HOME   महत्वाच्या घडामोडी

शिवरायांची रांगोळी आज आणि उद्या, तडीपार करा, कोस्टल मार्ग मे पासून, पवारांची मुलाखत, नीट परिक्षेसाठी ड्रेस कोड, हिंदुंनी संतती वाढवावी.......२० फेब्रुवारी २०१८

शिवरायांची रांगोळी आज आणि उद्या, तडीपार करा, कोस्टल मार्ग मे पासून, पवारांची मुलाखत, नीट परिक्षेसाठी ड्रेस कोड, हिंदुंनी संतती वाढवावी.......२० फेब्रुवारी २०१८

* बुधवारी आ. अमित देशमुख देणार प्रदीप राठी यांच्या निवासस्थानी भेट
* शाहू कॉलेज समोरच्या न्यू इंडीया अश्शुरन्स कंपनीच्या शाखेत सव्वा दोन लाखांची चोरी
* पुन्हा गारपीट आणि जोरदार पावसाचा अंदाज
* मिलींद एकबोटेंना आजवर अटक का केली नाही? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
* नागपूर शहर बस सेवेतील सर्व कर्मचारी संपावर
* शालार्थ सॉफ्टवेअर बंद, शिक्षकांचे पगार रखडले, ऑफलाईन पगार करण्याचा विचार
* उत्तरप्रदेशात चावणार्‍या सापाचे मुंडके तोडून चावून फेकून दिले, सोनेलाल अत्यवस्थ
* श्रीपाद छिंदमच्या विरोधात लातुरचे मार्केट यार्ड बंद, जाळली प्रतिमा
* शेतकर्‍यांच्या रोषामुळं जालनाचा गारपीट भागाचा दौरा अर्धवट सोडून मंत्री सदाभाऊ खोत परतले
* पुण्यात रेल्वेचं प्लॅटफॉर्म तिकीत आता २० रुपये!
* उद्या पुण्यात राज ठाकरे घेणार शरद पवार यांची मुलाखत
* भाजपमधून बडतर्फ श्रीपाद छिंदम याचा उपमहापौरपदाचा राजीनामा मंजूर
* शिवरायांची विश्व विक्रमी रांगोळी २० आणि २१ फेब्रुवारी रोजीही पाहण्यासाठी खुली
* २३, २४ व २६ फेब्रुवारी रोजी लातुरात नव निर्माण व्याख्यानमाला
* राज्य शिक्षकेतर कर्मचारी २३ तारखेला काढणार मंत्रालयावर मोर्चा
* शिवरायांबद्दल अपशब्द काढणार्‍यांना तडीपार करा- लातुरात तृप्ती देसाई
* लातूर महानगरपालिकेने टंचाई काळातील पाणी पट्टी माफ करावी, संतुजी ब्रिगेडची मागणी
* कंत्राटी अधिकारी-कर्मचार्‍यांचे २१ तारखेला जिल्हधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
* अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारमुक्ती आंदोलनात सहभागी होणार नाही, रामदेवबाबांची भूमिका
* रोटोमॅक कंपनीचा घोटळा ०३ हजार ६९५ कोटींचा
* पीएनबी बॅंकेचं प्रकरण सार्वजनिक केल्याने परतफेड करु शकत नाही- नीरव मोदी
* पीएनबी घोटाळा २० हजार कोटींवर जाण्याची शक्यता
* कोस्टल मार्गाला मे महिन्यापासून सुरुवत
* डीएसकेंना ससून रुग्णालयातून दीनानाथ रुग्णालयात दाखल केले
* न्या. लोया प्रकरणाची सुनावणी कालही पूर्ण होऊ शकली नाही
* न्यायालयीन देखरेखीखाली न्या. लोया प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी
* शिवस्मारकाचे भूमीपूजन होऊन वर्ष लोटले, अद्याप एक वीटही रचली नाही
* आधार कार्ड मतदान ओळखपत्राला जोडण्याचा प्रस्ताव, बोगस मतदान टाळण्याचा प्रयत्न
