HOME   महत्वाच्या घडामोडी

बोगी कारखाना मनपाकडून आभार, विश्व विक्रमी रांगोळीचे विसर्जन, बारावीचा पेपर फुटला, डीएसकेंच्या घराचा लिलाव, सोयाबीन ३७८५, बांदेकरांच्या कारला अपघात......२१ फेब्रुवारी २०१८

बोगी कारखाना मनपाकडून आभार, विश्व विक्रमी रांगोळीचे विसर्जन, बारावीचा पेपर फुटला, डीएसकेंच्या घराचा लिलाव, सोयाबीन ३७८५, बांदेकरांच्या कारला अपघात......२१ फेब्रुवारी २०१८

* गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता आ. अमित देशमुख यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा
* रेल्वे बोगी कारखान्याबद्दल लातूर मनपाने मानले मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांचे आभार
* लातुरच्या क्रीडा संकुलावरील विश्‍वविक्रमी रांगोळीचे दिपोत्सवाने विसर्जन
* बार्शीच्या तांबेवाडीत बारावीचा इंग्रजीचा पेपर फुटला, उघड पाडणार्‍या विद्यार्थ्याचे अपहरण
* डीएसकेंच्या राहत्या बंगल्याची होणार लिलाव, सहासष्ट कोटींच्या पुढे होणार बोली
* कचरा टाकण्यासाठी औरंगाबादला जागाच नाही, शहरात किमान दोन हजार टन कचरा जागोजागी
* लातुरात कंत्राटी कर्मचारी-अधिकार्‍यांनी विविध मागण्यांसाठी केले धरणे आंदोलन, कायमस्वरुपी सरकारी सेवेत सामावून घेण्याची मागणी
* आज लातुरच्या बाजारात सोयाबीन ३७८५, तूर ४५५०, उडीद ४०६१ तर हरभरा पोचला ३८२६ रुपयांवर
* बोलून बोलूनच आम्ही सत्ता गमावली- खा. सुप्रिया सुळे
* आदेश बांदेकर यांच्या कारला अपघात, कसलीही इजा नाही
* परळीला जिल्ह्याचा दर्जा द्या, राष्ट्रवादीची मागणी
* शुक्रवार व शनिवारी उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्याला गारपिटीचा तडाखा बसण्याची शक्यता
* नीरव मोदी निर्दोष, सीबीआय चार्जशीट करेल तेव्हा बोलू- वकिलाचा दावा
* लातूर बोर्डातून ३४ हजार ६३६ विद्यार्थी देणार बारावीची परिक्षा
* लातुरच्या राजीव गांधी चौकातील मिरवणुकीत तलवार घेऊन फिरणार्‍यास अटक
* शाहू चौकातील मोबाईल दुकानास आग तीन लाखांचे नुकसान
* जेवळी येथील वृद्धाच्या खून प्रकरणी चौघांना पोलिस कोठडी
* उदगीर ग्रामीण हद्दीत पहिले फिरते पोलिस ठाणे कार्यान्वीत
* अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी धरणे आंदोलन, मोठी घोषणाबाजी
* आजपासून बारावीची परीक्षा, राज्यभरातून १४ लाख ८५ हजार १३२ परीक्षार्थी, या वर्षापासून उत्तरपत्रिका व पुरवण्यांच्या प्रत्येक पानावर बारकोड
* नोकरीचे आमिष दाखवून ०६ लाख घेतल्याचा आरोप, मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव ईश्वर मंझा अटकेत
* परभणी येथे मोबदल्यासाठी प्रकल्पग्रस्ताकडून एक लाखाची लाच घेताना उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड अटकेत
* जालना येथे स्वाभिमानीने सदाभाऊ खोत यांना दाखवले काळे झेंडे, गारपीटग्रस्त भागाच्या पाहणीसाठी जाताना केला निषेध
* दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींच्या सुटकेचा मार्ग यंत्रणा सोपी करत आहे- डॉ. भारत पाटणकर यांचा आरोप
* सनातन आश्रमात काय चाललेले आहे याचा शोध घेतला पाहिजे, समविचारी संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन केले पाहिजे- भारत पाटणकर
