HOME   महत्वाच्या घडामोडी

प्रिया खटल्यातून मोकळी, चिंताजनक जातीयवाद, कमल हसनला प्रतिसाद, मुकेश खन्नांचा राजीनामा, फक्त जयभीम बोला, बटाट्यात उत्तरप्रदेश नंबर वन......२२ फेब्रुवारी २०१८

प्रिया खटल्यातून मोकळी, चिंताजनक जातीयवाद, कमल हसनला प्रतिसाद, मुकेश खन्नांचा राजीनामा, फक्त जयभीम बोला, बटाट्यात उत्तरप्रदेश नंबर वन......२२ फेब्रुवारी २०१८

* आ. अमित देशमुख यांच्या उपस्थितीत आज नळेगावात शेतकरी मेळावा
* लातूर जिल्ह्यात गाळपाविना ऊस शिल्लक राहणार नाही, तशी व्यवस्था केली आहे- आ. अमित देशमुख
* २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी लातुरात गोवा साहित्य संमेलन
* शिवरायांची विश्व विक्रमी रांगोळी साकारणार्‍या कलावंतांचा मराठा क्रांती मोर्चाने केला सत्कार
* लातूर शहरात तीन मटका अड्ड्यांवर धाडी ‘गुरुजी’ विरुद्ध गुन्हा
* मराठवाड्यातील जलस्रोतांचे इस्रायल सर्वेक्षण करणार, जीवन प्राधिकरणशी करार
* नाशिक ते मुंबई लॉंग मार्च, एक लाख शेतकरी विधानभवनाला घालणार घेराव, किसान सभेची घोषणा
* भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर कमी होणार, ८.६५ वरुन ८.५५ टक्के
* शेतकरी धर्मा पाटील आत्महत्येला एक महिना पूर्ण
* महाराष्ट्रातील जातीयवाद चिंताजनक, सर्व पक्षियांनी एकत्र यायला हवे- शरद पवार
* कमल हसनच्या नव्या पक्षाची स्थापना, समर्थकांची मोठी गर्दी
* जातीवर नव्हे आर्थिक निकषांवर आरक्षण मिळावे- शरद पवार
* कनिष्ट महाविद्यालयाच्या शिक्षकांच्या बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार
* बेपत्ता पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे अपहरण प्रकरणी आणखी एकाला अटक
* विदर्भातील शेतकर्‍यांनी कोरफड पिकवावी, पतंजली बांधावरुन घेऊन जाईल- रामदेवबाबा
* चंद्रपुरात रामदेवबाबांना दाखवले काळे झेंडे
* मग्नेटीक महाराष्ट्र मध्ये १२ लाख कोटींची गुंतवणूक म्हणजे धूळफेक- पृथ्वीराज चव्हाण
* महाराष्ट्राला एक करणारी बुलेट ट्रेन हवी- शरद पवार
* २३ तारखेला मोठी गारपीट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता
* केरळीयन अभिनेत्री प्रियावर दाखल झालेले सगळे खटले मागे
* चिल्ड्रन फिल्म सोसायटीच्या अध्यक्षपदाचा मुकेश खन्ना यांचा राजीनामा
* सोलापूरमध्ये झालेला प्रकार पेपरफुटीचा नाही, कॉपीसारखा गैरप्रकार, दोषींवर कडक कारवाई होईल- राज्य शिक्षण मंडळ
* डीएसकेंच्या घराचा लिलाव होणार नसून बालेवाडी येथील जागेचा लिलाव होणार असल्याचे जाहिरातीतून स्पष्ट
* शरद पवारांची राज ठाकरेंनी घेतलेली मुलाखत:
* देशाचे पंतप्रधान असताना देशाचा विचार केला पाहिजे, शरद पवारांचा नरेंद्र मोदींना सल्ला
* शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न करण्याची गरज, कर्जमाफी बरोबरच इतरही प्रयत्न सोबतच झाले पाहिजे
* कुणीही आलं तरी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही, महाराष्ट्र जातीच्या मार्गाने कधीच जाणार नाही
* विदर्भातला मराठी माणूस वेगळ्या विदर्भाचा पुरस्कर्ता नाही
* बाबरी मशिद ढासळल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्र जळत असल्याने परत येण्याचा निर्णय घेतला
* मराठी माणसाला एकाजूट करणारा धागा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
* देशाच्या आणि जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलेला मराठी माणून फक्त शिवाजी महाराजांच्या नावाने एक होतो
