HOME   महत्वाच्या घडामोडी

मुस्लीम महिलांचे आंदोलन, आजपासून साहित्य संमेलन, पर्रीकर लिलावतीत, राणे अजूनही ताटकळत, ५७ कृषी महाविद्यालये बंद होणार? राजस्थानात कर्जमाफी......१६ फेब्रुवारी २०१८

मुस्लीम महिलांचे आंदोलन, आजपासून साहित्य संमेलन, पर्रीकर लिलावतीत, राणे अजूनही ताटकळत, ५७ कृषी महाविद्यालये बंद होणार? राजस्थानात कर्जमाफी......१६ फेब्रुवारी २०१८

* लातूर मनपाने सादर केला ४३८.२० कोटींचा, १२.५ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प
* महाराष्ट्र सरकारचं मुख्य संकेतस्थळ सकाळी सात वाजल्यापासून बंद
* छत्रपती शिवरायांच्या विश्व विक्रमी रांगोळीचे लातुरच्या क्रीडा संकुलावर झाले उदघाटन
* सोयाबीन शंभरने कमी झाले
* आज लातुरच्या बाजारात: सोयाबीन ३९००, तूर ४६६७, हरभरा ४०५२ तर उडीद पोचले ४१३० रुपयांवर
* लातूरातील पर्यटन विकास कामांना २ कोटी ८० लाख रूपयांचा निधी
* एचडीएफसी बॅंकेनं लातूर मनपाला कर्ज वसुलीसाठी दिली व्हॅन भेट
* मंत्रालयासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
* लातुरच्या एमआयटी रुग्णालयात महिलेने दिला तिळ्यांना जन्म, तिन्ही मुली सुखरुप
* लातुरचे ५० दिव्यांग उपचारासाठी शिर्डीकडे रवाना, पालकमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा
* लातूर जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी ०२ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर
* भंडारवाडी धरणातील पाणी आज नदीपात्रात सोडणार, शेतकर्‍यांचा विरोध
* मुस्लीम पर्स्नल लॉमध्ये सरकरने लुडबूड करु नये, लातूर आणि रेणापुरात मुस्लीम महिलांची धरणे
* आजपासून बडोद्यात मराठी साहित्य संमेलन
* नीरव मोदीचे पाच हजार १०० कोटींचे हिरे जप्त
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थ्यासोबत संवाद, परिक्षा तणावाबाबत करणार मार्गदर्शन
* डीएसकेंच्या जामीन अर्जावर आज सुनवणी
* कमुनिस्टांचा गन तंत्रवर विश्वास- पंतप्रधान
* नागपुरात पोलिसांनी केला मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त
* भारत आणि दक्षिण अफ्रिकेचा आज सहावा वन डे सामना
* कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध, उद्धव ठाकरे भेटले मुख्यमंत्र्यांना
* मनोहर पर्रिकर ‘लीलावती’त दाखल; फूड पॉयझनिंग झाल्याने गोव्यातून मुंबईला हलवले
* मंत्रीपद तर नाहीच नाही आमदारकीही नाहे, राणे अजूनही ताटकळत!
* स्वदेशी विमान बनवणारे अमोल यादव यांचा राष्ट्रपतींनी केला गौरव
* राजस्थानातही शेतकर्‍यांना कर्जमाफी
* ठण्यात स्नेह संमेलनावेळी विश्वस्ताच्या पत्नीने केली ७९ विद्यार्थ्यांना मारहाण
* राज्यातील ५७ कृषी महाविद्यालयांची अवस्था वाईट, बंद करण्याची राज्यपालांकडे शिफारस
* ‘ब्लू व्हेल’ गेममुळे पुण्यात तरुणाची आत्महत्या
* बोंडाळअळीग्रस्तांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही मग गारपीटग्रस्तांना कधी मिळणार?
* नोटाबंदीनंतर जिल्हा बॅंकांकडे जमा असलेल्या नोटा ठरवल्या बुडीत, ०८ बॅंकांचे १४ कोटी ७२ लाख धोक्यात
* भाजपा आणि संघवाले हिटलरची औलाद आहेत, लोकशाही विरोधी आहेत- ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार उत्तम कांबळे
* मुख्यमंत्र्यांच्या घराभोवतीही जाळी बांधणार का? शिवसेनेचा सवाल
* आजवर दिली ५० लाख शेतकर्‍यांना दिली कर्जमाफी- मुख्यमंत्री
* कळंबच्या एसबीआय शाखेत १८ लाखांचा घोटाळा
* साठवणुकीवर बंदी आणल्याने साखरेच्या भावात १५ टक्क्यांनी वाढले
* सोमवारपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात
* महिलांना रेशन दुकानांवर सॅनिटरी नॅपकिन विनामूल्य देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
