HOME   महत्वाच्या घडामोडी

साध्वी बांधणार मंदीर, नीरव देणार महिना ५० कोटी, लटकत-अडकत-भरकटत, डीएसके बेशुद्ध, २१ पासून १२ वी, स्वयंसेवकांना पाठवा सीमेवर, मोदींशी भांडा जेलमध्ये जा......१९ फेब्रुवारी २०१८

साध्वी बांधणार मंदीर, नीरव देणार महिना ५० कोटी, लटकत-अडकत-भरकटत, डीएसके बेशुद्ध, २१ पासून १२ वी, स्वयंसेवकांना पाठवा सीमेवर, मोदींशी भांडा जेलमध्ये जा......१९ फेब्रुवारी २०१८

* देशाच्या कल्याणासाठी अधिकाधिक मुले जन्माला घाला- साध्वी प्रज्ञासिंह
* दिल्लीतल्या शिवजयंतीला मोठा प्रतिसाद, राष्ट्रपतीही येणार
* १४ किल्ल्यांच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली सरकारने
* औरंगाबाद-बीड मार्गावर बियर वाहून नेणारा ट्रक उलटला, बघ्यांनी पळवले बियरचे बॉक्स
* इच्छा मरणाचा अर्ज प्रलंबित, गिरगावातील लवाटे वृद्ध दांपत्यानं ठरवला हत्येचा डाव
* पाकिस्तानी क्रिकेटर इम्रान खान तिसर्‍यांदा विवाहबद्ध
* लातूर जिल्हा बॅंकेने बेलकुंडचा संत शिरोमणी कारखाना केला जप्त
* संत शिरोमणी कारखान्याकडून बॅंकांचे १३ कोटींचे येणे
* प्रशासनाने कारखाना सुरु न केल्यास विक्रीला काढावा लागेल- जिल्हा बॅंक
* नीरव मोदी पंजाब बॅकेला दरमहा ५० कोटी देण्यास तयार
* स्वभिमानी शेतकरी संघटनेची वाढली कॉंग्रेसशी जवळीक, शेट्टी यांची चाकूरकरांसोबत दीड तास चर्चा
* शिवनेरीवरील शिवजयंती सोह्ळ्याला मुख्यमंत्री राहणार उपस्थित
* दिल्लीतील शिवजयंती कार्यक्रमाला राष्ट्रपती राहणार उपस्थित
* गोव्याचे मुखमंत्री मोहन पर्रीकर लिलावती रुग्णालयात दाखल, पंतप्रधानांकडून चौकशी
* गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांवर स्वादूपिंडावर इलाज, प्रकृतीविषयी उलटसुलट बातम्यांमध्ये तथ्य नाही- लीलावती रुग्णालय
* शिवनेरी किल्ल्यावर दारु पार्टी करणारे कर्मचारी निलंबित, पोलिसांचाही समावेश
* नवी मुंबईच्या विमानतळाचे पंतप्रधानांनी केल भूमीपूजन, भाषणाची सुरुवात मराठीतून
* उदघाटन केलेली कामे लवकरच होतील सुरु- पीएम
* प्रकल्प लटकवायचे, अडकवायचे आणि भरकटत ठेवायचे हे आधीच्या सरकारचे धोरण- पंतप्रधान
* जागतिकीकरण नवीन युगाचे वास्तव, अशा वातावरणात प्रगती करण्यासाठी पायाभूत सुविधाही दर्जेदार असणे अपरिहार्य- नरेंद्र मोदी
* पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवायला आलेल्या कार्यकर्त्यांना अटक
* डीएस कुलकर्णींना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करणार
* डीएसकेंची पोलिस कोठडी, न्यायालयीन कोठडीत परावर्तीत
* डीएसके शुद्धीत नसल्याची डॉक्टरांची माहिती
* शिवस्मारकाच्या कामालाही होणार लवकाच सुरुवात, पंतप्रधानांची ग्वाही
* बाबरी मंदीर पाडायला गेले होते, आता मंदीर बांधायला जाणार- साध्वी प्रज्ञासिंह
* साध्वी प्रज्ञासिंह यांचे राजकारणात येण्याचे संकेत
* पंजाब नॅशनल बॅंक घोटाळ्यावर पंतप्रधान का बोलत नाहीत- राहूल गांधी
* नागपुरातल्या पत्रकाराच्या आईची आणि मुलीची हत्या आर्थिक वादातून झाल्याचे निष्पन्न
