HOME   महत्वाच्या घडामोडी

पहाटे पाचला डीएसकेंना अटक, श्रीपाद छिंदम पदावरुन बाजुला, पाकिस्तानचे पाणी अडवणार, एप्रिलमध्ये चंद्रावर, मोदी म्हणतात स्वत:शी करा स्पर्धा, परिक्षा पे चर्चा.....१७०२१८

पहाटे पाचला डीएसकेंना अटक, श्रीपाद छिंदम पदावरुन बाजुला, पाकिस्तानचे पाणी अडवणार, एप्रिलमध्ये चंद्रावर, मोदी म्हणतात स्वत:शी करा स्पर्धा, परिक्षा पे चर्चा.....१७०२१८

* लातूर शहरातील पथदिवे बंद असल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसने काढला मनपावर मेणबत्ती मोर्चा, हेंडगे अन कंदिलही सहभागी
* राष्ट्रवादीची हल्ला बोल यात्रा आज पोचली नाशिकमध्ये
* पंजाब नॅशनल बॅंकेतील घोटाळा प्रकरणी गोकुळनाथ शेट्टी, मनोज खरात, हेमंत भट यांना अटक
* केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी केली अधिकार्‍याला शिवीगाळ
* तिहेरी तलाक विरोधी विधेयकाच्या विरोधात जालन्यात मुस्लीम महिलांनी काढला मोर्चा
* धर्मा पाटील यांना शहीद घोषित करण्याची मागणी
* बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांना दिल्लीत अटक, पहाटे पाच वाजता कारवाई
* डीएसकेंना आता एकही संधी देण्याची इच्छा नाही, गुंतवणूकदारांबद्दल वाईट वाटतेय- उच्च न्यायालय
* यशवंत सिन्हा यांचे नागपुरात ठिय्या आंदोलन
* यंदा देशात आजवर २६१ लाख टन साखरेचे उत्पादन, ऊसाचे क्षेत्र वाढले
* ग्रामीण भागात २०११ पर्यंत सरकारी जमीनेवरील अतिक्रमित घरे करणार नियमित
* इतरांशी स्पर्धा करण्याआधी स्वत:शी स्पर्धा करा, पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांना सल्ला
* व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्व्रारे देशभरातील १० कोटी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी पाहिला पंतप्रधांचा ‘परिक्षा पे चर्चा’
* उस्मानाबाद: ऊसतोड होत नसल्याने शेतकर्‍याने आंबेडकर साखर कारखान्याच्या कार्यालयातच केला विष प्राशन करण्याचा प्रयत्न
* छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्ध काढणारा नगरचा भाजपचा उप महापौर श्रीपाद छिंदमला अटक, पद काढले, पक्षातून काढले
* छिंदमने शिवराय आणि शिवजयंतीबद्दल काढले होते अपशब्द, नंतर सोशल मिडियावरुन मागितली होती माफी
* पुढील वर्षापासून साहित्य संमेलनाला ५० लाखांचे अनुदान, मुख्यमंत्र्यांची घोषणा
* ११ हजार कोटींना चुना लावणारा नीरव मोदी बेल्जियममधूनही होणार पसार
* मंत्रालयात दुपारी तीन ते साडेतीन सामान्यांना वेळ, अधिकार्‍यांना दिल्या सूचना
* १८ एप्रिलपासून सामान्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे राज्यातील अधिकाऱ्यांना आदेश
* मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार- मुख्यमंत्री
* सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये युवती राष्ट्रवादीने पाळला गाजर डे
* परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वाशिम जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतीची केली पाहणी
* कर्जमाफी होत नाही, सहकार चळवळ मोडीत काढली जातेय, पण बड्या भांडवलदारांना वाचवलं जातंय- सुनील तटकरे