* कोल्हापूर येथे दोघांना अडीच लाखांच्या बनावट नोटांसह अटक
* भाजपच्या सत्तेत चोरांना अच्छे दिन, फडणवीस चांगले, पोलिसांमध्ये सुधारणा हवी, काँग्रेस, राष्ट्रवादी डल्ला मारून हल्लाबोल करीत आहेत- नीलम गोऱ्हे
* हजारो कोटींचा कर्ज घोटाळा करून पळणार्‍यांना पायघडय़ा, मात्र सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना हैराण केले जाते- सुभाष देसाई
* सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग उपक्रमांना वित्तपुरवठा करण्यासाठी बँकांनी पुढे यावे- सुभाष देसाई
* औरंगाबाद येथे जालना रोडवर स्विफ्ट कार झाडाला धडकून दोन डॉक्टरांचा मृत्यू
* डीएसकेंना ठेवणार २३ फेब्रुवारीपर्यंत दिनानाथ हॉस्पिटलमध्ये
* पीएनबी बॅंक प्रकरणी आणखी पाचजणांना अटक
* नीरव मोदीचा अलिबाग जिल्ह्यातील बंगला जप्त
* पंजाब नॅशनल बॅंक प्रकरणी पंतप्रधान घेऊ शकतात अर्थमंत्र्यांचा राजीनामा- पृथ्वीराज चव्हाण
* रोटोमॅकचे विक्रम कोठारी यांची ११ बॅंक खाती गोठवली
* बॉंबे रुग्णालयातील प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉ. बीके गोयल यांचे निधन
* ओडीशाचे मुख्यमंत्री पटनायक यांच्यावर विद्यार्थ्याने फेकली चप्पल
* आज संध्याकाळी पाच वाजता राज ठाकरे घेणार शरद पवार यांनी मुलाखत
* भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी मिलिंद एकबोटेंना अटक का केली नाही?- सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला प्रश्न
* नवी मुंबईत तृतीयपंतियांनी सुरु केलं हॉटेल, चांगला प्रतिसाद
* सरकार देवेंद्रच्या हाती आणि देवेंद्र संघाच्या हाती अशी अवस्था, कोरेगाव दंगल राज्य सरकार पुरस्कृत- जोगेंद्र कवाडे
* अंबरनाथ येथे घरातील गरम सांबार भांड्यात पडून दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू
* फौजदारी गुन्ह्यांच्या खटल्यांतील आरोपींना न्यायालयात हजर करणे कायदेशीर कर्तव्य, पोलिसांची संख्या अपुरी सांगता येणार नाही- उच्च न्यायालय
* महत्वाच्या व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी पोलिस सुरक्षा काढून का घेत नाही?- उच्च न्यायालयाचा सरकारला प्रश्न
* सेनेत सामान्य कार्यकर्ता कसा मोठा होऊ शकतो हे एकनाथ शिंदेंकडे पाहिल्यावर स्पष्ट, एक दिवस ते मुख्यमंत्री होतील- मनोहर जोशी
* देशांतर्गत व परदेशी गुंतवणूकदार करणार राज्यात १२ लाख १० हजार ४६४ कोटींची गुंतवणूक
* कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो भेटले किंगखान शाहरुख खानला
* पीएनबी घोटाळा : संवादाच्या अभावामुळे ११ कोटींचा घोटाळा झाल्याचा तपास यंत्रणांचा खुलासा
* पीएनबी बँकेच्या तीन अधिकर्‍यांना ०३ मार्चपर्यंत कोठडी
* कमल हसन यांच्या पक्षाचा आज स्थापना मेळावा, अरविंद केजरीवाल राहणार उपस्थित
* सत्ताधारी अण्णा द्रमुक अतिशय वाईट पक्ष असल्याने राजकारणात प्रवेश करावा लागला - कमल हसन
* देशातील प्रत्येक जिल्ह्यात कामगार राज्य विमा योजनेचा लाभ पोहोचविणार, १० कोटी लोकांना मिळणार सुरक्षाकवच


Comments

Top