* बेळगावला महाराष्ट्रात समाविष्ट करुन घेण्यासाठी सरकारवर दबाव आणा- संमेलनाध्यक्ष अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख
* त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत ७४ टक्के मतदान, माकप आणि भाजपात स्पर्धा
* राज्यात बारावीची परीक्षा २१ तारखेपासून होणार सुरू, परीक्षा गैरप्रकार रोखण्यासाठी नियमावलीत बदल
* एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था असणारे राज्य करण्याचे फ़डणवीस सरकारचे उद्दिष्ट, देशातील पहिले राज्य ठरणार
* राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ०४ टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा राज्य सरकारचा निर्णय, ०१ जुलै, २०१७ पासून वाढ होणार लागू
* वाढीव महागाई भत्त्याचा १९ लाख कार्यरत व निवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना होणार लाभ
* भारतातील दहशतवादी कारवायास आयएसआय, पाक सरकार आणि लष्कराची फूस असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध करणार- उज्ज्वल निकम
* लोकांमधील सरकार आणि प्रशासनाबद्दलचा असंतोष दूर करा- सचिवांना कारभार अधिक गतिमान आणि पारदर्शी करण्याच्या सूचना
* ‘झिरो पेन्डन्सी अॅण्ड डेली डिस्पोजल’ हा नवा उपक्रम राज्यभरात १८ एप्रिलपासून होणार लागू
* कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकात नोंद करण्याचे राज्य मुख्य सचिवांचे आदेश
* केंद्र सरकारने संघाच्या स्वयंसेवकांना काठी घेऊन सीमेवर दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी पाठवावे- शरद पवार
* पासवर्ड पुरवल्यानेच नीरव मोदीला बनावट समझोता पत्रे मिळू शकली- पीएनबीचे माजी उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी
* सहायक उपमहाव्यवस्थापकांच्या पातळीवर वापरला जाणारा ‘लेव्हल ५’ पासवर्ड नीरव मोदीच्या कंपनीला दिल्याची शेट्टी यांची कबुली
* वेगळ्या विदर्भाचे बिल आणायचे नाही असा नरेंद्र मोदी यांनी दम भरला होता, मोदींशी भांडणारा जेलमध्ये जातो- नाना पटोले
* वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी विदर्भवादी संघटना व राजकीय पक्ष एकत्र
* स्थलांतरित फ्लेमिंगोंसाठी शिवडी परिसरात पर्यावरण पार्क उभारण्याचा मुंबई पोर्ट ट्रस्टचा निर्णय
* देशातील ४२ भाषा, बोलीभाषा अस्तंगत होण्याच्या मार्गावर, बुलडाण्यातील निहाली या भाषेचाही समावेश- गृह मंत्रालय
* देशासह महाराष्ट्रातही मानसोपचार तज्ज्ञांची कमतरता, मुंबई, ठाणे, औरंगाबादमध्ये सुरू करणार समुपदेशकांचा प्रशिक्षण अभ्यासक्रम
* उपमहापौर श्रीपाद छिंदम यांची नगर भाजपने हकालपट्टी केली असली तरी प्रदेश भाजपची कारवाई नाही
* इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यानेच पाक दहशतवादी महंमद नावीद जट्ट जम्मु पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्यात यशस्वी
* कमल हसनने घेतली डीएमके नेते करुणानीधी यांची भेट
* २०१८ च्या हज यात्रेसाठी पाकिस्तान पाठविणार स्वयंसेवक म्हणून तृतीयपंथीयांना


Comments

Top