* कमला मिल आग: निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश
* नागपूर येथे कंटेनर कार धडकेत ०७ ठार तर ०१ गंभीर
* सोलापुरात पत्नीचा आजार बळावल्याने नैराश्याने ग्रासलेल्या वृध्दाने पत्नीचा खून करुन स्वत: केली आत्महत्या
* यवतमाळमध्ये बारावीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांची प्रेम प्रकरणातून हत्या
* गटबाजी वेळीच न थांबल्यास सोलापूर महापालिका बरखास्त होईल- मुख्यमंत्र्यांचा इशारा, तरीही मंत्री देशमुखांतील गटबाजी थांबेना
* खो-खो, कबड्डी, सामुदायिक कवायती, योग साडीमध्ये करणे अवघड, राज्यभरातील शिक्षिकांची ड्रेसच्या परिपत्रकासाठी चळवळ
* राज्य सरकार बोलण्यात ‘ऑनलाईन’ आणि कामात ‘ऑफलाईन’- अशोक चव्हाण
* राज्यातील महामंडळांच्या नियुक्त्या रखडल्य़ाने भाजपात नाराजी
* भारतातील तीन नद्यांचे पाकिस्तानात जाणारे पाणी अडवून सिंचनासाठी वापर करणार- जलसंपदा मंत्री नितीन गडकरी
* भागीदारी तत्वावरील डायलेसिस केंद्र न उभारल्याने सलमान खानची ‘बीइंग ह्युमन’संस्था अडचणीत
* नाशिकमध्ये श्वासनलिकेत हरभरा अडकल्याने ०१ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू
* कर्नाटकात राज्य सरकार देणार मोफत घरगुती गॅस जोडणी व शेगडी
* बेंगळुरू शहराची पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन न्यायालयानं तामिळनाडूच्या वाट्याच्या पाण्यात केली कपात
* बलात्काराची किंमत साडेसहा हजार आहे काय? आर्थिक साह्य देऊन दान करता का?- सर्वोच्च न्यायालयाने फ़टकारले मध्य प्रदेश सरकारला
* एप्रिल महिन्यात भारताची चांद्रमोहीम होणार सुरू
* राजस्थानातील जैसलमेर येथे २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होणार ‘राग’स्थान’ महोत्सव, ४० देशांतील कलावंतांचा सहभाग
* काँग्रेसची सुकाणू समितीची स्थापन, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, पी. चिदंबरम यांचा समावेश
* मोदीजी येतात, २-३ आश्वासने देतात, निवडणुकीनंतर विसरून जातात, जेथे जातात तेथे चुकीची आश्वासने देतात - राहुल गांधी त्रिपुरामध्ये
* भारतीय संघाचा वनडेत दक्षिण आफ्रिकेवर ०८ गडी राखून विजय, मालिकाही जिंकली ५-१ने
- पीएनबी घोटाळा:
* नीरव मोदी, पत्नी अमी मोदी, भाऊ निशाल मोदी आणि गीतांजलीचे प्रमोटर मेहुल चौकसी विरोधात इंटरपोलची नोटीस
* मुंबईतील आणखी ०८ अधिकारी निलंबित, एका महाव्यवस्थापक दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश
* पैसे बँकेत ठेवले तर नीरवची आणि घरी ठेवले तर नरेंद्र मोदींची भीती, नीरव मोदी हा व्हायरस झपाट्याने पसरत आहे- संजय राऊत
* बँकांनी लघु उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, ते नीरव मोदी किंवा विजय मल्ल्या नाहीत पळून जातील- उद्योग मंत्री सुभाष देसाई
* परराष्ट्र मंत्रालयाने नीरव मोदी, मेहुल चोकसीचे पासपोर्ट केले रद्द
* मेहुल चोकसीच्या गीतांजली समूहाच्या कार्यालयांवर सीबीआयचे छापे
* लवकरात लवकर कठोर कारवाई होईल : गृहमंत्री राजनाथ सिंह
* पीएनबीचे माजी उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टींच्या मालाड येथील घरावर सीबीआयची धाड


Comments

Top