* 'शोध मराठी मनाचा' राज ठाकरे २१ फेब्रुवारीला ०५ वाजता बृहन्महाराष्ट्र कॉलेजच्या मैदानावर घेणार शरद पवारांची मुलाखत
* छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणार्‍या श्रीपाद छिंदमला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
* मिलींद एकबोटेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
* नीट परिक्षेसाठी ड्रेस कोड: बूट, कुर्ता, पायजाम्यावर बंदी, दागिने नाहीत, बुरखा घालण्यास परवानगी पण तपासणी होणार
* राज्यात सर्वत्रच तापमानात वाढ, रायगड जिल्ह्यात भीराचा पारा गेला ४० अंशावर
* रतन टाटा यांना देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाउद्योग रत्न पुरस्कार प्रदान
* विकासक संघटनेचा राज्य सरकारबरोबर सामंजस्य करार, मुंबई महानगर परिसरात होणार साडेपाच लाख परवडणारी घरे
* मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत ४३ सामंजस्य करार, राज्यात होणार १२ लाख कोटींची गुंतवणूक
* घराच्या गच्चीवर विमान तयार करणाऱ्या कॅप्टन अमोल यादवबरोबर राज्य सरकारचा ३५ हजार कोटींचा करार
* एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न मात्र कारखानदारीकडे दुर्लक्ष, कारखानदारीची उपेक्षा करू नका- महिंद्रचे पवन गोएंका
* राज्यातील आजी-माजी आमदार व त्यांच्या कुटुंबियांना नवीन विमा संरक्षण योजना
* राज्य सरकार वर्षांला प्रीमियम देणार दहा कोटी, सरकारने निश्चित केलेल्या रुग्णालयांत मिळणार १० लाखपर्यंत मोफ़त उपचार
* देशात मानवधर्माच्या ऐवजी आज अधर्म आणि विधर्म वाढत आहेत, भारताला 'हिंदू पाकिस्तान' बनवले जात आहे- प्रा. योगेंद्र यादव पुण्यात
* हिंदूंनी एक मूल देशधर्म रक्षणासाठी द्यावे, यासाठी संतती वाढविण्याचा निश्चय करावा- साध्वी प्रज्ञासिंह औरंगाबादेत
* श्रीपाद छिंदम याचे वकीलपत्र न घेण्याचा पुणे जिल्हा बार असोसिएशनचा ठराव
* नगर बडतर्फ उपमहापौर श्रीकांत छिंदमचे संपर्क कार्यालय जाळण्याच्या प्रयत्न, तिघांविरुध्द गुन्हा दाखल
* खाजगी रुग्णालयांत रुग्ण व रुग्णालयांच्या हितांचे संतुलन साधणारा कायदा करा- उच्च न्यायालयाचे निर्देश
* पीएनबी घोटाळा:
* बँकेने प्रकरण चव्हाट्यावर आणल्याने विचका, माझी आणि कंपनीच्या ब्रँडची बदनामी झाली, एक छदामही वसूल होऊ शकणार नाही- नीरव मोदी
* बँकेचे १० कंप्यूटर्स, फाईल्स आणि दस्तावेज जप्त
* बेचु तिवारी, यशवंत जोशी आणि प्रफुल्ल सावंत या अधिकाऱ्यांना अटक
* गीतांजली ग्रुपच्या ०७ मालमत्ता जप्त
* देशाच्या भल्यासाठी काम करणार्‍या नरेंद्र मोदींनाच ओळखतो, इतर मोदींची मला माहिती नाही- रामदेवबाबा
* रेल्वेच्या विविध पदांसाठी कमाल वयोमर्यादा वाढवण्याचा रेल्वेचा निर्णय
* सौंदर्य प्रसाधने हवेचे प्रदूषण वाढविण्यास जबाबदार, त्यातील चाळीस टक्के रसायनांमुळे धुलिकण वाढत असल्याचे सर्वेक्षणातून समोर


Comments

Top