HOME   महत्वाच्या घडामोडी

जयललिता विधानसभेत, सेनेला १४० जागा, पाच हत्ती दगावले, सैनिकांआधी स्वयंसेवक, न्यूयार्क सर्वात श्रीमंत, पकिस्तानात पॅडमॅन नाही......१२ फेब्रुवारी २०१८

जयललिता विधानसभेत, सेनेला १४० जागा, पाच हत्ती दगावले, सैनिकांआधी स्वयंसेवक, न्यूयार्क सर्वात श्रीमंत, पकिस्तानात पॅडमॅन नाही......१२ फेब्रुवारी २०१८

* आज लातुरच्या बाजारात सोयाबीन ४०००, तूर ४५२१, हरभरा४०१२ तर उडीद पोचले ४२११ वर
* एमपीएस्सीच्या हजारो विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी काढला लातुरच्या टाऊन हॉल मैदानावरुन मोर्चा
* आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला १४० जागा देण्याची भाजपाची तयारी
* मंत्रालयातील सर्वर बंद, अनेक ऑनलाईन सेवा बंद
* पंढरपुरात वीज चोरी पकडण्यास गेलेल्या अधिकार्‍याला मारहाण
* हसण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही, अजून जीएसटी लागला नाही- खा. रेणुका चौधरी
* वादळी वारे, पाऊस आणि गारपीटीमुळे घरांचंही मोठं नुकसान
* विदर्भात संत्रा बागा जमेनदोस्त
* मराठवाड्यात आजही गारपिटीचा इशारा
* शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देणार मग सोयाबीनला सात हजार कधी देणार? नारायण राणे यांचा सवाल
* देशाचं आजचं स्वरुप मराठ्यांच्या शौर्यामुळे, आरक्षण देण्याचीही तयारी- मुख्यमंत्री
* परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना फेसबुकवर प्रश्न विचारणारा कर्मचारी निलंबित
* गुवहाटीत रेल्वेची हत्तींच्या कळपाला धडक, पाच हत्ती दगावले
* भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला आग
* शिर्डीच्या राहता गावात मनोरुग्णाला कचर्‍याच्या ट्रॅक्टरमधून काढले गावाबाहेर
* राम मंदिराचा प्रश्न न्यायालयाबाहेर सुटण्याची शक्यता कमे
* मराठा आरक्षणासाठीच एनडीएला पाठिंबा- नारायण राणे
* नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर मनपा कर्मचार्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न
* गरज पडली तर सैनिकांआधी स्वयंसेवक तयार असतील- संघ
* माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या प्रतिमेचे आज तामिळनाडू विधानसभेत अनावरण
* राष्ट्रवादी समविचारी पक्षांसोबतच राहणार- शरद पवार
* प्रत्येक जिल्ह्यात किमान हजार उद्योजक तयार व्हावेत सरकार मदत करेल- मुख्यमंत्री
* मामाच्या गावच्या पोरीसोबत लग्न करण्याची इच्छा राहून गेली- शरद पवार
* दोन्ही कॉंग्रेस एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन होईल - खा. विजयसिंह मोहिते पाटील
* सर्वात श्रीमंत शहरात मुंबई १२ वे पहिल्या क्रमांकावर न्यूयार्क
* मराठा आरक्षणाला शिवसेनेचा विरोध, मोर्चे पाहिल्यावर बदलली भूमिका- नारायण राणे
* बंद केलेल्या नोटा अजूनही मोजणे सुरु
* माझ्या राजकारणाचा रंग भगवा असणार नाहा- कमल हसन
* अक्षयकुमारचा पॅडमॅन संस्कृतीविरोधी, पाकिस्तानात परवानगी नाही
* विधानसभेच्या पुढच्या अधिवेशनात मी मंत्री असेन- नारायण राणे
* अद्ययावत रडार आणि तज्ञांच्या अभावामुळेच दरवर्षी होते गारपिटीने नुकसान
* आरआर पाटील यांना कॅन्सरची लक्षणे वेळेत कळालीच नाही, अनथा ते वाचले असते- अजित पवार
* आगामी काळात नोकर्‍या मिळणार नाहीत, व्यवसयाकडे वळावे लागेल- माधव भंडारी


Comments

Top