HOME   महत्वाच्या घडामोडी

रेल्वेतही ब्लॅक बॉक्स, भाड्याने बॉयफ्रेंड, डीएसकेंना पुन्हा संधी, ढोबळेंनी धरले गडकरींचे पाय, जेल झाल्या ओव्हरफुल्ल, शाहरुख दिलीपकुमारांकडे........१४ फेब्रुवारी २०१८

रेल्वेतही ब्लॅक बॉक्स, भाड्याने बॉयफ्रेंड, डीएसकेंना पुन्हा संधी, ढोबळेंनी धरले गडकरींचे पाय, जेल झाल्या ओव्हरफुल्ल, शाहरुख दिलीपकुमारांकडे........१४ फेब्रुवारी २०१८

* आता विमानाप्रमाणे रेल्वेतही असणार ब्लॅक बॉक्स
* हैद्राबादहून लातुरला आणताना २८ लाखांचा गुटखा जप्त
* शुक्रवारी सादर होणार लातूर महानगरपालिकेचा अथसंकल्प
* वरवंटीच्या कचरा डेपोला तिसर्‍या दिवशीही कुलूप
* गारपिटीत मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना चार लाखांची मदत जाहीर
* मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना मिळणार ३० हजार
* दक्षिण अफ्रिकेसोबतची वन डे मालिका भारताने जिंकली, पाच सामन्यात विजय
* ज्येष्ठ पत्रकार, लेखक पद्मश्री मुझफ्फर हुसेन यांचे निधन, आज अंत्यसंस्कार
* पंचनामे आणि नुकसान भरपाईसाठी गारपीटग्रस्त शेतकरी रस्त्यावर, नागपूर-अमरावती रस्त्यावर रास्ता रोको
* व्हॅलेंटाईन डे साठी बॉयफ्रेंड भाड्याने मिळेल, गुरुग्रामचा तरुण शकुल गुप्ता याने फेसबुकवर टाकली पोस्ट
* नाशिक महानगरपालिकेतील देवतांचे फोटो आयुक्त तुकाराम मुंडे यांनी हटवले
* पाकिस्तानच्या हल्ल्यात पाच मुस्लीम जवानांचा समावेश, मुस्लीमांच्या देशप्रेमावर संशय घेऊ नये ओवेसी यांचा सल्ला
* व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला शिवसेनेतर्फे औरंगाबादेत आई-वडिलांचं पूजन
* ५० कोटी भरण्यात डीएस कुलकर्णी अपयशी, २२ फेब्रुवारीला पुढची सुनावणी
* नागरिकांचे पैसे बुडवून डीएसके सुखाने कसे काय झोपतात?- उच्च न्यायालय
* माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पाय धरले, भाजपात यायला उत्सुक
* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वाधिक २२ राजकीय गुन्हे
* मे महिन्यात अ‍ॅंड्रॉईडची दहावी आवृत्ती सादर होणार
* देवेंद्र फडणवीस सरकार विरोधार लोकक्षोभ वाढू लागला- पृथ्वीराज चव्हाण
* कोल्हापुरात बडवे कुटुंबानं साजरा केला मुलीचा जन्मोत्सव
* राज्यातील पाच मध्यवर्ती कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी
* संघप्रमुखांकडून सैनिकांचा अवमान, माफी मागा अन्यथा राज्यभर आंदोलन- राष्ट्रवादी
* शालेय विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनाच्या पुस्तकात आक्षेपार्ह मजकुर, क्रौमार्यभंग, संततीसुख आणि अवजड शब्द- विखे पाटलांचा संताप
* बेस्टची वाटचाल खाजगीकरणाकडे? उद्यापासून कर्मचारी संपावर
* १८ फेब्रुवारीला नवी मुंबई विमानतळाचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन, कामाला वेग
* नालासोपार्‍यात शिक्षिकेनं कानशिलात मारल्यानं एका विद्यार्थ्याच्या कानाचा पडदा फाटला
* ठाण्यात पिंडीवर थोडेफार दूध वाहून उर्वरीत दूध दिले अनाथालयाला
* शाहरुख खान याने घेतली दिलीपकुमार यांची भेट
* भाजप म्हणजे शिवसेनेच्या झाडावर वाढलेला वेल- सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील
* पैठण येथील जायकवाडी धरणाच्या कालव्यात तोल गेल्याने बैलगाडी पडली, दोन बैलांचा मृत्यू
* सोलापुरातील खून आणि दरोड्यातील संशयित पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दरोडेखोरांचा चाकूहल्ला, एकाचा मृत्यू, तीन पोलीस जखमी
* राज्यातील मुस्लिमबहुल भागांत भाजपाची संवाद यात्रा, १७ व १८ फेब्रुवारी रोजी १५० मुस्लिम महिलांचा होणार अभ्यासवर्ग
* देशाच्या प्रत्येक संस्थेवर, यंत्रणेवर संघाचा कब्जा, सरकारचे निर्णय भाजप नाही तर संघ घेते- राहुल गांधी
* राज्यात बदल्यांसाठी शिफ़ारस करणार्‍या पोलिसांवर होणार कारवाई
* शेतकऱ्यांच्या थकित कर्जावरील ३१ जुलैनंतरचे व्याज शेतकरी किंवा राज्य सरकारने भरावे- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
* बुडित कर्जे किंवा अनुत्पादक कर्जे ओळखण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेची जलदगती प्रणाली
* रक्तपेढ्यांमधील रक्तपुरवठ्यासाठीचे शुल्क अत्यल्प करण्याचे केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश
* पुणे येथे तूप विकण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन चोरट्यांनी पोलिसांच्या घरावर मारला डल्ला
* मुकेश अंबानी आपल्या संपत्तीतून चालवू शकतात देशाचा २० दिवस कारभार- ब्लूमबर्गचा अहवाल
* २०१९ पर्यंत ८० ते ९० टक्के गंगा स्वच्छ होईल- नितीन गडकरी
* पतियाळा हाऊस कोर्टाचे अबु सालेमविरुद्ध २००२ च्या खंडणी प्रकरणात नव्याने वॉरंट, सुनावणी १६ फेब्रुवारीला
* बेंगळुरूमध्ये एका महाविद्यालयात रिअॅलिटी शोच्या ऑडिशनमध्ये विचारले खाजगी प्रश्न, पुढच्या राउंडसाठी घातली कपडे काढण्याची अट
* झकाऊ किनाऱ्यावर पाकिस्तानी नाव भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यात


Comments

Top