* शाहू, फुले आणि आंबेडकर समाजातील एकोप्यासाठी झटले
* अशोक सराफ, लीला गांधी, विलास रकटे, नागराज मंजुळे, मोहन आगाशे, चंदू बोर्डे, संदीप वासलेकर, डॉ. विश्वजित कदम, डॉ. पी. डी. पाटील आणि हणमंत गायकवाड यांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार
* केवळ पुण्यालाच चांगल्या अधिकाऱ्यांची नव्हे तर इतर शहरांनाही गरज- तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचे उत्तर
* सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील मंत्री होण्याआधी आसूड ओढायचे पण मंत्री झाल्यानंतर त्यांच्यातल्या ढाण्या वाघाची शेळी झाली- सुनील तटकरे
* 'इंडिया टीव्ही' वृत्तवाहिनीचे वरिष्ठ पत्रकार सुधीर शुक्ला यांच्यावर लोकलमध्ये हल्ला
* राजापूर तालुक्यातील नियोजित नाणार प्रकल्प होणार, प्रकल्प जनतेवर लादणार नाही असे आश्वासन होते मुख्यमंत्र्यांचे
* क्षयरुग्ण कळवा, पाचशे रुपये मिळवा- राष्ट्रीय क्षयनियंत्रण कार्यक्रमांतर्गत कक्षाचे खाजगी डॉक्टरांना आवाहन
* कच्च्या मालाच्या व कामाच्या दर्जाची बनावट प्रमाणपत्रे सादर करणारे म्हाडाचे ५५ अधिकारी दोषी
* बदलत्या हवामानाचा फटका, आवक घटल्याने हापूसचा भाव वधारला
* मुंबईत हवाई दलाच्या जागेवरील २५ हजार झोपडपट्टीधारकांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा
* नाशिकमध्ये घरफोड्या करून चोरट्याने नेपाळमध्ये दोन हॉटेल खरेदी केल्याचे उघड
* पीएनबी घोटाळा: मेहुल चोक्सी आरोपीच्या 'गीतांजली जेम्स'ने कलाकारांचीही केली फसवणूक
* कंगना राणावत, ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफ 'नक्षत्र' ब्रँडचं केले प्रमोशन
* 'जिली' ब्रँडची जाहिरात करणाऱ्या बिपाशा बसु, सलमान खान आणि करिना कपूर 'संगिनी' ब्रँडचे होते अॅम्बेसेडर
* पंजाब नॅशनल बँकेकडे पुरेसा निधी आणि सरकारी पाठिंबा, बँक परिस्थितीतून सहज बाहेर पडेल- बँकेचे ट्विट
* स्वखुशीने, अभ्यास करूनच इस्लामचा धर्माचा स्वीकार, त्यानंतरच शफी जहानशी लग्न केले- हादियाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
* बसपामध्ये पाया पडण्याची परंपरा झाली बंद, माझ्या पाया पडण्याऐवजी यापुढे फक्त 'जय भीम' बोला- मायावती
* मोबाइल क्रमांक १० अंकीच राहणार असल्याचा भारती एअरटेल आणि जिओच्या अधिकाऱ्यांचा खुलासा
* मोबाइल क्रमांक १० वरून १३ अंकी होणार असल्याचे दूरसंचार मंत्रालयाने केले होते जाहीर
* इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी गुजरातचे माजी पोलीस महासंचालक पीपी पांडे आरोपमुक्त
* २००४ मध्ये इशरत आणि अन्य तिघांना चकमकीत मारले होते, पांडे यांच्यावर अपहरण आणि हत्येचा होता आरोप
* कमल हसन यांच्या पक्षाचे नाव 'मक्कल निधी मय्यम', अर्थ आहे ‘‘लोकांना न्याय मिळवून देणारं हक्काचं व्यासपीठ’
* राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि 'मिसाइल मॅन' एपीजे अब्दुल कलाम आदर्श, जनतेची सेवा करणे हे माझे कर्तव्य- कमल हसन
* उत्तरप्रदेशात नायर रुग्णालयात डोक्याइतक्या आकाराच्या ०१.८७३ किलो वजनाच्या ट्युमरची शस्त्रक्रिया
* इफ्फीतून वगळण्यात आलेल्या 'एस दुर्गा' या मल्याळम चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची काटछाट विना मंजुरी
* मुख्य सचिवाला मारहाण केल्याच्या आरोपाखाली 'आप' आमदार अमानतुल्ला खान यांना अटक
* उत्तर प्रदेश बटाटा उत्पादनात नंबर वन, बटाटा चिप्स उद्योगातून हजारो कोटींचा व्यापार शेतकऱ्यांना मिळेल- पंतप्रधान


Comments

Top