HOME   महत्वाच्या घडामोडी

पाऊस अन गारपीट: ०४ ठार, लातुरातही गारा, दोन बैल दगावले

पाऊस अन गारपीट: ०४ ठार, लातुरातही गारा, दोन बैल दगावले

औरंगाबाद: आज पहाटेपासूनच सुरु झालेल्या पाऊस आणि गारपिटीने चौघांचा बळी घेतला. पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. सरकारने मृतांच्या कुटुंबियांना मदत देण्याचे घोषित केले असून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशच्या काही भागात वेगवेगळ्या वेळी हे आस्मानी संकट आले. लातुरातही सहाच्या सुमारास पाऊस झाला. हवामान खात्याने या आधीच या संकटाची सूचना दिली होती. जालना जिल्ह्यात सलग १५ मिनिटे झालेल्या गारपिटीत आंबा, द्राक्षे, गहू, हरभरा या पिकांचे नुकसान झाले. बीड्म वाशिम आणि धुळ्यातल्याही शेतीचे नुकसान झाले. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा सारा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.
लातूर जिल्ह्यात सहा ठिकाणी गारा
या पावसाने आणि गारपिटीने लातूर जिल्ह्याचेही नुकसान केले. रेणापूर तालुक्यातील वंजारवाडी, सुमठाणा, बिटरगाव या गावात गारा कोसळल्या. लातूर तालुक्यातील माटेफळ, खुंटेफळ आणि भिसे वाघोली येथे गारपीट झाली. बोरगाव दोन बैल दगावले.


Comments

Top