देशाचे तुकडे करून विष पेरलं, काँग्रेसच्या पापाची शिक्षा सव्वाशे कोटी भारतीय भोगत आहेत
* देशाचे पहिले पंतप्रधान सरदार पटेल असते तर आज काश्मीर पाकिस्तानकडे नसते
* नरेंद्र मोदी यांचं संसदेत भाषण सुरू विरोधकांचा गोंधळ, घोषणाबाजीत तेलुगू देसम आघाडीवर
'* बंद करो बंद करो, जुमलेबाजी बंद करो', 'क्या हुआ क्या हुआ १५ लाख का क्या हुआ,' 'खोटी भाषणे बंद करा' 'मॅच फिक्सिंग बंद करा,' च्या घोषणा
* 'न्यू इंडिया'त ०८ महिन्याच्या चिमुरडीवर बलात्कार होत असेल, तर आम्हाला जुना भारत परत द्या- गुलाम नबी आझाद
* ड्रायव्हिंग लायसन्स आधारशी जोडणे होणार अनिवार्य- रस्ते सुरक्षा समितीची सुप्रीम कोर्टात माहिती
* रिझर्व्ह बँकेच्या नव्या पतधोरणानुसार एप्रिल २०१६ पूर्वीच्या गृहकर्जाचे हप्ते कमी होण्याची शक्यता, रेपो दरात बदल नाही
* उत्तर प्रदेश: खाजगी शाळेत गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षिकेची मारहाण, चौथीच्या विद्यार्थ्यीनीचा मृत्यू, गुन्हा दाखल
* 'पद्मावत' मध्ये आक्षेपार्ह काहीच नाही, गौरवशाली इतिहास दाखवला गेला, देशाला अभिमान वाटला पाहिजे- राजस्थान न्यायालय
* गायीची हिंसा रोखण्यासाठी तिला राष्ट्रीय पशुचा दर्जा द्या- जमीयत उलेमा-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना मदनी
* राजस्थानमधील पोटनिवडणूक निकालांमुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, २०१९ मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान नसणार- काँग्रेसचे मत


Comments

Top