HOME   महत्वाच्या घडामोडी

लातुरात तयार होणारे रेल्वेचे डबे परदेशातही जाणार

मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉर्न्व्हजन्सचा समारोप, रेल्वेसोबत ६०० कोटींचा सामंजस्य करार

लातुरात तयार होणारे रेल्वेचे डबे परदेशातही जाणार

मुंबई : मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉर्न्व्हजन्स २०१८ च्या माध्यमातून राज्यात १२ लाख १० हजार ४६४ कोटी रुपये गुंतवणुकीचे ०४ हजार १०६ सामंजस्य करार झाले आहेत. त्या माध्यमातून ३६ लाख ७७ हजार १८५ जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. रेल्वेसोबत झालेल्या ६०० कोटी रुपयांच्या सामंजस्य करारामुळे लातूर येथे सुमारे ३५० एकर जागेवर रेल्वे कोच निर्मिती कारखाना पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात येणार आहे. यामुळे या भागात १५ हजार जणांना थेट रोजगार मिळणार आहे. तर त्याच्या तिप्पट अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर सुरू असलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन २०१८ जागतिक गुंतवणूक परिषदेचा समारोप आज झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, मुख्य सचिव सुमित मल्लिक, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल आदी यावेळी उपस्थित होते.
आज रेल्वेसोबत झालेल्या ६०० कोटी रुपयांच्या सामंजस्य करारामुळे लातूर येथे सुमारे ३५० एकर जागेवर रेल्वे कोच निर्मिती कारखाना पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात येणार आहे. यामुळे या भागात १५ हजार जणांना थेट रोजगार मिळणार आहे. तर त्याच्या तिप्पट अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. हा प्रकल्प एकूण ०२ हजार हेक्टर जागेवर तयार करण्यात येत आहे. तेथे मेट्रो कोच निर्मिती होणार आहे. मेट्रोचे हे डबे देशाबरोबरच जागतिक स्तरावर देखील पाठविण्यात येतील. या प्रकल्पामुळे लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांचे भाग्य उजळणार आहे. मराठवाडा भागात गेल्या अनेक वर्षात कुठलाही मोठा प्रकल्प आला नव्हता. रेल्वे सोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिताला चालना मिळणार आहे.


Comments

Top