* कर्करुग्ण, अपंग तसेच आर्थिक दुर्बल गटातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन मिळणार विनामूल्य,
* दहावी आणि बारावीची पेपरफुटी रोखण्यासाठी परीक्षा केंद्रात पर्यवेक्षक व इतर सर्व कर्मचाऱ्यांना मोबाईल बंदी
* भाजप आमदार आशीष देशमुख यांना आयडीबीआयची थकबाकीची नोटीस, २० फेब्रुवारीपर्यंत भरावे लागणार ०५ कोटी
* कमला मिल आग प्रकरण: मुंबई हायकोर्ट आज आदेश देण्याची शक्यता
* अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे तपास यंत्रणांनी गुन्हेगारांवर वरचढ व्हावे, आवश्यकता असल्यास 'एनआयए'ची मदत घ्यावी- उच्च न्यायालय
* उच्च न्यायालयात दाभोळकर- पानसरे हत्याकांडासंदर्भातील याचिकेवर सुनावणी
* ज्यांची भांडणे ही विनोदी वाटतात, ते आता युद्धाची भाषा करत आहेत- धनंजय मुंडे यांचा मोहन भागवत यांना टोला
* देशात मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा प्रयत्न, देशाची हुकूमशाही कडे वाटचाल- अजित पवार नगरमध्ये
* कोरेगाव भीमा प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेंवरील कारवाईसाठी आरपीआयचा पुण्यात मोर्चा
* मुलांच्या अवांतर वाचनाच्या पुस्तकांतील आक्षेपार्ह मजकूर लक्षात आणून दिल्यावर शिक्षण विभागाने गायब केली पुस्तके- राधाकृष्ण विखे पाटील
* जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांच्या गाडीला अपघात, सर्वजण सुखरूप
* मुंबई सेंट्रल बसस्थानकात महिला प्रसाधनगृहात सॅनिटरी नॅपकिन स्वयंचलित यंत्र
* हवाई दलाचे हेलिकॉप्टर आसाममधील माजुली येथे कोसळले, दोन पायलटचा जागीच मृत्यू
* गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना अन्न विषबाधा, मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल
* त्रिपुरा निवडणुक: अगरतळाच्या प्रचार सभेत कम्युनिस्टांना हटवून भाजपला निवडून देण्याचे नरेंद्र मोदी यांचे आवाहन
* हरयाणामधील हुंकार रॅलीत भाजप अध्यक्ष अमित शहा झाले सहभागी
* एमपीएससीच्या निवडप्रक्रियेवरील स्थगिती कायम, सरकारी वकील गैरहजर राहिल्याने कोर्टाचा निर्णय
* दक्षिण आफ्रिकेतील राजकीय भूकंपामागे उत्तर प्रदेशातील अजय, अतुल आणि राजेश गुप्ता बंधुंचा हात, गुप्ता बंधूंच्या घर आणि कार्यालयावर छापे
* पंजाब नॅशनल बँक महाघोटाळा:
* महाघोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदीच्या घरासह ०९ ठिकाणी छापे, शोरूमवरही छापा
* ईडीने नीरव मोदीकडील ०५ हजार १०० कोटीचे हिरे, अलंकार आणि सोने केले जप्त
* ठाणे येथील विवियाना मॉलमध्ये गिली ज्वेलर्सवर छापा
* २०११ पासून कर्जघोटाळा, गेल्या महिन्यात गोष्ट उघडकीस, रक्कम वसुलीसाठी पावले उचलली आहेत- व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता 'पीएनबी' ही पारदर्शक आणि जबाबदार बँक, गैरव्यवहाराची तितक्याच कठोरतेने तड लावलेली आहे- सुनील मेहता
* घोटाळ्याच्या कॅन्सरवर यशस्वी शस्त्रक्रिया केली जाईल- सुनील मेहता
* घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील निर्देशांकही घसरले
* आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता, आत्तापर्यंत दहा अधिकारी निलंबित
* दावोसमध्ये पंतप्रधान मोदींना भेटा आणि जनतेचा पैसा घेऊन विजय मल्ल्यासारखं फरार व्हा- राहुल गांधी
* घोटाळा काँग्रेसच्या काळात सुरू झाला, ज्यांचे घर काचेचे त्यांनी दगड मारणे बंद करावे- रविशंकर प्रसाद
* महाघोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदी स्वित्झर्लंडमध्ये- 'टाइम्स नाऊ'चे वृत्त
* घोटाळा झाला तेव्हा सत्तेत नव्हतो, काँग्रेस आता आरोप करत आहे, २०११ ते १४ मध्ये झोपली होती का?- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री एस. पी. शुक्ला


Comments

Top